मुख्य बातम्या

हृदयद्रावक; कारेगावमध्ये दोन अल्पवयीन मुलांचा शेततळ्यात बुडून मृत्यू तर दोघांवर उपचार सुरु

रांजणगाव गणपती (अर्जुन शेळके) शिरुर तालुक्यातील कारेगाव परिसरात सोमवार दि २८ जुलै २०२५ रोजी संध्याकाळी पोहण्यासाठी गेलेल्या चार मुलांपैकी दोन मुलांचा पाण्यात बुडून मृत्यू झाला, तर उर्वरित दोघांवर शिरुर येथील खाजगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत. या घटनेमुळे संपुर्ण गावात हळहळ व्यक्त होत आहे.

मृत मुलांची नावे अनमोल उर्फ बाबू प्रविण पवार (वय १३) आणि कृष्णा उमाजी राखे (वय ८, दोघेही रा. कारेगाव) अशी आहेत. हि घटना संध्याकाळी सुमारे ५.४५ च्या सुमारास कारेगाव हद्दीतील बाभुळसर शिवारातील शेततळ्यावर हि दुर्दैवी घटना घडली.

रांजणगाव पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, प्रविण पवार यांची मुले आदेश (१४) आणि अनमोल (१३), तसेच त्यांचे मित्र कृष्णा राखे (८) आणि स्वराज शिरसाठ (१३) हे चौघेही शेततळ्यावर पोहण्यासाठी गेले होते. मात्र यातील अनमोल आणि कृष्णा हे दोघे पाण्यात बुडाले. आसपासच्या तरुणांनी त्यांना पाण्यातुन बाहेर काढले. त्यानंतर त्यांना तातडीने रुग्णालयात नेले असता डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. इतर दोन मुलांवर खाजगी दवाखान्यात उपचार सुरु आहेत.

या दुर्दैवी घटनेमुळे कारेगाव परिसरात शोककळा पसरली असुन रांजणगाव MIDC पोलीस स्टेशनचे पोलीस हवालदार गणेश आगलावे या घटनेचा पुढील अधिक तपास करत आहेत.

हि घटना घडल्यानंतर रांजणगाव MIDC पोलिस स्टेशनचे पोलिस निरीक्षक महादेव वाघमोडे, पोलिस उपनिरीक्षक निळकंठ तिडके, पोलिस हवालदार तेजेस रासकर, पोलिस कॉन्स्टेबल आकाश सवाने, किशोर शिवणकर यांनी भेट दिली.

शिरुर; कंपनी फसवणुक प्रकरणी जिल्हा सत्र न्यायालयाने बाप-लेकीचा जामीन फेटाळला

रांजणगाव औद्योगिक वसाहतीमध्ये ठेकेदारांकडुन कामगारांची होतेय आर्थिक फसवणुक

शिरुर तालुक्यात प्रहार जनशक्ती पक्ष व अपंग क्रांती संघटनेच्या वतीने चक्काजाम आंदोलन

शिरूर तालुका टीम

Recent Posts

भिक्षा देण्यास नकार दिल्याने महिलेवर हल्ला; भिकाऱ्याने नाकाला घेतला चावा

मथुरा : गोवर्धन पर्वताला प्रदक्षिणा घालत असलेल्या एका महिलेने भिक्षा देण्यास नकार दिल्याने संतापलेल्या भिकाऱ्याने…

3 तास ago

तोंडाला सतत दुर्गंधी येते, दातांना कीड लागते, पाहा ‘असं’ का होत

रोज करायचे काय दिवसातून दोनदा दात घासा. सकाळी आणि रात्री. यामुळे दातांमध्ये काही अडकून राहणार…

3 तास ago

तापमान वाढीमुळे बंद पडू शकतं तुमचं हृदय, वाचा हार्ट अटॅकचा धोका जास्त कुणाला

वाढत्या तापमानाचा हृदयावर प्रभाव  हीटवेव किंवा जास्त तापमानामुळे कार्डिओवस्कुलर सिस्टीमवर प्रभाव पडतो, ज्यामुळे हार्ट अटॅकचा…

3 तास ago

गव्हाच्या पिठामध्ये ‘या’ ५ गोष्टी मिसळा आरोग्य राहिल निरोगी

अनेक भारतीय पदार्थांमध्ये गव्हाच्या पीठचा वापर केला जातो. गव्हाच्या पीठपासून चपाती किंवा मिठाई असे अनेक…

3 तास ago

नितीन नबीन यांची सुनेत्रा पवार यांची सदिच्छा भेट; महाराष्ट्रातील विकासकामांवर चर्चा

मुंबई: भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नबीन यांनी बुधवारी मुंबईतील देवगिरी या शासकीय निवासस्थानी…

3 तास ago

‘पंचनाम्यांची वाट कसली पाहता?’ दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना तातडीने मदत द्या; वडेट्टीवारांचा सरकारवर निशाणा

नागपूर: महाराष्ट्रातील दुष्काळाची परिस्थिती दिवसेंदिवस गंभीर होत असून सोयाबीनचे पीक हातचे गेले आहे, तर अनेक…

3 तास ago