मुख्य बातम्या

शिरुर; पिंपरी दुमाला येथे खळदकर दाम्पत्यांचा हळदी-कुंकवाचा सोहळा उत्साहात संपन्न

रांजणगाव गणपती (किरण शेलार-पिंगळे): शिरुर तालुक्यातील पिंपरी दुमाला येथे सामाजिक सलोखा, महिला सन्मान आणि परंपरेचा जागर करणारा भव्य हळदी-कुंकवाचा कार्यक्रम गावचे माजी उपसरपंच शरद खळदकर तसेच त्यांच्या पत्नी व शालेय शिक्षण समितीच्या अध्यक्षा कल्पना खळदकर दाम्पत्यांच्या वतीने मोठ्या थाटामाटात संपन्न झाला. गेल्या अनेक वर्षांपासून सातत्याने महिलांसाठी आयोजित केल्या जाणाऱ्या या उपक्रमाला यंदा विशेष उत्साहाचे स्वरुप प्राप्त झाले होते.

सध्या जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांची धामधूम सुरु असल्याने या कार्यक्रमाला राजकीय किनार लाभली. या कार्यक्रमास जिल्हा परिषद सदस्या स्वाती पाचुंदकर, जिल्हा परिषद उमेदवार ज्योती पाचुंदकर, पंचायत समिती उमेदवार संदीप सोनवणे, महेश फंड, सागर देवकर यांच्यासह शिरुर तालुक्यातील विविध क्षेत्रांतील मान्यवरांनी मोठ्या संख्येने उपस्थिती लावली.

यावेळी पिंपरी दुमाला ग्रामपंचायतीचे सरपंच, उपसरपंच, सर्व ग्रामपंचायत सदस्य, विविध सहकारी संस्थांचे संचालक, चेअरमन व व्हाईस चेअरमन, देवस्थानचे अध्यक्ष, माजी अध्यक्ष, विश्वस्त, तंटामुक्ती समितीचे अध्यक्ष, शालेय शिक्षण समितीचे पदाधिकारी, माजी लोकप्रतिनिधी तसेच सामाजिक, शैक्षणिक व सहकार क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.या सोहळ्यात परिसरातील शेकडो सुवासिनी महिलांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला.

यावेळी पारंपरिक पद्धतीने हळदी-कुंकवाचा कार्यक्रम पार पडला तसेच महिलांसाठी आकर्षक भेटवस्तूंचे वाटप करण्यात आले. तसेच उपस्थितांसाठी स्वादिष्ट भोजनाची उत्कृष्ट व्यवस्था करण्यात आली होती. महिलांना एकत्र येण्याचे, स्नेहबंध वृद्धिंगत करण्याचे आणि सामाजिक एकोप्याची भावना दृढ करण्याचे हे व्यासपीठ ठरले.

गेल्या अनेक वर्षांपासून अव्याहतपणे सुरु असलेल्या खळदकर दाम्पत्यांच्या या उपक्रमामुळे पिंपरी दुमाला परिसरात हळदी-कुंकवाच्या कार्यक्रमाला केवळ धार्मिक नव्हे तर सामाजिक व सांस्कृतिक महत्त्व प्राप्त झाले आहे. महिला सन्मान, महिला सशक्तीकरण आणि परंपरेचा सन्मान जपणारा हा उपक्रम आजच्या सामाजिक जीवनात प्रेरणादायी ठरत असल्याची भावना उपस्थितांनी व्यक्त केली.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

Video! शिरूर शहरात पहाटे गोळीबार; तरुणाचा मृत्यू…

शिरूर (तेजस फडके) : शिरूर शहरातील लाटेआळी आंबेडकर नगर परिसरात आज (शुक्रवार) सकाळी साडेसहाच्या सुमारास…

14 तास ago

भिक्षा देण्यास नकार दिल्याने महिलेवर हल्ला; भिकाऱ्याने नाकाला घेतला चावा

मथुरा : गोवर्धन पर्वताला प्रदक्षिणा घालत असलेल्या एका महिलेने भिक्षा देण्यास नकार दिल्याने संतापलेल्या भिकाऱ्याने…

2 दिवस ago

तोंडाला सतत दुर्गंधी येते, दातांना कीड लागते, पाहा ‘असं’ का होत

रोज करायचे काय दिवसातून दोनदा दात घासा. सकाळी आणि रात्री. यामुळे दातांमध्ये काही अडकून राहणार…

2 दिवस ago

तापमान वाढीमुळे बंद पडू शकतं तुमचं हृदय, वाचा हार्ट अटॅकचा धोका जास्त कुणाला

वाढत्या तापमानाचा हृदयावर प्रभाव  हीटवेव किंवा जास्त तापमानामुळे कार्डिओवस्कुलर सिस्टीमवर प्रभाव पडतो, ज्यामुळे हार्ट अटॅकचा…

2 दिवस ago

गव्हाच्या पिठामध्ये ‘या’ ५ गोष्टी मिसळा आरोग्य राहिल निरोगी

अनेक भारतीय पदार्थांमध्ये गव्हाच्या पीठचा वापर केला जातो. गव्हाच्या पीठपासून चपाती किंवा मिठाई असे अनेक…

2 दिवस ago

नितीन नबीन यांची सुनेत्रा पवार यांची सदिच्छा भेट; महाराष्ट्रातील विकासकामांवर चर्चा

मुंबई: भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नबीन यांनी बुधवारी मुंबईतील देवगिरी या शासकीय निवासस्थानी…

2 दिवस ago