शिरुर: पुणे -सातारा महामार्गावर बुधवारी मध्यरात्री झालेला अपघात दोघांसाठी जीवघेणा, तर 5 जणांच्या कुटुंबांसाठी खर्चिक ठरला. ट्रक व कारच्या धडकेत शिरूर तालुक्यातील वडगाव रासाई येथील कांचन चंद्रकांत वनशिवे, विरेंद्र चंद्रकांत वनशिवे या मायलेकांना आपला जीव गमवावा लागला.
पारगाव येथे महामार्गावर ही घटना घडली. खंडाळा येथील एका दवाखान्यात या अपघातातील 5 जखमींना उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. बुधवारी रात्री सव्वाअकराच्या सुमारास हा अपघात घडला. अपघातात संकेत भिमाजी चौधरी (वय २२), अनिल मुक्ताराम कुलथे (वय ५५), अंजली अनिल कुलथे (वय ५०), आराध्या अनिल कुलथे (वय ७), स्नेहल पांडुरंग कुलथे (वय ४२) रा. वडगाव रासाई (ता. शिरूर) जि. पुणे यांचा जखमींमध्ये समावेश आहे.
पारगाव येथील रस्त्यालगतच्या चहाच्या टपरीवरचा चहा पिण्यासाठी अनेक वाहने थांबलेली होती. त्याच मार्गाने निघालेल्या कारच्या चालकाचे नियंत्रण सुटल्याने हा अपघात घडला. या घटनेत कारचे मोठे नुकसान झाले. यात कारमधील दोघांचा जागीच मृत्यू झाला. शिरूर तालुक्यातील वडगाव रासाई येथील महिला व १० वर्षाच्या मुलाचा यामध्ये समावेश असून या घटनेत इतरही 5 जण गंभीर जखमी झाले. या अपघातानंतर तिथे धावपळ उडाली. जखमींना नजिकच्या खंडाळ्यातील दवाखान्यात उपचारासाठी दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.
मुंबई : महाराष्ट्रातील अभियांत्रिकी आणि पॉलिटेक्निक विद्यार्थ्यांची कौशल्य क्षमता, रोजगारक्षमता आणि उद्योगसज्जता वाढविण्यासाठी उद्योगाभिमुख प्रशिक्षण,…
मुंबई: डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठ, लोणेरे (DBATU) अंतर्गत विद्यार्थ्यांच्या तक्रारी आणि शैक्षणिक समस्यांचे जलद,…
मुंबई: विद्यार्थ्यांच्या नवकल्पना, संशोधन आणि उद्योजकतेला व्यापक संधी उपलब्ध करून देत महाराष्ट्राची स्टार्टअप परिसंस्था अधिक सक्षम…
मुंबई : लाडक्या बाप्पाच्या आगमनाला अवघे काही दिवस शिल्लक राहिल्याने मुंबईत गणेशोत्सवाची लगबग अंतिम टप्प्यात…
लंडन: ब्रिटनच्या संसद भवनातील वरिष्ठ सभागृह असलेल्या हाऊस ऑफ लॉर्ड्समध्ये गुरुवारी ‘जय महाराष्ट्र’चा निनाद घुमला. महाराष्ट्राचे…
शिरुर (तेजस फडके) सध्या सोन्याचा बाजार दिवसेंदिवस वाढत आहे. व्यक्तीला सोन खरेदी करणं सर्वसामान्य व्यक्तीच्या…