रांजणगाव गणपती (तेजस फडके) शिरुर तालुक्यातील पंचतारांकित औद्योगिक वसाहत असलेल्या रांजणगाव MIDC मध्ये राष्ट्रीय तसेच आंतरराष्ट्रीय कंपनीत कामाला लावण्याच आमिष दाखवत परप्रांतीय तसेच विदर्भ, मराठवाडा येथील सुशिक्षित बेरोजगार युवक व युवतींची आर्थिक फसवणुक होत आहे. अशी अनेक प्रकरणे सध्या ‘शिरुर तालुका डॉट कॉम’ कडे येत आहेत.
शिरुर तालुक्यात रांजणगाव MIDC मध्ये अनेक राष्ट्रीय तसेच आंतरराष्ट्रीय कंपन्या आहेत. या कंपनीमध्ये स्वतःच्या पोटाची खळगी भरण्यासाठी भारतातील अनेक राज्यातुन तसेच महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यातुन मोठया प्रमाणात बेरोजगार युवक तसेच युवती येत असतात. अनेकवेळा प्लेसमेंटच्या राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय कंपनीत नोकरीच्या जाहिराती वाचून हे कामगार कामासाठी येतात.
सध्या सोशल मीडियाचा जमाना असल्यामुळे प्लेसमेंटवाले सोशल मीडियावर मोठया प्रमाणात जाहिरातबाजी करुन कामगारांना आकर्षित करतात. जाहिरात करताना रांजणगाव येथील मोठया मोठया आंतरराष्ट्रीय कंपनीत नोकरी, बस तसेच कँटीन, राहण्याची व्यवस्था अशी आश्वासनं दिली जातात. हि जाहिरात वाचून अनेक बेरोजगार कामगार रांजणगाव MIDC मध्ये कामाच्या आशेने येतात.
ठेकेदारांकडुन अशी होतेय कामगारांची फसवणुक…
रांजणगाव औद्योगिक वसाहतीत राष्ट्रीय तसेच आंतरराष्ट्रीय कंपनीत नोकरीची सोशल मीडियावर जाहिरात पाहुन बेरोजगार युवक व युवती रांजणगावला येतात. त्यानंतर प्लेसमेंट वाले सुरवातीला त्यांची मुलाखत घेतात. त्यांच्याकडुन खोलीभाडं, जेवणाच्या नावाखाली सुरवातीला काही रक्कम घेतात. त्यानंतर त्यांना कोणत्या तरी गोडाऊनला कामाला लावतात. तिथे ना बसची सोय असते. ना कँटीन असतं. ना जाहिरातीत दिल्याप्रमाणे कुठलीही सोय असते.
स्थानिक ठेकेदारांकडुन कामगारांवर होतेय दादागिरी…?
राष्ट्रीय तसेच आंतरराष्ट्रीय कंपनीत काम मिळणार हे स्वप्न बघून रांजणगाव MIDC मध्ये आलेल्या कामगारांचा मात्र गोडाऊन मध्ये काम करण्याची वेळ आल्यावर मात्र भ्रमनिरास होतो आणि आपली घोर फसवणूक झाल्याचे त्यांच्या लक्षात येते. मात्र कंपनीतले ठेकेदार हे स्थानिक राजकारणी लोकांचे बगलबच्चे असल्यामुळे ठेकेदार या कामगारांना शिवीगाळ करुन दमदाटी करतात. बऱ्याचवेळा हे कामगार बाहेरच्या राज्यातील किंवा बाहेरच्या जिल्ह्यातील असल्यामुळे घाबरुन पोलिस स्टेशनला तक्रार देण्यासाठी जात नाहीत. त्यामुळे या ठेकेदार लोकांवर काहीच कारवाई होत नसल्यामुळे दिवसेंदिवस आर्थिक फसवणुक करण्याचे प्रकार वाढत चालले आहेत.
तक्रारी अथवा अधिक माहितीसाठी संपर्क :
Mob: 97661 17755
Email : shirurtaluka@gmail.com
(क्रमश:)
रांजणगाव MIDC तील विविध कामात माजी महिला सरपंचाच्या पतीची लुडबुड…?
रांजणगाव MIDC त कामगारांना खोलीत डांबुन ठेवत मारहाण चार जणांविरोधात गुन्हा दाखल; दोन अटकेत
रांजणगाव MIDC त लेबर कॉन्ट्रॅक्टसाठी माजी सरपंचासह चार जणांची कंपनीच्या HR ला मारहाण