मुख्य बातम्या

शिरुर तालुक्यात अष्टविनायक महामार्गावर भीषण अपघात; बँकेतील तरुण कॅशियरचा दुर्दैवी मृत्यू

न्हावरे (अक्षय टेमगिरे) शिरुर तालुक्यातील न्हावरे-निर्वी रस्त्यावर बुधवार (दि 13) रोजी सायंकाळी झालेल्या भीषण अपघातात एचडीएफसी बँकेत कार्यरत असलेल्या तरुण महिला कर्मचाऱ्याचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना घडली आहे. ऋतुजा विनय शिळीमकर (वय २९, रा. मांडवगण फराटा, ता. शिरुर, जि. पुणे) असे मृत्यू झालेल्या तरुणीचे नाव असून, या घटनेने न्हावरे, मांडवगण फराटा गावासह संपुर्ण परिसर हळहळला आहे. याप्रकरणी न्हावरे पोलिस ठाण्यात अपघाताची नोंद करण्यात आली आहे.

न्हावरे पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ऋतुजा शिळीमकर या न्हावरे येथील एचडीएफसी बँकेत कॅशियर म्हणुन कार्यरत होत्या. बुधवारी (ता.१३) रोजी नेहमीप्रमाणे दिवसभराचे काम पुर्ण करुन त्या सायंकाळी आपल्या दुचाकीवरुन मांडवगण फराटा येथील घरी परतत होत्या. मात्र, घर अवघ्या काही अंतरावर असतानाच काळाने त्यांच्यावर झडप घातली.

सायंकाळी 7:30 च्या सुमारास न्हावरे-निर्वी रस्त्यावर निर्वी गावाजवळ त्यांच्या दुचाकीचा भीषण अपघात झाला. अपघात एवढा गंभीर होता की, ऋतुजा यांच्या डोक्याला जबर दुखापत झाली. अपघाताचा मोठा आवाज ऐकताच परिसरातील ग्रामस्थ आणि वाहनचालकांनी घटनास्थळी धाव घेतली. रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या ऋतुजा यांना नागरिकांनी तत्काळ न्हावरे ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. मात्र, डॉक्टरांनी तपासणीपुर्वीच त्यांचा मृत्यू झाल्याचे जाहीर केले. या घटनेनंतर रुग्णालय परिसरात एकच हळहळ व्यक्त होत होती.

या प्रकरणी मयत ऋतुजा यांच्या चुलते राजेंद्र बहिरट यांनी न्हावरे पोलिस ठाण्यात फिर्याद दिली असून, पोलिसांनी अपघाताची नोंद करून पुढील तपास सुरू केला आहे. अपघात नेमका कसा झाला, अन्य वाहनाचा धक्का होता का, की रस्त्याच्या अवस्थेमुळे दुर्घटना घडली, याचा तपास पोलिसांकडून केला जात आहे.

ऋतुजा शिळीमकर यांचे माहेर न्हावरे गावातच असून, त्यांचे वडील अनिल उर्फ बंडू बहिरट हे परिसरातील परिचित व्यावसायिक आहेत. ऋतुजा या स्वभावाने अत्यंत शांत, मनमिळावू आणि जबाबदार होत्या. बँकेतही त्यांनी आपल्या कामातून वेगळी ओळख निर्माण केली होती. त्यांच्या अकाली निधनाने मित्रपरिवार, नातेवाईक आणि ग्राहकांमध्येही शोक व्यक्त केला जात आहे.

दरम्यान, न्हावरे-निर्वी रस्ता पुन्हा एकदा या अपघातामुळे चर्चेत आला असून, या मार्गावरील वाढत्या अपघातांमुळे नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे. धोकादायक वळणे, अपुरी प्रकाशयोजना, भरधाव वेगाने धावणारी वाहने आणि रस्त्यावरील सुरक्षेचा अभाव यामुळे हा मार्ग ‘मृत्यूचा सापळा’ बनत चालल्याची भावना ग्रामस्थांनी व्यक्त केली आहे.

यापुर्वीही या रस्त्यावर अनेक गंभीर अपघात झाले असून, प्रशासनाने केवळ पाहणी आणि आश्वासनांपुरतीच भूमिका घेतल्याचा आरोप स्थानिकांकडून केला जात आहे. “आणखी किती निष्पाप जीव गेल्यावर प्रशासन जागे होणार?” असा संतप्त सवाल आता नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे.

शिरुर; चेक बाऊन्सप्रकरणी आरोपीस ३८ लाखांचा दंड, सहा महिन्यांची शिक्षा

शिरुरमध्ये वादळी पावसाचा तडाखा; एक्सप्रेस फिडरच्या तारा तुटल्याने रांजणगाव MIDC तील पाणी पुरवठा ठप्प

शिरुर; कारभारणीच्या नथीतुन;कारभारीच मारतात तीर; पदाधिकारी महिलेच्या पतींचा वाढतोय हस्तक्षेप…?

शिरूर तालुका टीम

Recent Posts

शिरुर बाजार समितीच्या उमेदवारीवरुन दिलीप हिंगे यांचा स्थानिक नेतृत्वावर अप्रत्यक्ष निशाणा

शिरुर (तेजस फडके): शिरुर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीतील उमेदवारी वाटपावरुन भारतीय जनता पक्षातील अंतर्गत…

4 तास ago

कान्हूर मेसाई परिसरात जोरदार पावसाची दमदार बरसात

पाबळ (सुनिल जिते): गेल्या अनेक दिवसांपासून पावसाच्या प्रतीक्षेत असलेल्या कान्हूर मेसाई परिसरात रविवारी दुपारनंतर जोरदार…

7 तास ago

संजय राऊत यांच्यावर तात्काळ गुन्हा दाखल करा; अन्यथा शिवसेना स्टाईल आंदोल

मुंबई: शिवसेना महिला सेनेने शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे खासदार संजय राऊत यांच्याविरोधात मुंबई पोलीस…

9 तास ago

सारथीच्या योजनांसाठी निधीची कमतरता भासू देणार नाही; उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार

पुणे: छत्रपती शाहू महाराज संशोधन, प्रशिक्षण व मानव विकास संस्था (सारथी) ही केवळ शासकीय योजना…

9 तास ago

शिरुर बाजार समिती निवडणुक; अशोक पवारांवर टिका करणाऱ्या माऊली कटकेंनी दिड वर्षात काय केले…?

शिरुर (तेजस फडके) सध्या शिरुर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीची रणधुमाळी चालु असुन एका बैठकीदरम्यान…

9 तास ago

टीईटी पेपरफुटीतील मुख्य सूत्रधारांवर मकोकाअंतर्गत कारवाईचा विचार; एकनाथ शिंदे

मुंबई: टीईटी परीक्षेच्या पेपरफुटीची घटना अत्यंत गंभीर आणि संतापजनक असून, या प्रकरणातील मुख्य सूत्रधार व…

9 तास ago