मुख्य बातम्या

भरधाव टँकरची दुचाकीला धडक दिल्याने हलाखीच्या जीवनाशी झुंज देणाऱ्या महिलेवर काळाचा घाला

शिक्रापूर (अक्षय टेमगिरे): उदरनिर्वाहासाठी अहोरात्र कष्ट करणाऱ्या टाकळी हाजी ता. शिरूर येथील वंदना कैलास घोडे वय 42 वर्ष या महिलेचा आज रोजी सकाळी सव्वा अकराच्या सुमारास बेल्हा – जेजुरी महामार्गावरील महादेववाडी केंदूर येथे भीषण अपघातात जागीच मृत्यू झाला असुन. टँकरच्या चाकाखाली चिरडल्याने त्यांच्या संघर्षमय जीवनाचा करुण अंत झाला आहे.

पाच – सहा वर्षांपूर्वी झालेल्या पतीच्या अपघाती निधनानंतर दोन मुलींची लग्नं आटोपून, एकुलता एक मुलगा दत्तात्रयच्या सहवासात वंदना घोडे आयुष्याची गाडी रेटत होत्या. घर चालवण्यासाठी टाकळी हाजी येथील बँका, पतसंस्था, सोसायटी, सोनारांची दुकाने, दवाखाने अशा ठिकाणी साफसफाईचं काम करून उदरनिर्वाह करत होत्या. मुलगा दत्तात्रय पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक टाकळी हाजी शाखेत कंत्राटी कामगार म्हणून काम करतो. आजी,आजोबा,वडील आणि आता आई हरपल्याने दत्तात्रय मात्र आता एकटा पडला आहे.

शुक्रवारी बांधकाम मजूर कल्याण योजनेतून पाबळ येथे भांड्यांचे वाटप होत असल्याने वंदना गावातील तरुण लक्ष्मण उर्फ पिंटू घोडे याच्यासोबत दुचाकीवर पाबळला गेल्या , तेथे भांडी उपलब्ध न झाल्याने ते केंदुर कडे चालले होते. मात्र महादेववाडी जवळ त्यांच्या दुचाकीला भरधाव टँकर क्र. एमएच १४ एलएक्स ६४६६ ने धडक दिली. दुचाकी घसरून लक्ष्मण कडेला फेकला गेला, तर वंदना रस्त्यावर पडल्या. यावेळी वेगाने टँकर पुढे गेल्याने चाकाखाली वंदना चिरडल्या गेल्या. त्यांचा जागीच मृत्यू झाला, तर लक्ष्मण गंभीर जखमी झाला.या अपघातानंतर परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. गरिबीवर मात करत पोटाची खळगी भरणाऱ्या वंदना यांचा असा दुर्दैवी अंत झाल्याने संपूर्ण टाकळी हाजी गाव शोकसागरात बुडाले आहे.

अपघाताची माहिती मिळताच टाकळी हाजीचे माजी सरपंच दामूशेठ घोडे, माजी उपसरपंच गोविंद गावडे यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत त्यांना दवाखान्यात हलविले. या प्रकरणी लक्ष्मण गयाभाऊ घोडे यांच्या फिर्यादीवरून शिक्रापूर पोलिसांनी टँकर चालक विश्वनाथ विष्णू ढमाले (रा. कडूस, ता. खेड) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करून त्याला अटक केली आहे. पुढील तपास शिक्रापूर पोलीस करत आहेत.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

लंडनच्या तीन पुरस्कारांचा सन्मान अन् मुंबईत शिवसैनिकांचा जल्लोष

मुंबई: लंडनमध्ये लीडरशिप अवॉर्ड, स्टेट्समनशिप अवॉर्ड आणि महाराष्ट्र ग्लोबल अवॉर्ड अशा तीन पुरस्कारांनी गौरविल्यानंतर उपमुख्यमंत्री एकनाथ…

2 दिवस ago

महाराष्ट्रातील आरोग्य, पर्यावरण आणि सामाजिक विकास प्रकल्पांना सरकारचे पाठबळ

मुंबई: आगा खान डेव्हलपमेंट नेटवर्कच्या माध्यमातून महाराष्ट्रात राबविण्यात येत असलेल्या आरोग्य, शिक्षण, आदिवासी विकास, कौशल्यविकास,…

2 दिवस ago

हाऊस ऑफ कॉमन्समध्ये सोहळा, पण पुरस्कार ब्रिटिश संसदेचा नाही! ‘वर्ल्ड लीडरशिप’ची खरी कुंडली कोण उघडणार?

एकनाथ शिंदेंच्या ‘Statesmanship Award’भोवती पारदर्शकतेचे सवाल; जुनी संस्था आणि २०२४ मध्ये स्थापन झालेल्या नव्या कंपनीत…

2 दिवस ago

घोड धरणाची मालकी नक्की कुणाची…? पाटबंधारे विभाग की वाळु माफिया…? पाटबंधारे विभागाच्या पत्रानंतरही कारवाईचे घोडे अडले कुठे….?

शिरुर (तेजस फडके) शिरुर तालुक्याच्या पुर्व भागातील चिंचणी येथील घोड धरणातुन गेल्या चार ते पाच…

2 दिवस ago

घोड धरण लुटले जात असताना प्रशासन झोपेत…? दिवसाढवळ्या बेसुमार वाळू उपसा सुरुच

पाटबंधारे विभाग म्हणतो महिनाभरापूर्वीच नावासह यादी पोलिसांना दिली; मग शिरुर पोलिसांच्या कारवाईला मुहूर्त कधी...?  …

3 दिवस ago

शिष्यवृत्ती परीक्षा व स्पर्धा परीक्षांच्या क्षेत्रात शिरूर तालुका अग्रणी…

शिरूर : पुणे जिल्हा परिषदेच्या मॉडेल स्कूल, गुणवत्ता विकास कार्यक्रम, विद्यार्थ्यांच्या राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय क्षेत्रभेटी…

3 दिवस ago