मुख्य बातम्या

अखेरच्या दिवशी शक्तीप्रदर्शनाची धग; शिरूर तहसील परिसरात जत्रेचे वातावरण

शिरूर (अरुणकुमार मोटे): जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या अखेरच्या दिवशी शिरूर तालुक्यात राजकीय वातावरण अक्षरशः तापले होते. सर्वच प्रमुख पक्षांसह अपक्ष इच्छुकांनी जोरदार शक्तीप्रदर्शन करत अर्ज दाखल केल्याने तहसील कार्यालय परिसराला जत्रेचे स्वरूप प्राप्त झाले. ढोल-ताशे, घोषणा, वाहनांच्या रांगा आणि कार्यकर्त्यांची प्रचंड गर्दी यामुळे संपूर्ण परिसर गजबजून गेला होता.

शिरूर तालुक्यातील जिल्हा परिषदेच्या ७ गटांसाठी ५३ उमेदवारांनी एकूण ८२ उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत. तर पंचायत समितीच्या १४ गणांसाठी १०५ उमेदवारांनी तब्बल १४७ अर्ज दाखल केले. या मोठ्या संख्येमुळे अनेक गट-गणांमध्ये बहुरंगी व अटीतटीची लढत होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.

अनेक उमेदवारांनी समर्थकांसह भव्य रॅली काढून अर्ज दाखल केले. पक्षचिन्हांचे फलक, नेत्यांची छायाचित्रे आणि घोषणांमुळे शिरूर शहरातील प्रमुख रस्त्यांवर मोठ्या प्रमाणावर वर्दळ निर्माण झाली होती. परिस्थिती नियंत्रणात ठेवण्यासाठी पोलीस प्रशासनालाही विशेष बंदोबस्त ठेवावा लागला.

दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसमधून भाजपमध्ये प्रवेश केलेले राजेंद्र गावडे, त्यांचे पारंपरिक प्रतिस्पर्धी दामूआण्णा घोडे, बाळासाहेब डांगे आणि डॉ. सुभाष पोकळे यांनी टाकळी हाजी–कवठे येमाई जिल्हा परिषद गटातून तूल्यबळ शक्तीप्रदर्शन करत उमेदवारी अर्ज दाखल केले. बेट भागातील ग्रामस्थ, युवक, महिला आणि कार्यकर्त्यांच्या मोठ्या उपस्थितीमुळे हा गट चुरशीचा ठरण्याचे संकेत मिळाले.

दिवंगत माजी आमदार बाबूराव पाचर्णे यांच्या पत्नी मालती पाचर्णे यांनी शिरूर–न्हावरे जिल्हा परिषद गटातून भाजपकडून अर्ज दाखल केला. त्यांच्या रॅलीत बाबूराव पाचर्णे यांचे छायाचित्र असलेले फलक झळकत असल्याने वातावरण भावनिक झाले होते. ‘स्मृतींचा वारसा आणि अनुभवाचा विश्वास’ या भावनिक मुद्द्यांवर ही उमेदवारी आकार घेत असल्याचे दिसून आले.

महिला राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रदेश सचिव तृप्ती सरोदे यांना अधिकृत उमेदवारी न मिळाल्याने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले. अखेर त्यांनी शिंदे शिवसेनेच्या वतीने शिरूर ग्रामीण पंचायत समिती गणातून शक्तीप्रदर्शनासह उमेदवारी अर्ज दाखल केला. त्यांच्या रॅलीत महिला कार्यकर्त्यांची लक्षणीय उपस्थिती होती.

याशिवाय महिला राष्ट्रवादी काँग्रेसच्या जिल्हाध्यक्षा मोनिका हरगुडे, माजी जिल्हा परिषद सदस्या कुसूम मांढरे तसेच भाजपकडून कुसूम खैरे यांनीही आपापल्या गट-गणांतून जोरदार शक्तीप्रदर्शन करत अर्ज दाखल केले. त्यामुळे यंदाच्या निवडणुकीत महिला उमेदवारांचा प्रभाव वाढल्याचे चित्र आहे.

