मुख्य बातम्या

Video; चिंचणी गावातील अवैध दारु धंदे बंद करा; महिलांचा यल्गार; रुपाली चाकणकारांना साकडे

शिंदोडी (तेजस फडके) चिचणी (ता. शिरुर) येथे मोठ्या प्रमाणात अवैध दारु विक्री केली जात आहे. हि विक्री होत असल्यामुळे गावातील तरुणवर्ग दारुच्या आहारी जात असुन अनेक तरुणांचे भविष्य धोक्यात आले आहे. तसेच त्यांच्या कुटुंबामध्ये वाद होऊन अनेक कुटुंब उध्वस्त होण्याच्या मार्गावर आहेत. गावातील अनेकजण दारु पिऊन महिलांना मारहाण करतात. त्यामुळे गावातील महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न मोठ्या प्रमाणात निर्माण झाला आहे.

त्यामुळे गावातील सर्व अवैध दारुविक्री बंद करण्याबाबत चिंचणी येथील प्रगती महिला ग्रामसंघ तसेच गावातील सर्व महिलांनी ग्रामसंघाच्या माध्यमातून दि.२८ जुन २०२५ रोजी महिला सभा घेऊन गावातील सर्व अवैध दारु विक्री धंदे बंद करण्याबाबत ग्रामसभेत ठराव केला आहे. गावठाण तसेच गायरान व संपुर्ण गावात अनेक ठिकाणी अवैध दारुविक्री केली जात आहे.

याबाबत चिंचणी येथील प्रगती महिला ग्रामसंघ तसेच गावातील सर्व महिलांनी ग्रामसभेत ठराव केला आहे. गावातील सरपंच, उपसरपंच तसेच राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर, पुणे जिल्हाधिकारी, पुण्याचे विभागीय आयुक्त, पुणे ग्रामीण पोलिस अधिक्षक, शिरुरचे उपविभागीय अधिकारी, तहसीलदार, गटविकास अधिकारी, पोलिस निरीक्षक या सर्वांना गावातील महिलांनी प्रत्यक्ष भेट घेऊन निवेदन दिले आहे.

चिंचणी गावातील सर्व महिलांच्या निवेदनाची तातडीने दखल घेऊन पोलिसांनी गावात सगळीकडे शोध मोहीम राबविली. परंतु कुठेही अवैध दारुविक्री करताना कोणीही आढळुन आले नाही.

संदेश केंजळे (पोलिस निरीक्षक)

शिरुर पोलिस स्टेशन 

शिरुर नगरपरिषदेला घनकचरा व्यवस्थापन, अतिक्रमण व भंगार घोटाळ्यावर १५ दिवसांत खुलासा द्यायचा आदेश

शिरुर तालुक्यातुन २१ वर्षीय युवती बेपत्ता; कुटुंबीयांची पोलीसांकडे धाव

शिरुर तालुक्यातील आलेगाव पागा येथून दोन दिवसांपासून तरुण बेपत्ता; कुटुंब चिंतेत

 

शिरूर तालुका टीम

Recent Posts

Video! शिरूर शहरात पहाटे गोळीबार; तरुणाचा मृत्यू…

शिरूर (तेजस फडके) : शिरूर शहरातील लाटेआळी आंबेडकर नगर परिसरात आज (शुक्रवार) सकाळी साडेसहाच्या सुमारास…

11 तास ago

भिक्षा देण्यास नकार दिल्याने महिलेवर हल्ला; भिकाऱ्याने नाकाला घेतला चावा

मथुरा : गोवर्धन पर्वताला प्रदक्षिणा घालत असलेल्या एका महिलेने भिक्षा देण्यास नकार दिल्याने संतापलेल्या भिकाऱ्याने…

2 दिवस ago

तोंडाला सतत दुर्गंधी येते, दातांना कीड लागते, पाहा ‘असं’ का होत

रोज करायचे काय दिवसातून दोनदा दात घासा. सकाळी आणि रात्री. यामुळे दातांमध्ये काही अडकून राहणार…

2 दिवस ago

तापमान वाढीमुळे बंद पडू शकतं तुमचं हृदय, वाचा हार्ट अटॅकचा धोका जास्त कुणाला

वाढत्या तापमानाचा हृदयावर प्रभाव  हीटवेव किंवा जास्त तापमानामुळे कार्डिओवस्कुलर सिस्टीमवर प्रभाव पडतो, ज्यामुळे हार्ट अटॅकचा…

2 दिवस ago

गव्हाच्या पिठामध्ये ‘या’ ५ गोष्टी मिसळा आरोग्य राहिल निरोगी

अनेक भारतीय पदार्थांमध्ये गव्हाच्या पीठचा वापर केला जातो. गव्हाच्या पीठपासून चपाती किंवा मिठाई असे अनेक…

2 दिवस ago

नितीन नबीन यांची सुनेत्रा पवार यांची सदिच्छा भेट; महाराष्ट्रातील विकासकामांवर चर्चा

मुंबई: भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नबीन यांनी बुधवारी मुंबईतील देवगिरी या शासकीय निवासस्थानी…

2 दिवस ago