मुख्य बातम्या

Video; शिरुर; बिबट्याची मादी कोंबडी खायला गेली अन खुराड्यात अडकली

शिंदोडी (तेजस फडके) शिरुर तालुक्यात दिवसेंदिवस बिबट्याची संख्या वाढत असुन अनेक ठिकाणी बिबट्याचे दर्शन होत आहे. शिरुर तालुक्याच्या पुर्व भागातील शिंदोडी गावात आज (दि 20) रोजी पहाटे चारच्या सुमारास एक बिबट्याची मादी मच्छिंद्र सोनवणे यांच्या घरापुढे असणाऱ्या कोंबड्याच्या खुराड्यात शिरली. परंतु बिबट्या खुराड्यात शिरल्यानंतर कोंबडी बाहेर पळाली अन शेतकऱ्याने खुराड्याच दार बंद केल्याने बिबट्याची मादी मात्र खुराड्यातच अडकली.

शिरुरच्या पुर्व भागात घोड धरणाच्या कडेला असणाऱ्या निमोणे, गुनाट आणि शिंदोडी बागायती शेती असल्यामुळे परीसरात मोठया प्रमाणात ऊसाचे उत्पादन घेतले जाते. त्यामुळे अनेकवेळा ऊसाच्या फडात बिबट्या लपून बसतो. परंतु शिकारीच्या शोधात बाहेर पडल्यानंतर अनेकवेळा शेतकऱ्यांना बिबट्याचे दर्शन होते.

 

शिंदोडी येथील शेतकरी मछिंद्र सोनवणे यांच्या घरासमोर कोंबड्याच खुराड असुन आज (दि 20) पहाटे चारच्या सुमारास शिकारीच्या शोधात असलेली एक बिबटयाची मादी थेट कोंबड्याच्या खुराड्यात शिरली. त्यामुळे कोंबड्या आरडाओरडा करत खुराड्याच्या बाहेर पळाल्या. कोंबड्याच्या आवाजाने जागे झालेले शेतकरी मछिंद्र सोनवणे हे खुराड्याजवळ गेले असता त्यांना हि बिबटयाची मादी कोंबड्याच्या खुराड्यात शिरलेली दिसली. त्यानंतर त्यांनी प्रसंगावधान राखत खुराड्याच दार बाहेरुन बंद केलं आणि बिबटयाची मादी खुराड्यात अडकली.

 

त्यानंतर सोनवणे यांनी हि गोष्ट शिंदोडी विविध कार्यकारी सहकारी सोसायटीचे संचालक विठ्ठल दुर्गे यांच्या कानावर घातली. दुर्गे यांनी तातडीने वनविभागाच्या कर्मचाऱ्यांना संपर्क केला. त्यानंतर जुन्नर येथील माणिकडोह बिबट निवारण केंद्राचे पशुवैद्यकीय अधिकारी डॉ चंदन चवणे तसेच त्यांचे सहकारी आकाश डोळस, वैभव नेहरकर, शिवाजी मोघे, शिरुरचे वनपाल गणेश म्हेत्रे, वनरक्षक संतोष भुतेकर, वनकर्मचारी दिनेश गोरड, नवनाथ गांधले, संपत पाचुंदकर हे सर्वजण शिंदोडी येथे आले.

 

यावेळी कोंबड्याच्या खुराड्यात अडकलेल्या बिबट्याच्या मादीला भुलीच इंजेक्शन देऊन बेशुद्ध करण्यात आलं. त्यानंतर तिला जुन्नर येथील माणिकडोह बिबट निवारण केंद्रात पाठविण्यात आले. अंदाजे दोन वर्षे वय असलेली हि बिबट्याचीं मादी असल्याचे यावेळी वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

घोड धरणात प्रशासनाच्या नाकावर टिच्चून सर्रास बेकायदेशीर वाळूउपसा; घोड पाटबंधारे, महसूल अन् पोलिस प्रशासन वाळू माफियांसमोर हतबल…?

शिरुर (तेजस फडके) घोड धरणाच्या परिसरात दिवसाढवळ्या बेकायदेशीर वाळूउपशाचा धडाका सुरुच असुन घोड धरणाच्या सुरक्षेचा…

5 तास ago

रांजणगावात जुन्या भांडणातून तरुणावर हल्ला; कोयता, दगड, फायटरने मारहाण

रांजणगाव गणपती (तेजस फडके) रांजणगाव गणपती गावच्या हद्दीत जुन्या भांडणाच्या कारणावरुन एका १९ वर्षीय तरुणासह…

8 तास ago

Video! शिरूरमध्ये झालेल्या गोळीबारातील हरिश गंगावणे याच्या खुनाची Inside Story…

शिरूर (तेजस फडके): शिरूर शहरात शुक्रवारी (ता. १८) पहाटेच्या सुमारास गोळीबाराची धक्कादायक घटना घडल्याने परिसरात…

10 तास ago

Video! शिरूर शहरात पहाटे गोळीबार; तरुणाचा मृत्यू…

शिरूर (तेजस फडके) : शिरूर शहरातील लाटेआळी आंबेडकर नगर परिसरात आज (शुक्रवार) सकाळी साडेसहाच्या सुमारास…

1 दिवस ago

भिक्षा देण्यास नकार दिल्याने महिलेवर हल्ला; भिकाऱ्याने नाकाला घेतला चावा

मथुरा : गोवर्धन पर्वताला प्रदक्षिणा घालत असलेल्या एका महिलेने भिक्षा देण्यास नकार दिल्याने संतापलेल्या भिकाऱ्याने…

3 दिवस ago

तोंडाला सतत दुर्गंधी येते, दातांना कीड लागते, पाहा ‘असं’ का होत

रोज करायचे काय दिवसातून दोनदा दात घासा. सकाळी आणि रात्री. यामुळे दातांमध्ये काही अडकून राहणार…

3 दिवस ago