आरोग्य

महिलांचा सर्वात मोठा शत्रू म्हणजे ‘हा’ आजार

जसजशी जीवनशैली बदलतेय तसतसं आजारांचं प्रमाणही वाढलं आहे. विशेषत: महिलांमध्ये. महिलांमध्ये अनेक आजारांचा धोका दिसू लागला आहे. महिलांना ऑस्टियोपोरोसिस, स्तनाचा कर्करोग, गर्भाशयाच्या ग्रीवेचा कर्करोग, मूत्रमार्गाचा संसर्ग आणि ऑटोइम्यून आजारांबद्दल खूप काळजी घेणे आवश्यक आहे. परंतु त्यांना एका आजाराची सर्वाधिक शक्यता असते. हा आजार 15 ते 49 वयोगटातील महिलांना होण्याची शक्यता असते. त्यांना याबाबत खूप काळजी घ्यावी लागते.

15 ते 49 वयोगटातील सुमारे 30 टक्के महिला आणि 37 टक्के गर्भवती महिलांना हा त्रास 

15 ते 49 वयोगटातील सुमारे 30 टक्के महिला आणि 37 टक्के गर्भवती महिलांना अशक्तपणाचा त्रास होतो. मासिक पाळी आणि हार्मोनल बदलांमुळे महिलांना याचा सर्वाधिक त्रास होतो. सर्वात चिंताजनक गोष्ट म्हणजे सुरुवातीलाच लोहाची कमतरता आढळते जी अशक्तपणाचे मुख्य कारण बनते. शरीरात रक्ताची कमतरता खूप धोकादायक असू शकते आणि ती सर्व ऊर्जा त्यामुळे निघून जाते.

महिलांना लगेच थकवा येणे किंवा चक्कर आल्यासारखे वाटते

परिणामी थोडं जरी काम केलं तरी देखील काही महिलांना लगेच थकवा येणे किंवा चक्कर आल्यासारखे वाटते. त्यामुळे त्यांना नेहमीच बेडवर किंवा सोफ्यावर झोपावे किंवा बसावेसे वाटते. तज्ज्ञांच्या मते लोहाच्या कमतरतेची 3 गंभीर लक्षणे असतात. जी कधीकधी डॉक्टर देखील ओळखू शकत नाहीत. ती कोणती तीन लक्षणे आहेत जाणून घेऊयात.

फेरिटिन चाचणी महत्त्वाची आहे

बहुतेक डॉक्टर जेव्हा ही 3 लक्षणे दिसतात तेव्हा लोह पातळी म्हणजे आर्यन लेवलची चाचणी करायला सांगतात परंतु याने आपण लोहाच्या कमतरतेची सुरुवात ओळखू शकत नाही. कधीकधी लोहाची पातळी योग्य असते, परंतु फेरिटिनची पातळी बिघडते. हे एक प्रथिन आहे जे शरीरात लोह साठवते. त्याच्या कमतरतेमुळे देखील ही लक्षणे दिसून येतात.

आर्यनच्या कमतरतेमुळे काय होते?

शरीरात पुरेसे लोह नसल्याने त्याची कमतरता निर्माण होते. लोह लाल रक्तपेशी तयार करण्यास खूप मदत करते. या लाल रक्तपेशींमध्ये हिमोग्लोबिन असते, जे संपूर्ण शरीरात ऑक्सिजन वाहून नेते. अर्थात, लोहाच्या कमतरतेमुळे हिमोग्लोबिन देखील कमी होईल आणि लोहाच्या कमतरतेमुळे अशक्तपणा निर्माण होईल.

तीव्र थकवा

जर एखादी महिला नेहमी थकलेली असेल आणि तिला झोपून राहावेसे वाटत असेल, तर तिच्यात लोहाचे प्रमाण कमी असू शकते. बऱ्याचदा हे लक्षण ओळखता येत नाही. डॉक्टर म्हणतात की कमी ऊर्जा ही दीर्घकालीन थकव्यामुळे होऊ शकते, जी स्वतःच अनेक धोकादायक समस्यांचे लक्षण आहे. कधीकधी हे जास्त ताण घेतल्याने किंवा झोपेचा अभाव यामुळे देखील होऊ शकते.

