शिरुर (तेजस फडके): गृह विभाग आणि भारत सरकारकडुन क्लिष्ट व अतिशय गंभीर गुन्हयांच्या उत्कृष्ट तपासाकरीता दरवर्षी “केंद्रीय गृहमंत्री पदक” देण्यात येते पुणे ग्रामीण पोलीस दलातील तीन अधिकाऱ्यांना सन २०२२ साठी हे पदक जाहीर झाले असुन लोणावळ्याचे पोलीस निरीक्षक दिलीप पवार, शिरुरचे पोलीस निरीक्षक सुरेशकुमार राऊत तसेच वेल्ह्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक मनोज पवार यांचा यात समावेश आहे. भारत सरकारच्या गृह विभागाकडून “केंद्रीय गृहमंत्री पदक” साठी महाराष्ट्र पोलीस दलास दरवर्षी एकुण ११ पदके प्रदान केली जातात. पुणे ग्रामीण पोलीस दलाकडुन क्लिष्ट व अतिशय गंभीर गुन्हयांचा उत्कृष्ट तपास करणाच्या एकुण ४ तपासी अधिकाऱ्यांच्या नावाचा प्रस्ताव केंद्र शासनास पाठविण्यात आला होता त्यापैकी ३ तपासी अधिकाऱ्यांना आज (दि १२) रोजी हा पुरस्कार जाहिर झाला आहे.
शिरुरचे पोलीस निरीक्षक सुरेशकुमार राऊत यांच्या पोलीस ठाण्यात भा.द.वि. कलम ३९५ सह भारतीय हत्यार कायदा कलम ३ (२५) गुन्हा दाखल होता. या गुन्हयामध्ये आरोपींनी पिंपरखेड येथील बँक ऑफ महाराष्ट्र, येथील बँकेचे कर्मचारी आणि तिथे उपस्थित असलेल्या ग्राहकांना पिस्तुलाचा धाक दाखवत एकुण ८२४ तोळे सोन्याचे चांदीचे दागिने आणि ३२ लाख ५२ हजार ५६० रुपये रोख रक्कम असा ऐवज लुटुन नेला होता. हा गुन्हा उघड करुन आरोपीस अटक करणे हे पुणे ग्रामीण पोलीस दलासमोर मोठे आव्हान होते. सदर गुन्हयाचा शिरुर पोलीस स्टेशन तसेच स्थानिक गुन्हे अन्वेषन शाखा यांनी समांतर तपास करुन या गुन्हयामध्ये एकूण २ कोटी ३६ लाख ४२ हजार ९६० रुपये किंमतीचा मुद्देमाल हस्तगत करुन ५ आरोपींच्या आरोपींच्या मुसक्या आवळल्या होत्या. या गुन्हयाच्या तपासा दरम्यान त्यांनी व त्यांच्या सोबतच्या पथकाने अहोरात्र अथक परिश्रम करुन गुन्हा उघडकीस आणला आहे.
दुसरे पोलीस निरीक्षक दिलीप पवार हे लोणावळा शहर येथे प्रभारी अधिकारी असतांना लोणावळा शहर पोलीस ठाण्यात भा.द.वि. कलम ३९५,१२० (ब) अन्वये गुन्हा दाखल होता. सदरच्या गुन्हयात आरोपींनी लोणावळा येथे राहणाऱ्या डॉ. खंडेलवाल यांच्या घरात दारोडा टाकला होता. या गुन्हयात मध्यप्रदेश येथील आंतरराज्यीय टोळी निष्पन्न झाल्यावर आरोपीना मध्यप्रदेशमधुन अटक करण्यात आली होती. या गुन्हयाच्या अनुषंगाने तपासा दरम्यान वरीष्ठ अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली दिलीप पवार आणि त्यांच्या पथकाने गुन्हा घडल्याच्या तारखेपासून अहोरात्र अथक परीश्रम करुन १० दिवसाच्या आत गुन्हयाची उकल करत तपास पथकाने एकुण १५ आरोपींना अटक करत गुन्हयात गेलेला एकुण ३० लाख ५२ हजार २०० रुपये रोख आणि मुद्देमाल हस्तगत केला होता.
तिसरे सहायक पोलीस निरीक्षक मनोज पवार हे वेल्हा येथे प्रभारी अधिकारी असतांना कातकरी समाजाची एक लहान मुलगी हरविलयाने भा.द.वि. कलम ३६३ प्रमाणे गुन्हा दाखल होता. गुन्हा दाखल झाल्यानंतर दुसऱ्याच दिवशी सदरची मुलगी मयत स्थितीत मिळुन आली होती. या मुलीच्या शवविच्छेदन अहवालात डॉक्टरानी तिच्यावर लैंगिक अत्याचार होवुन ती मयत झालयाबाबत अभिप्राय दिला होता. त्यावरून सदर गुन्हयात पोक्सो कायद्याअंतर्गत वाढीव कलम लावण्यात आले होते. सदरचा गुन्हा अतिशय गंभीर स्वरुपाचा असल्याने पुणे ग्रामीणचे पोलीस अधिक्षक डॉ. अभिनव देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली मनोज पवार आणि त्यांच्या पथकाने अथक परीश्रम करुन सी.सी. टी.व्ही फुटेज व साक्षीदार यांच्याकडुन मिळालेल्या माहितीनुसार आरोपीस ४८ तासात जेरबंद केले होते. सदरचा खटला डॉ. अभिनव देशमुख, पोलीस अधीक्षक सो, पुणे ग्रामीण यांच्या विनंतीनुसार जलदगती न्यायालयात चालविला गेला. सदर गुन्हयात आरोपीस न्यायालयाने (दि २८) फेब्रुवारी २०२२ रोजी मरेपर्यंत फाशीची शिक्षा सुनाविली आहे.
त्यामुळे अशा क्लिष्ट व अतिशय गंभीर गुन्हयांचा तपास करतांना पुणे ग्रामीणचे पोलीस अधिक्षक डॉ. अभिनव देशमुख, पुण्याचे अपर पोलीस अधीक्षक मितेश घट्टे, बारामती विभागाचे अपर पोलीस अधीक्षक मिलिंद मोहिते, उपविगीय पोलीस अधिकारी यांचे मार्गदर्शन लाभले असुन “केंद्रीय गृहमंत्री पदक” जाहीर झालेल्या या तिन्ही अधिकाऱ्यांचे वरीष्ठ अधिकाऱ्यांनी विशेष अभिनंदन केले आहे.
बारामती: “दादा… तुम्ही नाही, असं मन आजही मानायला तयार नाही,” अशा भावनिक शब्दांत राष्ट्रवादी काँग्रेसच्या राष्ट्रीय…
निवडणूक आयोगाच्या प्रश्नांची उत्तरे फडणवीस का देतात? आयोगाचे प्रवक्ते आहेत का?; शेतकरी, बेरोजगारीच्या प्रश्नांवर उत्तर…
शिरुर (तेजस फडके) शिरुर तालुक्यात दुष्काळसदृश परिस्थिती निर्माण झाली असुन घोड धरणातील नदीपात्रातील बेकायदेशीर वाळू…
रांजणगाव गणपती (तेजस फडके) पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीची प्रक्रिया सुरु झाली असुन, जिल्ह्यातील…
आरोग्य संतुलित ठेवण्यासाठी अनेकदा डॉक्टर मेडिटेशन करण्याचा सल्ला देतात. मेडिटेशन हे केवळ मानसिक नव्हे तर…
पोटावर वाढलेली चरबी आपला पूर्ण लूक खराब करू शकते. हट्टी बेली फॅट कमी करण्यासाठी बऱ्याच…