मुख्य बातम्या

कारेगावचे उपसरपंच तुषार नवले यांना लागली प्रभारी सरपंचपदाची लॉटरी…

कारेगाव (तेजस फडके) शिरुर तालुक्यातील कारेगावच्या प्रभारी सरपंचपदी तुषार प्रकाश नवले यांची निवड झाली असुन पुर्वीच्या सरपंच निर्मला शुभम नवले यांनी राजीनामा दिल्याने रिक्त झालेल्या सरपंच पदावर तुषार नवले यांची प्रभारी सरपंच म्हणुन निवड झाली आहे.

सन २०२१ साली झालेल्या कारेगावच्या पंचवार्षिक ग्रामपंचायत निवडणुकीमध्ये तुषार नवले हे आधी सदस्य म्हणुन निवडुन आले होते. त्यानंतर त्यांची उपसरपंच म्हणुन निवड करण्यात आली होती आणि आता कारेगावच्या सरपंच निर्मला नवले यांनी राजीनामा दिल्याने रिक्त झालेल्या पदावर योगायोगाने त्यांची सध्या प्रभारी सरपंच म्हणुन निवड झाली आहे. या निवडीनंतर कारेगाव ग्रामस्थांसह सगळीकडुन तुषार नवले यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

 

कारेगावच्या ग्रामस्थांनी मला आधी ग्रामपंचायत सदस्य म्हणुन संधी दिली. त्यानंतर उपसरपंच म्हणुन मला ग्रामपंचायत मध्ये संधी मिळाली आणि आत्ता प्रभारी सरपंच म्हणुन मला संधी मिळाली आहे. या सर्व मिळालेल्या संधीच मी कारेगावच्या विकासासाठी ‘सोनं’ करणार आहे.

तुषार नवले 

प्रभारी सरपंच (कारेगाव) 

 

 

शिरुर पोलिसांनी गावठी पिस्तुल, एक जिवंत काडतुस बाळगणाऱ्याला केले गजाआड

शिरुर पोलिसांची उत्कृष्ट कामगिरी ४ अल्पवयीन मुलीं, महीला व ६ बेपत्ता मुलींचा शोध घेत केले पालकांच्या स्वाधीन

शिरुर तालुक्यात नॉनव्हेज खाताय…? मग इकडे लक्ष द्याच..

 

शिरूर तालुका टीम

Recent Posts

लंडनच्या तीन पुरस्कारांचा सन्मान अन् मुंबईत शिवसैनिकांचा जल्लोष

मुंबई: लंडनमध्ये लीडरशिप अवॉर्ड, स्टेट्समनशिप अवॉर्ड आणि महाराष्ट्र ग्लोबल अवॉर्ड अशा तीन पुरस्कारांनी गौरविल्यानंतर उपमुख्यमंत्री एकनाथ…

22 तास ago

महाराष्ट्रातील आरोग्य, पर्यावरण आणि सामाजिक विकास प्रकल्पांना सरकारचे पाठबळ

मुंबई: आगा खान डेव्हलपमेंट नेटवर्कच्या माध्यमातून महाराष्ट्रात राबविण्यात येत असलेल्या आरोग्य, शिक्षण, आदिवासी विकास, कौशल्यविकास,…

23 तास ago

हाऊस ऑफ कॉमन्समध्ये सोहळा, पण पुरस्कार ब्रिटिश संसदेचा नाही! ‘वर्ल्ड लीडरशिप’ची खरी कुंडली कोण उघडणार?

एकनाथ शिंदेंच्या ‘Statesmanship Award’भोवती पारदर्शकतेचे सवाल; जुनी संस्था आणि २०२४ मध्ये स्थापन झालेल्या नव्या कंपनीत…

23 तास ago

घोड धरणाची मालकी नक्की कुणाची…? पाटबंधारे विभाग की वाळु माफिया…? पाटबंधारे विभागाच्या पत्रानंतरही कारवाईचे घोडे अडले कुठे….?

शिरुर (तेजस फडके) शिरुर तालुक्याच्या पुर्व भागातील चिंचणी येथील घोड धरणातुन गेल्या चार ते पाच…

2 दिवस ago

घोड धरण लुटले जात असताना प्रशासन झोपेत…? दिवसाढवळ्या बेसुमार वाळू उपसा सुरुच

पाटबंधारे विभाग म्हणतो महिनाभरापूर्वीच नावासह यादी पोलिसांना दिली; मग शिरुर पोलिसांच्या कारवाईला मुहूर्त कधी...?  …

2 दिवस ago

शिष्यवृत्ती परीक्षा व स्पर्धा परीक्षांच्या क्षेत्रात शिरूर तालुका अग्रणी…

शिरूर : पुणे जिल्हा परिषदेच्या मॉडेल स्कूल, गुणवत्ता विकास कार्यक्रम, विद्यार्थ्यांच्या राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय क्षेत्रभेटी…

3 दिवस ago