महाराष्ट्र

15 ऑगस्ट आणि 26 जानेवारी! तिरंगा फडकवण्यामागील महत्त्वाचा फरक

मुंबई: स्वातंत्र्यदिन (15 ऑगस्ट) आणि प्रजासत्ताक दिन (26 जानेवारी) आपल्या सर्वांच्या बालपणातील गोड आठवणींशी निगडीत आहेत. शाळा-कॉलेजमध्ये पांढरे कपडे घालून मैदानात जमून तिरंग्याला सलामी देणे, नंतर मिळणाऱ्या चॉकलेट्सची मजा हे सगळं आजही मनात ताजं राहते. मात्र, या दोन राष्ट्रीय दिवसांवर राष्ट्रध्वज फडकवण्याची पद्धत आणि त्यामागील अर्थ वेगळा असतो, जे अनेकांना माहित नसते.

ध्वजारोहण आणि ध्वज फडकवणे

15 ऑगस्ट (ध्वजारोहण): स्वातंत्र्यदिनी तिरंगा खांबाच्या खाली बांधलेला असतो. तो दोरीच्या साहाय्याने खालून वर नेऊन फडकवला जातो. हा सोहळा ब्रिटिशांचा युनियन जॅक खाली उतरवून भारताचा तिरंगा फडकवल्याचे प्रतीक आहे, म्हणजेच स्वतंत्र राष्ट्राचा उदय.

26 जानेवारी (ध्वज फडकवणे): प्रजासत्ताक दिनी तिरंगा आधीच खांबाच्या वरच्या टोकाला बांधलेला असतो आणि फक्त दोरी ओढून फडकवला जातो. याचा अर्थ भारत आधीच स्वतंत्र असून, संविधानाच्या अंमलबजावणीने तो प्रजासत्ताक राष्ट्र बनला आहे.

पंतप्रधान आणि राष्ट्रपतीची भूमिका

स्वातंत्र्यदिन: लाल किल्ल्यावरून पंतप्रधान ध्वजारोहण करतात. कारण 1947 मध्ये संविधान लागू नव्हते आणि राष्ट्रपती पद अस्तित्वात नव्हते.

प्रजासत्ताक दिन: राजधानी दिल्लीतील कर्तव्य पथावर राष्ट्रपती तिरंगा फडकवतात. राष्ट्रपती हे देशाचे घटनात्मक प्रमुख असल्यामुळे हा सोहळा त्यांना पार पाडण्याचा अधिकार आहे.

स्थळ आणि महत्त्व

15 ऑगस्ट: लाल किल्ला, ऐतिहासिक सोहळा

26 जानेवारी: कर्तव्य पथ, भव्य लष्करी परेडसह

26 जानेवारी 1950 रोजी संविधान लागू झाल्यानंतर भारत खऱ्या अर्थाने गणराज्य बनला. म्हणून 15 ऑगस्ट हा दिवस स्वातंत्र्याचा, तर 26 जानेवारी हा संविधान व लोकशाहीच्या सामर्थ्याचा प्रतीक आहे.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

घोड धरण लुटले जात असताना प्रशासन झोपेत…? दिवसाढवळ्या बेसुमार वाळू उपसा सुरुच

पाटबंधारे विभाग म्हणतो महिनाभरापूर्वीच नावासह यादी पोलिसांना दिली; मग शिरुर पोलिसांच्या कारवाईला मुहूर्त कधी...?  …

1 तास ago

शिष्यवृत्ती परीक्षा व स्पर्धा परीक्षांच्या क्षेत्रात शिरूर तालुका अग्रणी…

शिरूर : पुणे जिल्हा परिषदेच्या मॉडेल स्कूल, गुणवत्ता विकास कार्यक्रम, विद्यार्थ्यांच्या राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय क्षेत्रभेटी…

10 तास ago

शिवराज मोरे यांच्यावरील हल्ल्याची निष्पक्ष चौकशी करा; विजय वडेट्टीवारांची फडणवीसांकडे मागणी

नागपूर : नागपूर येथे आंदोलनादरम्यान युवक काँग्रेसचे अध्यक्ष शिवराज मोरे यांच्यावर झालेल्या हल्ल्याचे पडसाद उमटले…

2 दिवस ago

अभियांत्रिकी-पॉलिटेक्निक विद्यार्थ्यांसाठी AI कौशल्यविकासावर भर; रोजगाराच्या संधींसाठी केंद्रीकृत प्लेसमेंट प्लॅटफॉर्म

मुंबई : महाराष्ट्रातील अभियांत्रिकी आणि पॉलिटेक्निक विद्यार्थ्यांची कौशल्य क्षमता, रोजगारक्षमता आणि उद्योगसज्जता वाढविण्यासाठी उद्योगाभिमुख प्रशिक्षण,…

2 दिवस ago

विद्यार्थ्यांच्या तक्रारींचा आता ऑनलाइन निपटारा; DBATUचे ‘Students Grievances Portal’ तातडीने सुरू करण्याचे निर्देश

मुंबई: डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठ, लोणेरे (DBATU) अंतर्गत विद्यार्थ्यांच्या तक्रारी आणि शैक्षणिक समस्यांचे जलद,…

2 दिवस ago

विद्यार्थ्यांच्या कल्पनांना मिळणार ‘स्टार्टअप’ची ताकद! महाराष्ट्रात इन्क्युबेशन सेंटरचे जाळे उभारण्याच्या हालचालींना वेग

मुंबई: विद्यार्थ्यांच्या नवकल्पना, संशोधन आणि उद्योजकतेला व्यापक संधी उपलब्ध करून देत महाराष्ट्राची स्टार्टअप परिसंस्था अधिक सक्षम…

2 दिवस ago