क्राईम

फटाके फोडण्यास मज्जाव केल्याने आण्णापूर येथे एकावर सपासप वार

शिरुर (अरुणकुमार मोटे): आण्णापूर (ता. शिरुर) येथील गणेश युवराज शिंदे या युवकाने आरोपी माऊली उर्फ ज्ञानेश्वर रंभाजी कुरुंदळे याला फटाके फोडण्यास मज्जाव केल्याने आरोपी माऊली करंदळे याने चिडून फिर्यादी गणेश शिंदे याच्यावर चाकूने सपासप वार करुन गंभीर जखमी केले आहे.

याबाबत सविस्तर हकीकत अशी की, (दि. 28) रोजी सायंकाळी 6:30 ते 07 वाजण्याच्या सुमारास फिर्यादी व त्याची मुले पिण्यासाठी पाणी आणण्यासाठी आण्णापुर ग्रामपंचायत कार्यालय येथे गेलो असता त्याच गावातील माऊली उर्फ ज्ञानेश्वर रंभाजी कुरंदळे रा. आण्णापुर (ता. शिरुर) हा मोठमोठ्या आवाजात फटाके फोडत असताना फिर्यादीची दोन्ही मुले घाबरुन रडू लागल्याने फिर्यादीने आरोपीला पाणी भरल्यानंतर फटाके फोड असे बोलल्याने तुझ्या बापाची जागा आहे का? मी इथेच फटाके फोडणार असे म्हणून घरातील धारदार चाकूने फिर्यादीने उजव्या कानाच्या मागील बाजूस डोक्यावर हातावर सपा सपा वार करुन तुला लय मस्ती आली तुला आज संपवतो असे म्हणून फिर्यादीला जीवे मारण्याच्या प्रयत्न केला आहे.

शिरुर पोलिस स्टेशनमध्ये कायदेशीर फिर्याद दाखल झाली असून पोलिस उपनिरीक्षक अभिजित पवार यांनी तात्काळ आरोपीला अटक केली आहे. पुढील तपास -पोलिस उपनिरीक्षक सुनिल उगले हे करत आहे. शिरुर पोलिस स्टेशन हद्दीत जमिनीच्या, ठेकेदारीच्या वादातून अनेक गंभीर गुन्हे वारंवार घडत आहे.आरोपींना जरब बसवण्यासाठी कठोर कारवाई होणे गरजेचे आहे.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

Video! शिरूर शहरात पहाटे गोळीबार; तरुणाचा मृत्यू…

शिरूर (तेजस फडके) : शिरूर शहरातील लाटेआळी आंबेडकर नगर परिसरात आज (शुक्रवार) सकाळी साडेसहाच्या सुमारास…

13 तास ago

भिक्षा देण्यास नकार दिल्याने महिलेवर हल्ला; भिकाऱ्याने नाकाला घेतला चावा

मथुरा : गोवर्धन पर्वताला प्रदक्षिणा घालत असलेल्या एका महिलेने भिक्षा देण्यास नकार दिल्याने संतापलेल्या भिकाऱ्याने…

2 दिवस ago

तोंडाला सतत दुर्गंधी येते, दातांना कीड लागते, पाहा ‘असं’ का होत

रोज करायचे काय दिवसातून दोनदा दात घासा. सकाळी आणि रात्री. यामुळे दातांमध्ये काही अडकून राहणार…

2 दिवस ago

तापमान वाढीमुळे बंद पडू शकतं तुमचं हृदय, वाचा हार्ट अटॅकचा धोका जास्त कुणाला

वाढत्या तापमानाचा हृदयावर प्रभाव  हीटवेव किंवा जास्त तापमानामुळे कार्डिओवस्कुलर सिस्टीमवर प्रभाव पडतो, ज्यामुळे हार्ट अटॅकचा…

2 दिवस ago

गव्हाच्या पिठामध्ये ‘या’ ५ गोष्टी मिसळा आरोग्य राहिल निरोगी

अनेक भारतीय पदार्थांमध्ये गव्हाच्या पीठचा वापर केला जातो. गव्हाच्या पीठपासून चपाती किंवा मिठाई असे अनेक…

2 दिवस ago

नितीन नबीन यांची सुनेत्रा पवार यांची सदिच्छा भेट; महाराष्ट्रातील विकासकामांवर चर्चा

मुंबई: भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नबीन यांनी बुधवारी मुंबईतील देवगिरी या शासकीय निवासस्थानी…

2 दिवस ago