शिरुर तालुक्यातील आलेगाव पागा येथून दोन दिवसांपासून तरुण बेपत्ता; कुटुंब चिंतेत

मुख्य बातम्या शिरूर तालुका

न्हावरे (तेजस फडके) आलेगाव पागा (ता. शिरुर) येथून एक तरुण १४ जून २०२५ पासून बेपत्ता झाला असून त्याचा अद्याप कोणताही थांगपत्ता लागलेला नाही. याप्रकरणी न्हावरे पोलीस दुरक्षेत्रात मिसिंगची नोंद करण्यात आली आहे. या बेपत्ता तरुणाचे नाव नितीन लहू यादव (वय २२, रा. आलेगाव पागा, ता. शिरूर, जि. पुणे) असे असून, तो घरातून “ताईकडे चाकणला जाऊन येतो” असे सांगून सकाळी ७ वाजता निघून गेला आहे. मात्र तो चाकणला पोहचला नसल्याचे नंतर उघड झाले. विशेष म्हणजे त्याने त्याचा मोबाईल फोन घरीच ठेवला होता.

नितीन यादव याचे वर्णन पुढीलप्रमाणे आहे. रंग सावळा, उंची अंदाजे ५ फूट ५ इंच, चेहरा उभट, नाक सरळ, केस वाढलेले काळे, अंगाने सडपातळ. तो पांढऱ्या रंगाचा टी-शर्ट (काळ्या रेषा असलेला), अरमानी कंपनीची काळ्या रंगाची पॅन्ट आणि चॉकलेटी रंगाच्या पॅरागॉन चप्पल परिधान करून बाहेर पडला होता. त्याच्यासोबत ग्रे रंगाची सॅक (बॅग) होती.

याबाबत नितीनच्या आई चंद्रकला लहू यादव (वय ४२ वर्षे, रा. आलेगाव पागा, ता. शिरुर, जि. पुणे) यांनी न्हावरे पोलिस चौकीत तक्रार दिली आहे. नितीनच्या कुटुंबाने त्याचा सर्वत्र शोध घेतला असुन त्याचा अदयापपर्यंत काहीही पत्ता लागलेला नाही.

 

या प्रकरणी शिरुर पोलिस स्टेशनचे पोलिस निरीक्षक संदेश केंजळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस हवालदार भोते हे या घटनेचा अधिक तपास करत आहेत. कोणालाही नितीन यादव याबाबत माहिती असल्यास कृपया न्हावरा पोलीस दुरक्षेत्र किंवा शिरुर पोलिसांना संपर्क साधावा असे पोलिसांच्या वतीने आवाहन करण्यात आले आहे.

शिरुर तालुक्यातील छेडछाड प्रकरणी डायल ११२ ला कॉल पण शिक्षकावर कारवाई कधी…?

घोड धरणात वाळूचोरी ११२ ला कॉल अन तब्बल तीन तासात तत्परता दाखवत पोलिस हजर

शिरुर तालुक्यातील एका शिक्षकाचा प्रताप; आदिवासी महिलेची केली छेडछाड