मुख्य बातम्या

शिरुर तालुक्यातील आरोपी दत्तात्रय गाडे याच्या बाबत धक्कादायक माहिती समोर…

पुणे: पुणे शहरातील स्वारगेट बस स्थानकामध्ये एका युवतीवर (वय २६) बलात्कार झाल्याची घटना बुधवार (ता. २५) उघडकीस आली आहे. संशयित आरोपी दत्तात्रय रामदास गाडे हा सराईत गुन्हेगार असून तो शिरुर तालुक्यातील गुनाट गावचा रहिवासी आहे. शिक्रापूर आणि शिरुर पोलिस ठाण्यात आरोपीवर गुन्ह्याची नोंद आहे. पोलिसांकडून आरोपी दत्तात्रय गाडे याचा शोध घेतला जात आहे. आरोपी दत्तात्रय गाडेबद्दल अनेक धक्कादायक गोष्टी समोर आल्या आहेत. आरोपीचे राजकीय नेत्यांसोबत संबंध असल्याचे समोर आले आहे.

 

पोलिसांनी आरोपीची पार्श्वभूमी तपासली असता, आरोपी गाडे हा रेकॉर्डवरील गुन्हेगार असल्याची माहिती समोर आली आहे. त्याच्यावर पुण्यासह अहिल्यानगर जिल्ह्यात एकूण सहा गुन्हे दाखल आहेत. त्याने कधी लूटमार, कधी दरोडा, कधी पोलिस बनून लोकांची फसवणूक केली आहे. धक्कादायक बाब म्हणजे त्याने वयोवृद्ध महिलांना देखील सोडले नाही. तो एकट्या दुकट्या महिलांना टार्गेट करुन त्यांची लूटमार करायचा.

 

आरोपी दत्तात्रय गाडे हा एक सराईत गुन्हेगार असून त्याच्यावर शिरुर, शिक्रापूर आणि अहिल्यानगर जिल्ह्यातील विविध पोलिस ठाण्यात जबरी लुटीचे सहा गुन्हे दाखल आहेत. आरोपी गाडे याने २०१९ साली कर्ज काढून एक कार घेतली होती. या कारद्वारे तो पुणे अहिल्यानगर अशी प्रवासी वाहतूक करत होता. दरम्यान, तो एकट्या दुकट्या वृद्ध महिलांना टार्गेट करायचा. त्यांच्या गळ्यात सोनं दिसले तर तो घरुन डब्बा घ्यायचा आहे, असे सांगून निर्मनुष्य ठिकाणी गाडी घेऊन जायचा. या ठिकाणी जीवे मारण्याची धमकी देत महिलांच्या गळ्यातील सोनं काढून घ्यायचा.

 

याप्रकरणी पुणे गुन्हे शाखेने आरोपी गाडेला अटकही केली होती. त्यावेळी त्याच्याकडून १२ तोळे सोनं जप्त केले होते. २०२० मध्ये शिरुरजवळील करडे घाटात जबरी लूटमार केली होती. याप्रकरणी पोलिसांनी आरोपीला अटक केली होती. त्याला चार ते पाच महिन्यांचा तुरुंगवासही झाला होता. तुरुंगातून बाहेर आल्यानंतर तो मोकाटपणे फिरत होता. त्याचे लग्न झाले असून त्याला एक मुलगाही आहे. तरीही तो फिरायचा आणि स्टँडवर मुक्काम करायचा.

 

धक्कादायक म्हणजे तो पोलिस ठाण्याजवळचा पोलिस म्हणून वावरायचा. तो इनशर्ट आणि पायात स्पोर्ट शूज घालायचा. त्याच्या तोंडाला नेहमीच मास्क असायचा. स्थानकावरील लोकांना तो पोलिस असल्याचे भासवायचा. ज्यावेळी ही अत्याचाराची घटना घडली. त्यावेळी देखील आरोपी गाडे फॉर्मल शर्ट-पँट आणि शूज अशाच वेषात होता. त्याने पीडित युवतीसोबत ताई म्हणून संवाद साधला, आणि तिचा विश्वास संपादन करून तिच्यावर लैंगिक अत्याचार केला.

 

आरोपी दत्ता गाडे याच्या व्हॉट्सअप डीपीवर आमदाराचा फोटो आहे. शिरुरचे आमदार माऊली कटके यांचा फोटो असल्याचे समोर आले आहे. आरोपी दत्ता गाडे हा गावातील लोकांना उज्जैन येथे महाकाल येथे दर्शनाला घेऊन जायचा. आमदाराचा कार्यकर्ता म्हणून गावात मिरवायचा अशी माहिती समोर आली आहे.परंतु माझा फोटो डीपीला ठेवला म्हणुन कोणीही माझा कार्यकर्ता होत नसल्याचे आमदार माऊली कटके यांनी सांगितले.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

अभियांत्रिकी-पॉलिटेक्निक विद्यार्थ्यांसाठी AI कौशल्यविकासावर भर; रोजगाराच्या संधींसाठी केंद्रीकृत प्लेसमेंट प्लॅटफॉर्म

मुंबई : महाराष्ट्रातील अभियांत्रिकी आणि पॉलिटेक्निक विद्यार्थ्यांची कौशल्य क्षमता, रोजगारक्षमता आणि उद्योगसज्जता वाढविण्यासाठी उद्योगाभिमुख प्रशिक्षण,…

13 तास ago

विद्यार्थ्यांच्या तक्रारींचा आता ऑनलाइन निपटारा; DBATUचे ‘Students Grievances Portal’ तातडीने सुरू करण्याचे निर्देश

मुंबई: डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठ, लोणेरे (DBATU) अंतर्गत विद्यार्थ्यांच्या तक्रारी आणि शैक्षणिक समस्यांचे जलद,…

13 तास ago

विद्यार्थ्यांच्या कल्पनांना मिळणार ‘स्टार्टअप’ची ताकद! महाराष्ट्रात इन्क्युबेशन सेंटरचे जाळे उभारण्याच्या हालचालींना वेग

मुंबई: विद्यार्थ्यांच्या नवकल्पना, संशोधन आणि उद्योजकतेला व्यापक संधी उपलब्ध करून देत महाराष्ट्राची स्टार्टअप परिसंस्था अधिक सक्षम…

13 तास ago

गणेशोत्सवासाठी मुंबई सज्ज; सचिन अहिरांची पालिका अधिकाऱ्यांसोबत आढावा बैठक, विसर्जन व्यवस्थेवर विशेष भर

मुंबई : लाडक्या बाप्पाच्या आगमनाला अवघे काही दिवस शिल्लक राहिल्याने मुंबईत गणेशोत्सवाची लगबग अंतिम टप्प्यात…

14 तास ago

लंडनच्या संसदेत ‘जय महाराष्ट्र’चा निनाद; एकनाथ शिंदेंना प्रतिष्ठेचा सन्मान

लंडन: ब्रिटनच्या संसद भवनातील वरिष्ठ सभागृह असलेल्या हाऊस ऑफ लॉर्ड्समध्ये गुरुवारी ‘जय महाराष्ट्र’चा निनाद घुमला. महाराष्ट्राचे…

14 तास ago

शिरुर; सोन्याचा गंठण लाखोंचा; पण दळवी दांपत्याच्या मनाचा मोठेपणा मात्र करोडोंचा

शिरुर (तेजस फडके) सध्या सोन्याचा बाजार दिवसेंदिवस वाढत आहे. व्यक्तीला सोन खरेदी करणं सर्वसामान्य व्यक्तीच्या…

17 तास ago