मुंबई: मुंबई टी २० लीग २०२५ ही बहुप्रतिक्षित क्रिकेट स्पर्धा ४ जून २०२५ पासून भव्य स्वरूपात सुरू होत आहे. मुंबई क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष अजिंक्य नाईक आणि मुंबई टी२० लीगचे चेअरमन विहंग सरनाईक यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री श्री. देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री श्री. एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री श्री. अजित पवार यांना या स्पर्धेच्या उद्घाटनाचे आमंत्रण दिले.
रोहित शर्माला या लीगचा मुख्य चेहरा बनवण्यात आला असून या वर्षीच्या लीगमध्ये सूर्यकुमार यादव, श्रेयस अय्यर, अजिंक्य रहाणे, शिवम दुबे, शार्दुल ठाकूर यांसारखे खेळाडू चांगली कामगिरी करताना दिसणार आहेत. वानखेडे स्टेडियम आणि डी. वाय. पाटील स्टेडियम येथे हे सामने आयोजित केले आहे. एकूण ८ संघ या प्रतिष्ठित स्पर्धेत सहभागी होत आहेत. लीगसाठी जोरदार तयारी करण्यात आली असून, क्रिकेटप्रेमींना यंदा एक रोमांचक आणि दर्जेदार क्रिकेट सामन्यांचा अनुभव मिळणार आहे.
गेल्या काही वर्षांपासून मुंबई टी२० लीगने स्थानिक पातळीवर असलेल्या अनेक उदयोन्मुख खेळाडूंना मोठ्या व्यासपीठावर आणले आहे. अनेक तरुणांनी या लीगमधून प्रेरणा घेत देशांतर्गत व आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये दमदार कामगिरी केली आहे. या भव्य क्रिकेट महोत्सवाची प्रतीक्षा आता सर्वत्र सुरू झाली असून, आजपासून मुंबईत क्रिकेटचे खरे पर्व सुरू होणार आहे.
शिरुर (तेजस फडके) घोड धरणाच्या परिसरात दिवसाढवळ्या बेकायदेशीर वाळूउपशाचा धडाका सुरुच असुन घोड धरणाच्या सुरक्षेचा…
रांजणगाव गणपती (तेजस फडके) रांजणगाव गणपती गावच्या हद्दीत जुन्या भांडणाच्या कारणावरुन एका १९ वर्षीय तरुणासह…
शिरूर (तेजस फडके): शिरूर शहरात शुक्रवारी (ता. १८) पहाटेच्या सुमारास गोळीबाराची धक्कादायक घटना घडल्याने परिसरात…
शिरूर (तेजस फडके) : शिरूर शहरातील लाटेआळी आंबेडकर नगर परिसरात आज (शुक्रवार) सकाळी साडेसहाच्या सुमारास…
मथुरा : गोवर्धन पर्वताला प्रदक्षिणा घालत असलेल्या एका महिलेने भिक्षा देण्यास नकार दिल्याने संतापलेल्या भिकाऱ्याने…
रोज करायचे काय दिवसातून दोनदा दात घासा. सकाळी आणि रात्री. यामुळे दातांमध्ये काही अडकून राहणार…