डोके दुखणे किंवा चक्कर येणे

आर्यनच्या किंवा पोषक तत्वाच्या कमतरतेमुळे चक्कर येण्याची तक्रार उद्भवते. उभे राहून किंवा कोणतीही शारीरिक हालचाल करताना हे सहसा जास्त होते. हे कमी हिमोग्लोबिनचे लक्षण असू शकते, ज्यामुळे शरीरात ऑक्सिजनची कमतरता निर्माण होते.

हात-पाय थंड पडणे

हे लक्षण महिलांमध्ये खूप सामान्य आहे. त्यांचे हात किंवा पाय थंड पडतात. हात आणि पायांमध्ये रक्ताभिसरण नीट होत नसल्याने त्यांना हा त्रास होऊ शकतो. तसेच हे शरीरात आर्यन कमी असल्याचंही लक्षण आहे. जर तुमच्यातही ही 3 लक्षणे दिसत असतील तर घरगुती उपचार न करता किंवा न टाळता डॉक्टरांना नक्की दाखवा आणि त्यांचा सल्ला घ्या तसेच त्यांच्या

(सोशल मीडियावरून साभार)

शिरूर तालुका टीम

Recent Posts

लंडनच्या तीन पुरस्कारांचा सन्मान अन् मुंबईत शिवसैनिकांचा जल्लोष

मुंबई: लंडनमध्ये लीडरशिप अवॉर्ड, स्टेट्समनशिप अवॉर्ड आणि महाराष्ट्र ग्लोबल अवॉर्ड अशा तीन पुरस्कारांनी गौरविल्यानंतर उपमुख्यमंत्री एकनाथ…

10 तास ago

महाराष्ट्रातील आरोग्य, पर्यावरण आणि सामाजिक विकास प्रकल्पांना सरकारचे पाठबळ

मुंबई: आगा खान डेव्हलपमेंट नेटवर्कच्या माध्यमातून महाराष्ट्रात राबविण्यात येत असलेल्या आरोग्य, शिक्षण, आदिवासी विकास, कौशल्यविकास,…

10 तास ago

हाऊस ऑफ कॉमन्समध्ये सोहळा, पण पुरस्कार ब्रिटिश संसदेचा नाही! ‘वर्ल्ड लीडरशिप’ची खरी कुंडली कोण उघडणार?

एकनाथ शिंदेंच्या ‘Statesmanship Award’भोवती पारदर्शकतेचे सवाल; जुनी संस्था आणि २०२४ मध्ये स्थापन झालेल्या नव्या कंपनीत…

11 तास ago

घोड धरणाची मालकी नक्की कुणाची…? पाटबंधारे विभाग की वाळु माफिया…? पाटबंधारे विभागाच्या पत्रानंतरही कारवाईचे घोडे अडले कुठे….?

शिरुर (तेजस फडके) शिरुर तालुक्याच्या पुर्व भागातील चिंचणी येथील घोड धरणातुन गेल्या चार ते पाच…

1 दिवस ago

घोड धरण लुटले जात असताना प्रशासन झोपेत…? दिवसाढवळ्या बेसुमार वाळू उपसा सुरुच

पाटबंधारे विभाग म्हणतो महिनाभरापूर्वीच नावासह यादी पोलिसांना दिली; मग शिरुर पोलिसांच्या कारवाईला मुहूर्त कधी...?  …

2 दिवस ago

शिष्यवृत्ती परीक्षा व स्पर्धा परीक्षांच्या क्षेत्रात शिरूर तालुका अग्रणी…

शिरूर : पुणे जिल्हा परिषदेच्या मॉडेल स्कूल, गुणवत्ता विकास कार्यक्रम, विद्यार्थ्यांच्या राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय क्षेत्रभेटी…

2 दिवस ago