मुख्य बातम्या

त्या युवा उदयोजकांनी स्वयंरोजगाराचे धडे गिरवत शेती औजारे बनविण्यातून घेतली उभारी

शिरुर (अरुणकुमार मोटे): सविंदणे (ता. शिरुर) येथील विकास किठे, गोविंद किठे या दोन तरुण बंधुनी वेल्डिंग व्यवसायात स्वयंरोजगाराचे धडे गिरवत नोकरीच्या पाठीमागे न लागता स्वताचा अर्थपुर्ण हिशोब करत ते चांगला रोजगार मिळवत आहेत. या व्यवसायात नेत्रदिपक भरारी घेत शेती उपयोगी औजारे बनवून या व्यवसायात त्यांनी मोठा हातखंडा निर्माण केला आहे. या मध्ये ट्रक्टरची ट्रॉली, नांगर, फनणी, पिकअप बॉडी, पेरणी यंत्र अशी विविध औजार यंत्रे ते किफायतशीर दरात बनवून विकत असल्याने नोकरीच्या पाठीमागे न लागता चांगला स्वंयरोजगार निर्माण केला जाऊ शकतो हे त्यांनी दाखवून दिले आहे. या कामी त्यांना त्यांचे वडील प्रकाश किठे यांचे वेळोवेळी मार्गदर्शन लाभत आहे.

सविंदणे, कवठे येमाई, मलठण, टाकळी हाजी सहशिरुर तालुक्यातील पाश्चिम भागात व आंबेगाव तालुक्यातील पोंदेवाडी,लाखणगाव या भागातून शेतकरी शेतीपयोगी वस्तू बनवून घेण्यासाठी मोठया प्रमाणात गर्दी करत आहे. शिरुर -नारायणगाव अष्टविनायक रस्त्यावरील सविंदणे येथे त्यांनी भैरवनाथ अॅग्रो इंजि.वर्क्स अॅन्ड बॉल्डी बिल्डर्स या नावाने दुकान सुरु केले असून चांगल्या दर्जाची अवजारे माफक दरात देत असल्याने शेतकरी त्यांच्याकडे औजारे बनवून घेण्यासाठी गर्दी करू लागले आहे. त्यामुळे त्यांनी या व्यावसायातून मांडलेला हा जीवनप्रवास ग्रामीण भागातील तरुणांसाठी नक्कीच प्रेरणादायी आहे.

शेतकऱ्यांच्या औजांरासाठी नवीन जुगाड करणारे किठे बंधू हे अगदी कमी खर्चात शेतकऱ्यांना परवडेल अशी औजारे तयार करुन शेतकऱ्यांना कमी खर्चातील औजारे फायदेशीर ठरत आहे. त्यांच्या नावीन पुर्ण उपक्रमामुळे शेतकऱ्यांना शहराकडे न जाता ग्रामीण भागात उपलब्ध होत असल्याने सर्वसामान्य शेतकऱ्यांमध्ये समाधान व्यक्त होत आहे.

वडील परपरांगत वेल्डींग व्यवसाय करत होते. आम्ही दहावीनंतर वेल्डींग व्यवसायात शेती उपयोगी औजारे बनवण्याच्या विचार केला. आम्ही दोघा भावांनी अथक परीश्रम घेत चांगली औजारे बनवण्यात यशस्वी झाल्याने शेतकऱ्यांना त्याचा चांगला लाभ होत आहे..

शिरूर तालुका टीम

Recent Posts

दिवसा घरफोडीचा थरार! शेतात गेलेल्या कुटुंबाचा फायदा घेत १७ तोळे सोन्यावर डल्ला; शिरूर तालुक्यात खळबळ

शिरूर (अरुणकुमार मोटे): शिरूर तालुक्यातील संविदणे गावात भरदिवसा झालेल्या धाडसी घरफोडीने परिसरात भीतीचे वातावरण निर्माण…

4 तास ago

भारतातील सायबर फसवणुकीचा पैसा शिरूरच्या बँकेत; रॅकेट उघडकीस…

शिरूर (अरुणकुमार मोटे) : भारतात सायबर गुन्हेगारीने धोकादायक स्वरूप धारण केले असून, ऑनलाइन फसवणुकीतून उकळलेली…

4 तास ago

शिरूर तालुक्यात पुन्हा बिबट्याच्या हल्ल्यात चिमुकली ठार…

शिरूर (अरुणकुमार मोटे) : शिरूर तालुक्याच्या पूर्व भागातील पिंपळसुटी येथे बुधवारी पहाटे घडलेल्या हृदयद्रावक घटनेने…

4 तास ago

विद्यार्थ्यांच्या आंदोलनात भाजपाला अजेंडाच दिसतो; अण्णा आंदोलनातून भाजपानेच राजकारण केले; हर्षवर्धन सपकाळ

नीट पेपरफुटी, विद्यार्थ्यांवरील लाठीहल्ला आणि मुख्यमंत्र्यांच्या वक्तव्यावर काँग्रेसचा जोरदार पलटवार मुंबई: नीट प्रश्नपत्रिका फुटीच्या प्रकरणावरून…

19 तास ago

विनाअनुदानित महाविद्यालयांच्या प्रश्नांवर सकारात्मक निर्णयाचे संकेत; मंत्री चंद्रकांत पाटील यांची ग्वाही

ग्रामीण, आदिवासी व दुर्गम भागातील महाविद्यालयांना आर्थिक पाठबळ, शुल्कवाढ, मान्यता व कर्मचारी धोरणासह विविध मागण्यांवर…

20 तास ago

शिरुर पोलिसांचा नवीन पॅटर्न; ‘कायद्यात राहाल तर फायद्यात राहाल’ करडे गोळीबार प्रकरणातील आरोपींची काढली धिंड; पाहा Video

शिरुर (तेजस फडके): शिरुर पोलिस ठाण्याच्या हद्दीत वाढत्या गुन्हेगारीमुळे पोलिसांच्या कार्यक्षमतेवर सातत्याने प्रश्नचिन्ह उपस्थित होत…

20 तास ago