शिरूर (अरुणकुमार मोटे): पुणे–नगर महामार्गावरील वाढती वाहतूक कोंडी आता गंभीर बनली असून नागरिकांनी राज्य महामार्ग पोलिसांवर तसेच जिल्हा वाहतूक शाखेवर निष्क्रियतेचे आरोप केले आहेत. वाघोली, लोणीकंद, कोरेगाव भीमा, सणसवाडी, शिक्रापुर, रांजणगाव गणपती, खंडाळे माथा, एल &टी फाटा, कारेगाव अशा ठिकाणी दररोज दोन – दोन कि.मी.भर लांब कोंडीची पुनरावृत्ती होत आहे.
नागरिकांच्या मते, “राज्य महामार्ग पोलिसांचे मुख्य काम अपघातग्रस्तांना मदत करणे, वाहतूक नियंत्रण ठेवणे आणि कोंडी निर्मूलन करणे हे आहे. परंतु प्रत्यक्षात महामार्गावर ट्रॅफिक नियंत्रणाऐवजी बेकायदेशीर वसुलीचे प्रकारच अधिक दिसत आहेत.” कोंडीच्या वेळी या शाखांचे कर्मचारी ठिकाणी आढळत नसल्याची तक्रार सातत्याने होत आहे.
जिल्हा वाहतूक शाखेची परिस्थितीही वेगळी नसून अनेक कर्मचारी महामार्गावर न थांबता संबंधित पोलीस ठाण्याच्या अंतर्गत काम करत असल्याचे नागरिक म्हणतात. “पगार जिल्हा शाखेचा आणि काम पोलीस स्टेशनचे परिणामी प्रत्यक्ष रस्त्यावर वाहतूक नियमनासाठी कोणीच उपलब्ध नसते,” अशी वस्तुस्थिती नागरिकांकडून मांडली जात आहे.
महामार्गावर वाहनांची संख्या झपाट्याने वाढत असताना वाहतूक व्यवस्थापनाची जबाबदारी असलेल्या दोन्ही यंत्रणा ठोस कृती न दाखवल्याने कोंडी, अपघात आणि विलंब यात वाढ झाली आहे. औद्योगिक परिसर वाढल्यामुळे मालवाहतूक मोठ्या प्रमाणात वाढली, तरी त्यानुसार मनुष्यबळाची नियुक्ती, चौकांवरील कर्मचारी तैनाती, सिग्नल व्यवस्थापन आणि ट्रॅफिक शिस्तीसाठी आवश्यक पावले उचलली गेली नाहीत, अशी स्थानिकांची तक्रार आहे.
वाहतूक कोंडीमुळे रुग्णवाहिका, उद्योगातील कामगार, शालेय वाहतूक आणि सामान्य नागरिकांचे हाल होत असून प्रशासनाने तातडीने नियोजनबद्ध उपाययोजना करण्याची गरज व्यक्त केली जात आहे. दरम्यान, या संदर्भात संबंधित वाहतूक विभागांनी नागरिकांच्या आरोपांवर स्पष्ट भूमिका मांडावी आणि तातडीने सक्षम कर्मचारी तैनात करावेत, अशी मागणी होत आहे.
मुंबई: लंडनमध्ये लीडरशिप अवॉर्ड, स्टेट्समनशिप अवॉर्ड आणि महाराष्ट्र ग्लोबल अवॉर्ड अशा तीन पुरस्कारांनी गौरविल्यानंतर उपमुख्यमंत्री एकनाथ…
मुंबई: आगा खान डेव्हलपमेंट नेटवर्कच्या माध्यमातून महाराष्ट्रात राबविण्यात येत असलेल्या आरोग्य, शिक्षण, आदिवासी विकास, कौशल्यविकास,…
एकनाथ शिंदेंच्या ‘Statesmanship Award’भोवती पारदर्शकतेचे सवाल; जुनी संस्था आणि २०२४ मध्ये स्थापन झालेल्या नव्या कंपनीत…
शिरुर (तेजस फडके) शिरुर तालुक्याच्या पुर्व भागातील चिंचणी येथील घोड धरणातुन गेल्या चार ते पाच…
पाटबंधारे विभाग म्हणतो महिनाभरापूर्वीच नावासह यादी पोलिसांना दिली; मग शिरुर पोलिसांच्या कारवाईला मुहूर्त कधी...? …
शिरूर : पुणे जिल्हा परिषदेच्या मॉडेल स्कूल, गुणवत्ता विकास कार्यक्रम, विद्यार्थ्यांच्या राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय क्षेत्रभेटी…