मुख्य बातम्या

रांजणगाव MIDC पोलीस ठाणे हद्दीत विहिरीत आढळला अनोळखी इसमाचा मृतदेह

कारेगाव (तेजस फडके) ढोकसांगवी शिवारातील गट नंबर ५०१ मधील विहिरीत एका अनोळखी इसमाचा मृतदेह आढळून आल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. या प्रकरणी ऋषीकेश काळुराम मलगुंडे (वय २८) रा. मलगुंडे वस्ती, ढोक सांगवी) यांनी रांजणगाव MIDC पोलिसांना याबाबत माहिती दिली आहे.

ऋषीकेश मलगुंडे हे आज (दि ८) रोजी सकाळी विहिरीवर पाण्याची मोटार सुरु करण्यासाठी गेले असताना विहिरीच्या पाण्यात एक अनोळखी पुरुष जातीचा मृतदेह (वय अंदाजे २० ते २५ वर्षे) मृतावस्थेत तरंगताना दिसला. त्यांनी तात्काळ पोलीस पाटील दिपक मलगुंडे यांना माहिती दिली. त्यानंतर घटनेची माहिती रांजणगाव एम आय डी सी पोलीस स्टेशन (Ranjangaon MIDC Police) येथे कळविण्यात आली.

रांजणगाव पोलीसांनी फायर ब्रिगेडच्या मदतीने मृतदेह विहिरीबाहेर काढला. त्यावेळी मृतदेह सडलेला, चेहरा जलचर प्राण्यांनी कुरतडलेला, तसेच पाण्यामुळे हातपायाचे तळवे पांढरे झालेले स्थितीत आढळून आला. मृत इसमाच्या अंगावर फिकट जांभळा फुलबाह्याचा शर्ट, निळ्या रंगाची जीन्स पॅन्ट (नाडीने बांधलेली) काळ्या रंगाची जॉकी कंपनीची अंडरवेअर, डोक्यावर टक्कल, दाढी-मिशा नाहीत अशी माहिती नमुद करण्यात आली आहे.

सदर इसमाच्या शवविच्छेदन अहवालानंतर त्याचा पाण्यात बुडून मृत्यू झाला असल्याची माहिती मिळाली आहे. सदर मृत इसमाची ओळख पटवण्याचे प्रयत्न सुरु असुन रांजणगाव MIDC पोलीस स्टेशनचे तपासी अंमलदार राजेश कर्डिले हे या घटनेचा पुढील अधिक तपास करत आहेत. सदर मयत व्यक्तीबाबत कोणत्याही व्यक्तीस सदर वर्णनाशी जुळणारा हरवलेला नातेवाईक असल्यास पोलीस स्टेशनशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

रांजणगाव येथील तिहेरी खून प्रकरणाचा अवघ्या १२ दिवसांत उलगडा पुणे ग्रामीण पोलिसांची कामगिरी

रांजणगाव तिहेरी हत्याकांड; लव्ह, सेक्स आणि धोका…?

शिरुर मध्ये सामाजिक कार्यकर्ते निलेश वाळुंज यांच्यासह कार्यकर्त्यांचे सामुहिक मुंडण

 

 

शिरूर तालुका टीम

Recent Posts

घोड धरणात प्रशासनाच्या नाकावर टिच्चून सर्रास बेकायदेशीर वाळूउपसा; घोड पाटबंधारे, महसूल अन् पोलिस प्रशासन वाळू माफियांसमोर हतबल…?

शिरुर (तेजस फडके) घोड धरणाच्या परिसरात दिवसाढवळ्या बेकायदेशीर वाळूउपशाचा धडाका सुरुच असुन घोड धरणाच्या सुरक्षेचा…

7 तास ago

रांजणगावात जुन्या भांडणातून तरुणावर हल्ला; कोयता, दगड, फायटरने मारहाण

रांजणगाव गणपती (तेजस फडके) रांजणगाव गणपती गावच्या हद्दीत जुन्या भांडणाच्या कारणावरुन एका १९ वर्षीय तरुणासह…

11 तास ago

Video! शिरूरमध्ये झालेल्या गोळीबारातील हरिश गंगावणे याच्या खुनाची Inside Story…

शिरूर (तेजस फडके): शिरूर शहरात शुक्रवारी (ता. १८) पहाटेच्या सुमारास गोळीबाराची धक्कादायक घटना घडल्याने परिसरात…

12 तास ago

Video! शिरूर शहरात पहाटे गोळीबार; तरुणाचा मृत्यू…

शिरूर (तेजस फडके) : शिरूर शहरातील लाटेआळी आंबेडकर नगर परिसरात आज (शुक्रवार) सकाळी साडेसहाच्या सुमारास…

2 दिवस ago

भिक्षा देण्यास नकार दिल्याने महिलेवर हल्ला; भिकाऱ्याने नाकाला घेतला चावा

मथुरा : गोवर्धन पर्वताला प्रदक्षिणा घालत असलेल्या एका महिलेने भिक्षा देण्यास नकार दिल्याने संतापलेल्या भिकाऱ्याने…

3 दिवस ago

तोंडाला सतत दुर्गंधी येते, दातांना कीड लागते, पाहा ‘असं’ का होत

रोज करायचे काय दिवसातून दोनदा दात घासा. सकाळी आणि रात्री. यामुळे दातांमध्ये काही अडकून राहणार…

3 दिवस ago