मुख्य बातम्या

शिरुर तालुक्यात माथाडीच्या बोगस पावत्या फाडल्याप्रकरणी दोन जणांवर खंडणीचा गुन्हा दाखल

रांजणगाव गणपती (तेजस फडके): शिरुर तालुक्यातील पंचंतारांकित औद्योगिक वसाहत असलेल्या रांजणगाव MIDC मध्ये बोगस माथाडीच्या पावत्या दाखवत जबरदस्तीने खंडणी वसुल केल्याप्रकरणी रांजणगाव MIDC पोलिस स्टेशन मध्ये अमोल शिवाजी मलगुंडे तसेच प्रज्वल दादाभाऊ मलगुंडे दोघेही रा. ढोकसांगवी, ता. शिरुर, जि. पुणे या दोन जणांविरोधात खंडणीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत इम्तियाज मुस्ताक साह (वय 31 वर्षे) मूळ रा. कानामाऊ पो. खुटहन, जि जौनपुर, उत्तर प्रदेश. सध्या रा. कळंबोली खेडोपाडा, नवले नवी मुंबई या वाहनचालकाने याबाबत फिर्याद दाखल केली आहे.

याबाबत रांजणगाव MIDC पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार आज (दि 6) रोजी रांजणगाव MIDC मधील ढोकसांगवी गावच्या हद्दीतील झामिल स्टील इंडिया प्रायव्हेट लिमिडेट या कंपनीच्या गेट बाहेर सकाळी 10 च्या दरम्यान फिर्यादी व ड्रायव्हर नामे मोहम्मद सुलतान वकील खान ट्रक क्रमांक एम एच 46 बी एम 4471 आणि एम एस 46 बी यु 3863 यामध्ये लोखंडी कॉईल भरून जामीन स्टील इंडिया प्रायव्हेट कंपनीमध्ये खाली करण्यासाठी आले असता 1) अमोल शिवाजी मलगुंडे 2) प्रज्वल दादाभाऊ मलगुंडे यांनी फिर्यादी यांना कंपनीमध्ये गाडी खाली करायची असेल तर माथाडी बोर्डाची पावती पाडावी लागेल असे सांगितले आणि त्या दोघांनी संगणमताने एका गाडीचे प्रत्येकी चारशे रुपये याप्रमाणे दोन गाड्यांची एकूण आठशे रुपयांची खंडणी घेऊन त्यांना “जय मल्हार इंडस्ट्रियल सर्व्हिसेस” या नावाने माथाडी बोर्डाचा कोणत्याही प्रकारची सही शिक्का नसलेली बनावट व बोगस पावत्या दिल्या.

त्यामुळे फिर्यादी यांनी रांजणगाव MIDC पोलिस स्टेशन मध्ये जाऊन फिर्याद दाखल केली. त्यानंतर पोलिस निरीक्षक बलवंत मांडगे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक विनोद शिंदे, पोलिस सहायक पोलिस उपनिरीक्षक दत्तात्रय शिंदे, पोलिस हवालदार संतोष औटी, विलास आंबेकर, ब्रम्हा पोवार, पोलिस कॉन्स्टेबल विजय शिंदे, उमेश कुतवळ, पोलिस नाईक, पांडुरंग साबळे यांनी आरोपीना तात्काळ अटक केली.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

अंग दुखण्याची कारणे

थंड हवा थेट अंगावर लागणे: एसी किंवा फॅनची हवा जर थेट तुमच्या शरीरावर येत असेल,…

10 तास ago

केस खूपच पातळ झाले-जराही वाढत नाही? हे ५ पदार्थ खा, विंचरताना कंटाळा येईल इतके वाढतील केस

केस नैसर्गिकरित्या काळे राहण्यासाठी आणि केस वाढवण्यासाठी खास डाएट फॉलो करणंही गरजेचं असतं. केसांना पोषण…

10 तास ago

शिक्षक दिनानिमित्त गुणवंत शिक्षकांचा सन्मान; विजय सावंत यांना लायन्स क्लब शिक्षक पुरस्कार

मुंबई : शिक्षक दिनानिमित्त अभ्युदय येथील शिवाजी विद्यालयात लायन्स क्लब ऑफ मीडटाऊनच्या वतीने मुंबईतील उपक्रमशील…

10 तास ago

गणेशभक्तांसाठी शिवसेनेची मोठी घोषणा; २९०० एसटी बसची मोफत व्यवस्था

मुंबई : गणेशोत्सवासाठी कोकणासह पश्चिम महाराष्ट्रातील आपल्या गावी जाणाऱ्या गणेशभक्तांचा प्रवास सुखकर आणि आरामदायी व्हावा,…

10 तास ago

नगराध्यक्षांच्या स्वाक्षरीचा संभ्रम अखेर दूर; नमुना क्र. ६४ वर आता मुख्याधिकाऱ्यांचीच अंतिम सही

मुंबई : राज्यातील नगरपालिका आणि नगरपंचायतींच्या आर्थिक व्यवहारात वापरल्या जाणाऱ्या नमुना क्र. ६४ वर नगराध्यक्षांची…

11 तास ago

अपुऱ्या पावसाने शेतकरी संकटात; धीरज देशमुखांची सरकारकडे विशेष दुष्काळ पॅकेजची मागणी

लातूर : राज्यातील अनेक भागांत पावसाचा मोठा खंड, अपुरा व अनियमित पाऊस तसेच अल निनोच्या…

1 दिवस ago