मुख्य बातम्या

शिरुर तालुक्यातील ‘एम डी’ ड्रग प्रकरणात मोठ्या ‘माशां’वर कारवाई कधी…?

शिरुर (तेजस फडके) शिरुर तालुका सध्या एमडी ड्रगच्या विळख्यात अडकत चालल्याचे चित्र दिवसेंदिवस स्पष्ट होत आहे. पोलिसांनी लहान-मोठ्या पेडलर्सना अटक करून लाखो-कोट्यवधींचा मुद्देमाल जप्त केला. मात्र या संपुर्ण रॅकेटमागील खरे सुत्रधार अजुनही मोकाट असल्याची सध्या सगळीकडे दबक्या आवाजात चर्चा सुरु आहे. “पोलिसांच्या हाताशी लागले ते फक्त प्यादे असुन या खेळातील ‘किंग’ कोण…?” असा संतप्त सवाल सर्वसामान्य नागरिक विचारत आहेत.

काही दिवसांपुर्वी शिरुर परिसरातुन ४७.६० ग्रॅम एमडी ड्रग जप्त करत तीन आरोपींना पुणे ग्रामीण पोलिसांनी अटक केली. या कारवाईत तब्बल २१.५२ लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. विशेष म्हणजे आरोपी ऑनलाइन डिलिव्हरी ॲपच्या माध्यमातुन एमडी पुरवत असल्याचा धक्कादायक खुलासा पोलिस तपासात झाला आहे. पोलिसांचा तपास जसजसा पुढे गेला, तसतसे या रॅकेटची मुळे खोलवर रुजल्याचे समोर आले. 

शिरुर मधील एका गॅरेज चालकाकडे सुरवातीला एमडी ड्रग सापडल्यानंतर थेट पोलिस यंत्रणेशी संबंधित धागेदोरे उघड झाले. त्या प्रकरणात अहिल्यानगर पोलिस दलातील एका पोलिस कर्मचाऱ्यालाच अटक झाल्याने संपुर्ण राज्य हादरले. या संपुर्ण प्रकरणामुळे अनेक गंभीर प्रश्न उपस्थित होत आहेत. 

या संपुर्ण प्रकरणामुळे अनेक गंभीर प्रश्न उपस्थित होत आहेत. शिरुर-रांजणगाव औद्योगिक पट्ट्यात एमडीचा पुरवठा नेमका कोण करत आहे…? युवकांना व्यसनाच्या खाईत ढकलणारे ‘मोठे मासे’ कोणाच्या संरक्षणाखाली आहेत…? ऑनलाइन डिलिव्हरीच्या माध्यमातून सुरु असलेला हा काळाबाजार इतके दिवस पोलिसांच्या नजरेआड कसा राहिला…? लाखोंचा नाही तर कोट्यवधींचा हा व्यवसाय शिरुर तालुक्यात नेमका कुणाच्या आशीर्वादाने फोफावला…? हे प्रश्न अनुत्तरीत आहेत. 

शिरुर तालुक्यातील पालकांमध्ये सध्या प्रचंड भीतीचे वातावरण आहे. शिरुर तालुक्यातील नामांकित शाळा तसेच कॉलेज परिसर, औद्योगिक वसाहती आणि युवकांची गर्दी असलेल्या भागात ‘एमडी ड्रग’ चे जाळे झपाट्याने पसरत असल्याची चर्चा आहे. काही युवक ‘एमडी ड्रग’ विकत असुन तालुक्यातील अनेक युवक या ड्रगमुळे व्यसनाधीन झाल्याचे प्रकारही समोर येत आहेत. पैशाच्या हव्यासापोटी तरुण पिढी उद्ध्वस्त करणाऱ्या या रॅकेटवर केवळ वरवरची कारवाई करुन चालणार नाही. तर यातील मोठया माशांवर आता कारवाई होणे गरजेचे असल्याची भावना आता नागरिक व्यक्त करत आहेत.

दरम्यान, पुणे ग्रामीण पोलिस अधीक्षकांनी शिरुर-रांजणगाव परिसर ‘ड्रगमुक्त’ करण्यासाठी विशेष मोहीम राबविण्याचे संकेत दिले आहेत. मात्र “छोट्या पेडलर्सना पकडून फोटोसेशन होणार की….? या काळ्या साम्राज्याच्या खऱ्या मालकांना शोधून पोलिस त्यांच्या मुसक्या आवळणार…?” हे येणाऱ्या काही दिवसात स्पष्ट होईल. शिरुर तालुक्याच्या भविष्यासाठी आता निर्णायक कारवाईची गरज आहे. अन्यथा एमडी ड्रगचे हे विषारी जाळे आणखी खोलवर जाऊन संपुर्ण तरुणाई गिळंकृत करेल, अशी भीती व्यक्त होत आहे. 

(क्रमश:) 

शिरूर तालुका टीम

Recent Posts

तीन हजारांच्या पारितोषिकासाठी अनवाणी धावली आई; आता देशभरातून मदतीचा हात

बीड : मुलींच्या शिक्षणाचा खर्च भागवण्यासाठी अवघ्या तीन हजार रुपयांच्या पारितोषिकाच्या आशेने अनवाणी धावत, हातात…

4 तास ago

हेक्टरी १ लाखांची मदत, सरसकट कर्जमाफी आणि विद्यार्थ्यांचे शुल्क माफ करण्याची हर्षवर्धन सपकाळांची मागणी

मुंबई/बुलढाणा: मागील ४० ते ४५ दिवसांपासून पावसाने दडी मारल्याने पिके करपून गेली असून राज्यातील शेतकरी गंभीर…

4 तास ago

शिरूर तालुक्यात क्रिकेट खेळण्यावरून तुफान राडा; बॅट-स्टंपने मारहाण; पाच जणांना अटक…

शिक्रापूर (अक्षय टेमगिरे): क्रिकेट खेळायला न घेतल्याच्या कारणावरून झालेल्या वादाचे रूपांतर थेट मारामारीत झाल्याची घटना…

20 तास ago

पाबळ-कान्हूर-केंदूर! निवडणूक आली की पाण्याची चर्चा; टंचाई मात्र कायमच!

पाबळ (सुनिल जिते) : शिरूर तालुक्याच्या पश्चिम भागातील पाबळ, कान्हूर मेसाई आणि केंदूर परिसरात यंदा…

20 तास ago

रांजणगावमध्ये कोयत्याने जीवघेणा हल्ला करणारे आरोपी 12 तासात अटक LCB आणि रांजणगाव MIDC पोलिसांची संयुक्त कारवाई

रांजणगाव गणपती (तेजस फडके) रांजणगाव येथील वामन वाईन्ससमोर किरकोळ वादातून तरुणावर आणि त्याला वाचवण्यासाठी मध्ये…

1 दिवस ago

शिरुर शहरात गोळीबार करणाऱ्या तिघांना DB पथकाने सुपा टोलनाक्यावर सापळा लावत ४८ तासांत घेतलं ताब्यात

शिरुर (तेजस फडके) शिरुर शहरातील लाटेआळी-आंबेडकरनगर परिसरात शुक्रवारी (१८) सकाळी साडे-सहाच्या सुमारास झालेल्या गोळीबारात हरिष…

1 दिवस ago