मुख्य बातम्या

वयाच्या ६१ व्या वर्षी ‘वकील’ झालेल्या बाबुरावकाका पाचंगे यांचं प्रेरणादायी यश

संपूर्ण समाजासाठी आदर्श ठरणारं उदाहरण

शिरूर (अरुणकुमार मोटे): शिरूर तालुक्यातील शक्ती प्रिंटर्सचे मालक, तसेच भारतीय जनता पक्षाचे तालुका संपर्कप्रमुख बाबुरावकाका पाचंगे यांनी आपल्या जीवनप्रवासात एक नवा अध्याय जोडला आहे. वयाच्या ६१ व्या वर्षी एल.एल.बी. (वकीली)ची परीक्षा यशस्वीरित्या उत्तीर्ण करत त्यांनी “वय म्हणजे केवळ एक आकडा असतो” हे प्रत्यक्ष कृतीतून सिद्ध केलं आहे. त्यांच्या या यशामुळे शिरूर परिसरात आणि तालुकाभरातून त्यांचं सर्वत्र कौतुक होत आहे.

बाबुरावकाकांचा जीवनप्रवास हा संघर्षांनी भरलेला असला तरी त्यांनी कधीही हार मानली नाही. आपल्या व्यावसायिक जबाबदाऱ्या आणि सामाजिक कार्य सांभाळून त्यांनी शिक्षणाची धग मनात जागवली आणि चिकाटीने एल.एल.बी.चे शिक्षण पूर्ण केलं. त्यांच्या शब्दात सांगायचं झालं, तर “शिकण्याला वयाचं बंधन नसतं. प्रयत्नात सातत्य असेल, तर कोणतीही गोष्ट अशक्य नाही.”

विशेष म्हणजे, बाबुरावकाकांचा ६१ वा वाढदिवस साजरा होत असतानाच एल.एल.बी.चा निकाल जाहीर झाला आणि त्यात त्यांनी उत्तम यश संपादन केलं. त्यामुळे हा दिवस त्यांच्या आयुष्यात दुहेरी आनंदाचा ठरला.

वाढदिवसाचा उत्सव आणि वकिलीच्या यशाची गोड बातमी

या यशानंतर प्रतिक्रिया देताना बाबुरावकाकांनी स्पष्टपणे सांगितलं –”मी माझ्या वकिलीच्या माध्यमातून समाजातील गरजू, गरीब आणि वंचित घटकांसाठी विनामूल्य सेवा देणार आहे. तसेच भारतीय जनता पक्षाच्या पदाधिकाऱ्यांना आणि कार्यकर्त्यांना कायदेशीर मदतीसाठी मी नेहमी उपलब्ध राहणार आहे.”

बाबुरावकाका हे सामाजिक जाणिवा असलेले, नम्र, स्पष्टवक्ते आणि सेवाभावी वृत्तीचे कार्यकर्ते आहेत. त्यांच्या या गुणांमुळे त्यांचं स्थान तालुक्यात विशेष आहे. आता त्यांचं नाव फक्त “बाबुरावकाका पाचंगे” न राहता, “ॲड. बाबुरावकाका पाचंगे” म्हणून ओळखलं जाईल, याचा संपूर्ण शिरूर तालुक्याला अभिमान आहे.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

घोड धरण लुटले जात असताना प्रशासन झोपेत…? दिवसाढवळ्या बेसुमार वाळू उपसा सुरुच

पाटबंधारे विभाग म्हणतो महिनाभरापूर्वीच नावासह यादी पोलिसांना दिली; मग शिरुर पोलिसांच्या कारवाईला मुहूर्त कधी...?  …

4 तास ago

शिष्यवृत्ती परीक्षा व स्पर्धा परीक्षांच्या क्षेत्रात शिरूर तालुका अग्रणी…

शिरूर : पुणे जिल्हा परिषदेच्या मॉडेल स्कूल, गुणवत्ता विकास कार्यक्रम, विद्यार्थ्यांच्या राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय क्षेत्रभेटी…

12 तास ago

शिवराज मोरे यांच्यावरील हल्ल्याची निष्पक्ष चौकशी करा; विजय वडेट्टीवारांची फडणवीसांकडे मागणी

नागपूर : नागपूर येथे आंदोलनादरम्यान युवक काँग्रेसचे अध्यक्ष शिवराज मोरे यांच्यावर झालेल्या हल्ल्याचे पडसाद उमटले…

2 दिवस ago

अभियांत्रिकी-पॉलिटेक्निक विद्यार्थ्यांसाठी AI कौशल्यविकासावर भर; रोजगाराच्या संधींसाठी केंद्रीकृत प्लेसमेंट प्लॅटफॉर्म

मुंबई : महाराष्ट्रातील अभियांत्रिकी आणि पॉलिटेक्निक विद्यार्थ्यांची कौशल्य क्षमता, रोजगारक्षमता आणि उद्योगसज्जता वाढविण्यासाठी उद्योगाभिमुख प्रशिक्षण,…

2 दिवस ago

विद्यार्थ्यांच्या तक्रारींचा आता ऑनलाइन निपटारा; DBATUचे ‘Students Grievances Portal’ तातडीने सुरू करण्याचे निर्देश

मुंबई: डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठ, लोणेरे (DBATU) अंतर्गत विद्यार्थ्यांच्या तक्रारी आणि शैक्षणिक समस्यांचे जलद,…

2 दिवस ago

विद्यार्थ्यांच्या कल्पनांना मिळणार ‘स्टार्टअप’ची ताकद! महाराष्ट्रात इन्क्युबेशन सेंटरचे जाळे उभारण्याच्या हालचालींना वेग

मुंबई: विद्यार्थ्यांच्या नवकल्पना, संशोधन आणि उद्योजकतेला व्यापक संधी उपलब्ध करून देत महाराष्ट्राची स्टार्टअप परिसंस्था अधिक सक्षम…

2 दिवस ago