एबी फॉर्मवरून घोळ, अखेरच्या क्षणापर्यंत नाट्य

अनेक गट व गणांमध्ये उमेदवारीचे घोळ शेवटच्या क्षणापर्यंत सुरू होते. काही ठिकाणी एका पक्षाची उमेदवारी दोन उमेदवारांना देण्यात आल्याचे प्रकार समोर आले, तर काही अधिकृत उमेदवारांना वेळेत एबी फॉर्म न मिळाल्याने मोठी धावपळ झाली. तहसील कार्यालय परिसरात पक्षांचे पदाधिकारी एबी फॉर्म घेऊन ठाण मांडून बसल्याचे चित्र दिवसभर दिसून आले.

एकूणच, उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या अखेरच्या दिवशी झालेल्या शक्तीप्रदर्शनामुळे शिरूर तालुक्यातील जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणूक केवळ स्थानिक स्वराज्य संस्थेपुरती न राहता प्रतिष्ठा, अस्तित्व आणि आगामी विधानसभा राजकारणाची नांदी ठरणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

शिवराज मोरे यांच्यावरील हल्ल्याची निष्पक्ष चौकशी करा; विजय वडेट्टीवारांची फडणवीसांकडे मागणी

नागपूर : नागपूर येथे आंदोलनादरम्यान युवक काँग्रेसचे अध्यक्ष शिवराज मोरे यांच्यावर झालेल्या हल्ल्याचे पडसाद उमटले…

7 तास ago

अभियांत्रिकी-पॉलिटेक्निक विद्यार्थ्यांसाठी AI कौशल्यविकासावर भर; रोजगाराच्या संधींसाठी केंद्रीकृत प्लेसमेंट प्लॅटफॉर्म

मुंबई : महाराष्ट्रातील अभियांत्रिकी आणि पॉलिटेक्निक विद्यार्थ्यांची कौशल्य क्षमता, रोजगारक्षमता आणि उद्योगसज्जता वाढविण्यासाठी उद्योगाभिमुख प्रशिक्षण,…

1 दिवस ago

विद्यार्थ्यांच्या तक्रारींचा आता ऑनलाइन निपटारा; DBATUचे ‘Students Grievances Portal’ तातडीने सुरू करण्याचे निर्देश

मुंबई: डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठ, लोणेरे (DBATU) अंतर्गत विद्यार्थ्यांच्या तक्रारी आणि शैक्षणिक समस्यांचे जलद,…

1 दिवस ago

विद्यार्थ्यांच्या कल्पनांना मिळणार ‘स्टार्टअप’ची ताकद! महाराष्ट्रात इन्क्युबेशन सेंटरचे जाळे उभारण्याच्या हालचालींना वेग

मुंबई: विद्यार्थ्यांच्या नवकल्पना, संशोधन आणि उद्योजकतेला व्यापक संधी उपलब्ध करून देत महाराष्ट्राची स्टार्टअप परिसंस्था अधिक सक्षम…

1 दिवस ago

गणेशोत्सवासाठी मुंबई सज्ज; सचिन अहिरांची पालिका अधिकाऱ्यांसोबत आढावा बैठक, विसर्जन व्यवस्थेवर विशेष भर

मुंबई : लाडक्या बाप्पाच्या आगमनाला अवघे काही दिवस शिल्लक राहिल्याने मुंबईत गणेशोत्सवाची लगबग अंतिम टप्प्यात…

1 दिवस ago

लंडनच्या संसदेत ‘जय महाराष्ट्र’चा निनाद; एकनाथ शिंदेंना प्रतिष्ठेचा सन्मान

लंडन: ब्रिटनच्या संसद भवनातील वरिष्ठ सभागृह असलेल्या हाऊस ऑफ लॉर्ड्समध्ये गुरुवारी ‘जय महाराष्ट्र’चा निनाद घुमला. महाराष्ट्राचे…

1 दिवस ago