मुख्य बातम्या

रांजणगाव MIDC तील फ्रेसोनिअस काबी कंपनीच्या कामगारांचे उपोषण मागे

शिरुर (तेजस फडके): रांजणगाव MIDC तील रांजणगाव औद्योगिक वसाहतीत फ्रेसोनिअस काबी कंपनीत मानवी हक्काचे उल्लंघन होत असल्याने या कंपनी व्यवस्थापनाच्या विरोधात शिरुर तहसील कार्यालयासमोर सोमनाथ भगत यांनी न्याय मिळण्यासाठी आमरण उपोषणाला सुरुवात केली होती. त्यांच्या उपोषणाला भीम आर्मी भारत एकता मिशनच्या वतीने जाहीर पाठिंबा दिला होता. तसेच या उपोषणाला तालुक्यातील अनेक राजकीय पाठिंबा दिला होता. पुणे येथील सहायक कामगार आयुक्त एम ए मुजावर यांनी कामागारांच्या मागण्या, अटी मान्य केल्याने हे उपोषण थांबविण्यात आले आहे.

शनिवार (दि 10) पासुन सोमनाथ भगत यांनी शिरुर तहसीलदार कार्यालयासमोर आमरण उपोषणाला सुरवात केली होती. सोमनाथ भगत कंपनीचे इतर कर्मचारी हे भारत एकता मिशन यांच्या भीम आर्मीचे सदस्य असल्याने भीम आर्मीचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष सिताराम गंगावणे, पुणे जिल्हा उपाध्यक्ष रियाज शेख, शिरुर तालुका प्रभारी संदिप शेलार, शिरुर तालुकाध्यक्ष अजित नरवडे, शिरुर तालुका महिलाध्यक्ष दिपिका भालेराव, महिला नेत्या मंजुषा कुलकर्णी तसेच अनेक कार्यकर्त्यांनी या उपोषणास पाठिंबा दर्शवला होता.

शिरुरचे पोलिस निरीक्षक सुरेशकुमार राऊत, नायब तहसीलदार स्नेहा गिरीगोसावी यांनी या आंदोलकांची भेट घेत कामगार आयुक्त यांच्याशी याबाबत पाठपुरावा केला होता. तसेच जनता दलाचे प्रदेशाध्यक्ष नाथा शेवाळे, मानव विकास परीषदेचे प्रदेशाध्यक्ष संदीप कुटे, ठाकरे गट युवासेनेचे जिल्हाध्यक्ष संदीप शिंदे, ठाकरे गटाचे तालुकाप्रमुख पोपट शेलार, उपतालुका प्रमुख अनिल पवार आदी विविध पक्षाच्या राजकीय नेत्यांनीही उपोषण करणाऱ्या कामगारांची भेट घेऊन पाठिंबा दिला होता.

त्याच अनुषंगाने सोमनाथ भगत यांच्या उपोषणाची तातडीने दखल घेत सहायक कामगार आयुक्त एम ए मुजावर यांनी कामागारांच्या मागण्या व अटी मान्य केल्या असल्याने आज हे उपोषण सोडण्यात आले. यावेळी पोलिस निरीक्षक सुरेशकुमार राऊत, भीम आर्मीचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष सिताराम गंगावणे, शिरूर तालुका प्रभारी संदिप शेलार, शिरूर तालुकाध्यक्ष दिपिका भालेराव, महिला नेत्या मंजुषा कुलकर्णी, मानव विकास परीषदेचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष संदीप कुटे आदी उपस्थित होते.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

Video! शिरूर शहरात पहाटे गोळीबार; तरुणाचा मृत्यू…

शिरूर (तेजस फडके) : शिरूर शहरातील लाटेआळी आंबेडकर नगर परिसरात आज (शुक्रवार) सकाळी साडेसहाच्या सुमारास…

10 तास ago

भिक्षा देण्यास नकार दिल्याने महिलेवर हल्ला; भिकाऱ्याने नाकाला घेतला चावा

मथुरा : गोवर्धन पर्वताला प्रदक्षिणा घालत असलेल्या एका महिलेने भिक्षा देण्यास नकार दिल्याने संतापलेल्या भिकाऱ्याने…

1 दिवस ago

तोंडाला सतत दुर्गंधी येते, दातांना कीड लागते, पाहा ‘असं’ का होत

रोज करायचे काय दिवसातून दोनदा दात घासा. सकाळी आणि रात्री. यामुळे दातांमध्ये काही अडकून राहणार…

1 दिवस ago

तापमान वाढीमुळे बंद पडू शकतं तुमचं हृदय, वाचा हार्ट अटॅकचा धोका जास्त कुणाला

वाढत्या तापमानाचा हृदयावर प्रभाव  हीटवेव किंवा जास्त तापमानामुळे कार्डिओवस्कुलर सिस्टीमवर प्रभाव पडतो, ज्यामुळे हार्ट अटॅकचा…

1 दिवस ago

गव्हाच्या पिठामध्ये ‘या’ ५ गोष्टी मिसळा आरोग्य राहिल निरोगी

अनेक भारतीय पदार्थांमध्ये गव्हाच्या पीठचा वापर केला जातो. गव्हाच्या पीठपासून चपाती किंवा मिठाई असे अनेक…

1 दिवस ago

नितीन नबीन यांची सुनेत्रा पवार यांची सदिच्छा भेट; महाराष्ट्रातील विकासकामांवर चर्चा

मुंबई: भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नबीन यांनी बुधवारी मुंबईतील देवगिरी या शासकीय निवासस्थानी…

1 दिवस ago