शिरुर (तेजस फडके): शिरुर तालुक्यातील घोड धरण परिसरात सुरु असलेला बेकायदेशीर वाळू उपसा “लपूनछपून” नव्हे, तर सर्वांच्या डोळ्यासमोर सुरु आहेत. तरीही महसुल विभागातील अधिकारी, पोलिस आणि स्थानिक राजकीय पुढारी यांची भुमिका संशयास्पद ठरत असून, ही मंडळी नेमकी कोणाच्या हितासाठी काम करत आहेत…? असा संतप्त सवाल नागरिक उपस्थित करत आहेत.
महसूल विभागाकडुन कधीतरी एखादी कारवाई, एखादा पंचनामा, दोनचार वाहनांवर दंड एवढ्यावरच सगळा विषय संपवला जातो. मात्र मोठ्या प्रमाणावर चालणाऱ्या या बेकायदेशीर वाळू उपशाकडे जाणीवपुर्वक दुर्लक्ष केले जात असल्याची चर्चा उघडपणे सुरु आहे.
अधिकारी नेमके कुणाच्या आदेशावर काम करतात…? असा प्रश्न आता सर्वसामान्य लोकांना पडला आहे.
महसूलची खरंच कारवाई की फक्त दिखाऊपणा…?
घोड धरण परिसरात कोण कुठे वाळूच्या बोटी लावतो. कुठून वाळूची वाहतूक करतो. हे धरणाच्या कडेला असणाऱ्या गावकऱ्यांसुद्धा माहिती आहे. मग महसूलच्या अधिकाऱ्यांना हे सगळं माहित नाही का…? मग अधिकारी याकडे जाणीवपुर्वक दुर्लक्ष करतात का…? आत्तापर्यंत घोड धरणातील वाळू उपसा करणाऱ्या यांत्रिक बोटीवर पाच ते सहा वेळा कारवाई झाली. पण काही दिवसांतच तेच उद्योग पुन्हा जोमात सुरु होतात. याचा अर्थ कारवाई ही कायद्याची अंमलबजावणी नसून ‘आर्थिक तडजोड’ करण्यासाठी केलेला दिखाऊपणा आहे का…? अशी दबक्या आवाजात सगळीकडे चर्चा सुरु आहे.
राजकीय पुढाऱ्यांची भूमिका संशयाच्या भोवऱ्यात
शिरुर तालुक्यातील अनेक स्थानिक राजकीय पुढारी घोड धरणाच्या प्रश्नावर जाहीरपणे बोलायला तयार नाहीत. निवडणुकीच्या वेळी “पर्यावरण रक्षण”, “जलसुरक्षा” यावर भाषणे देणारे पुढारी, प्रत्यक्षात मात्र या लुटीवर ठाम भूमिका घ्यायला कचरतात. यामागे काही आर्थिक हितसंबंध आहेत का…? वाळू उपसा चालू राहिल्याने महसूल, पोलिस अन काही स्थानिक पुढाऱ्यांना मोठया प्रमाणात ‘लक्ष्मीदर्शन’ होत असल्यामुळेचं वाळू उपसा बंद होत नाही का…? असे प्रश्न नागरिक खुलेआम विचारत आहेत.
(क्रमशः)
नागपूर : नागपूर येथे आंदोलनादरम्यान युवक काँग्रेसचे अध्यक्ष शिवराज मोरे यांच्यावर झालेल्या हल्ल्याचे पडसाद उमटले…
मुंबई : महाराष्ट्रातील अभियांत्रिकी आणि पॉलिटेक्निक विद्यार्थ्यांची कौशल्य क्षमता, रोजगारक्षमता आणि उद्योगसज्जता वाढविण्यासाठी उद्योगाभिमुख प्रशिक्षण,…
मुंबई: डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठ, लोणेरे (DBATU) अंतर्गत विद्यार्थ्यांच्या तक्रारी आणि शैक्षणिक समस्यांचे जलद,…
मुंबई: विद्यार्थ्यांच्या नवकल्पना, संशोधन आणि उद्योजकतेला व्यापक संधी उपलब्ध करून देत महाराष्ट्राची स्टार्टअप परिसंस्था अधिक सक्षम…
मुंबई : लाडक्या बाप्पाच्या आगमनाला अवघे काही दिवस शिल्लक राहिल्याने मुंबईत गणेशोत्सवाची लगबग अंतिम टप्प्यात…
लंडन: ब्रिटनच्या संसद भवनातील वरिष्ठ सभागृह असलेल्या हाऊस ऑफ लॉर्ड्समध्ये गुरुवारी ‘जय महाराष्ट्र’चा निनाद घुमला. महाराष्ट्राचे…