मुख्य बातम्या

रामदास जगताप यांना लाच घेतला रंगेहात पकडले अन् झाली अटक…

शिरूर : शिरूर तालुक्यातील जांबूत गावचे सुपूत्र आणि डिजिटल 7/12 चे जनक रामदास हरिभाऊ जगताप (अपर जिल्हाधिकारी नवी मुंबई) यांना २२ हजार रुपयांची लाच घेताना रंगेहात पकडले असून, अटक करण्यात आली आहे. या घटनेमुळे शिरूर तालुक्यासह प्रशासकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.

लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, सिडकोच्या भूमी व भूमापन विभागाशी संबंधित कामासाठी तक्रारदाराकडून २२ हजार रुपयांची लाच मागण्यात आली होती. यानंतर सापळा रचून अप्पर जिल्हाधिकारी रामदास जगताप यांना लाच स्वीकारताना रंगेहात पकडण्यात आले. ही कारवाई थेट सिडको कार्यालयातच करण्यात आली. या घटनेमुळे नवी मुंबईसह राज्यातील प्रशासकीय यंत्रणेत खळबळ उडाली असून, एसीबीकडून अशा प्रकारच्या कारवायांचा धडाका सुरूच असल्याचे स्पष्ट झाले आहे. शिपायापासून ते वरिष्ठ अधिकाऱ्यांपर्यंत अनेकांना अटक केल्याने सरकारी यंत्रणेत भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

डिजिटल 7/12 चे जनक म्हणून ओळख असलेले रामदास हरिभाऊ जगताप सध्या नवी मुंबई येथे अपर जिल्हाधिकारी पदावर कार्यरत आहेत. कथित लाच प्रकरण आणि आर्थिक व्यवहारांच्या चौकशीदरम्यान ही कारवाई करण्यात आल्याचे सांगितले जात आहे. महसूल विभागात डिजिटल 7/12 प्रणाली राबवण्यात रामदास हरिभाऊ जगताप यांचे मोठे योगदान मानले जाते. या कारवाईमुळे प्रशासकीय वर्तुळात खळबळ उडाली असून, पुढील तपास लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून सुरू आहे.

नवी मुंबईतील सिडकोचे (CIDCO) भूमी व भूमापन अधिकारी आणि अप्पर जिल्हाधिकारी रामदास हरिभाऊ जगताप यांना २२ हजार ५०० रुपयांची लाच घेताना रंगेहात अटक करण्यात आली आहे. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (ACB) १३ मे २०२६ रोजी ही कारवाई केली आहे. सिडकोच्या साडेबावीस टक्के योजनेतील जमिनीच्या करारासाठी (Agreement) त्यांनी लाच मागितली होती. नवी मुंबई एसीबीच्या पथकाने त्यांना सिडको कार्यालयात रंगेहाथ पकडले. रामदास जगताप यांच्या सांगण्यावरून शिपाई हरेश सोनवणे याने ही रक्कम स्वीकारली, त्यालाही अटक करण्यात आली आहे.

पुणे जिल्ह्यात लाच घेताना उपविभागीय अधिकारी रंगेहात सापडला…

मंत्रालयात लाचखोरीचा स्फोट: मंत्री नरहरी झिरवळ अडचणीत; ‘रेटकार्ड’चा धक्कादायक दावा

भाजप आमदार चंद्रू लमाणी लाच प्रकरणात अटकेत; 5 लाख स्वीकारताना रंगेहात पकडले

एमईएस कार्यालयात सीबीआयचा सापळा; दोन अधिकाऱ्यांना दोन लाखांची लाच घेताना अटक

शिरूर! पंचनाम्याच्या बदल्यात ‘दर ठरवला’; लाच घेताना ग्राम महसूल अधिकारी एसीबीच्या जाळ्यात…

शिरूर तालुका टीम

Recent Posts

शिरुर तालुका दुष्काळाच्या छायेत असताना घोड धरणातील अवैध वाळू उपशामुळे शेतकरी चिंताग्रस्त

शिरुर (तेजस फडके) शिरुर तालुक्यात दुष्काळसदृश परिस्थिती निर्माण झाली असुन घोड धरणातील नदीपात्रातील बेकायदेशीर वाळू…

8 तास ago

पुणे जिल्हा बँकेसाठी शिरुरमध्ये शिवसेनेची मोर्चेबांधणी; जिल्हाप्रमुख बाप्पुसाहेब शिंदे यांचे नाव चर्चेत

रांजणगाव गणपती (तेजस फडके) पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीची प्रक्रिया सुरु झाली असुन, जिल्ह्यातील…

9 तास ago

संतुलित आरोग्यासाठी मेडिटेशन करण्याचे फायदे

आरोग्य संतुलित ठेवण्यासाठी अनेकदा डॉक्टर मेडिटेशन करण्याचा सल्ला देतात. मेडिटेशन हे केवळ मानसिक नव्हे तर…

12 तास ago

जिमला जायला वेळ नाही? बेली फॅट कमी करण्यासाठी फॉलो करा या सोप्या गोष्टी

पोटावर वाढलेली चरबी आपला पूर्ण लूक खराब करू शकते. हट्टी बेली फॅट कमी करण्यासाठी बऱ्याच…

12 तास ago

दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांच्या मुला-मुलींच्या लग्नासाठी शिवसेनेचा मदतीचा हात; एकनाथ शिंदेंची मोठी घोषणा

मुंबई : राज्यातील दुष्काळग्रस्त भागातील शेतकरी कुटुंबांना दिलासा देण्यासाठी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी महत्त्वाची घोषणा…

12 तास ago

‘व्होट चोरी’च्या आरोपांवर संजय निरुपमांचा पलटवार; ‘पराभवानंतर निवडणूक आयोगाला लक्ष्य करणे योग्य नाही’

मुंबई: निवडणूक आयोग आणि मतदार यादीच्या विशेष सखोल पुनरीक्षणावरून सुरू असलेल्या राजकीय वादाच्या पार्श्वभूमीवर शिवसेना…

12 तास ago