मुख्य बातम्या

शिरुर तालुक्यात भरदिवसा मेंढपाळावर जीवघेणा हल्ला

रांजणगाव गणपती (तेजस फडके) शिरुर तालुक्यातील वाघाळे गाव एकदा गुन्हेगारीच्या घटनेने हादरले असुन भरदिवसा एका ज्येष्ठ मेंढपाळावर चाकूने जीवघेणा हल्ला करण्यात आल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या प्रकरणी रांजणगाव पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून गावात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

रांजणगाव पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी नारायण पंडु शिंगाडे (वय ६५, रा. शिंगाडवाडी, पो.वरुडे, ता. शिरुर) यांनी फिर्याद दिली असुन याबाबत राजु प्रभु झिटे (रा. मरीबाई खोरे, शिंगाडवाडी, पो.वरुडे, ता. शिरुर) याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. वाघाळे येथील एका हॉटेल समोर दुपारी चारच्या सुमारास हि घटना घडली. 

आरोपी राजु झिटे हा दारुच्या नशेत तेथे आला आणि त्याने फिर्यादी नारायण शिगाडे यांच्यावर थेट चाकूने हल्ला चढवला. आरोपीने शिगाडे यांच्या पोटावर आणि छातीवर वार करत गंभीर दुखापत केली. एवढ्यावरच न थांबता शिवीगाळ, दमदाटी करत “तुला आणि तुझ्या कुटुंबाला जिवंत सोडणार नाही,” अशी धमकी दिल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे.

भर चौकात झालेल्या या गंभीर प्रकारामुळे नागरिकांमध्ये एकच खळबळ उडाली. घटनेनंतर परिसरातील नागरिकांनी जखमी वृद्धाला तातडीने उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले. या घटनेमुळे ग्रामीण भागातील कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.या प्रकरणाचा पुढील अधिक तपास पोलीस कर्मचारी संदीप जगदाळे करीत आहेत. 

शिरूर तालुका टीम

Recent Posts

तीन हजारांच्या पारितोषिकासाठी अनवाणी धावली आई; आता देशभरातून मदतीचा हात

बीड : मुलींच्या शिक्षणाचा खर्च भागवण्यासाठी अवघ्या तीन हजार रुपयांच्या पारितोषिकाच्या आशेने अनवाणी धावत, हातात…

4 तास ago

हेक्टरी १ लाखांची मदत, सरसकट कर्जमाफी आणि विद्यार्थ्यांचे शुल्क माफ करण्याची हर्षवर्धन सपकाळांची मागणी

मुंबई/बुलढाणा: मागील ४० ते ४५ दिवसांपासून पावसाने दडी मारल्याने पिके करपून गेली असून राज्यातील शेतकरी गंभीर…

4 तास ago

शिरूर तालुक्यात क्रिकेट खेळण्यावरून तुफान राडा; बॅट-स्टंपने मारहाण; पाच जणांना अटक…

शिक्रापूर (अक्षय टेमगिरे): क्रिकेट खेळायला न घेतल्याच्या कारणावरून झालेल्या वादाचे रूपांतर थेट मारामारीत झाल्याची घटना…

20 तास ago

पाबळ-कान्हूर-केंदूर! निवडणूक आली की पाण्याची चर्चा; टंचाई मात्र कायमच!

पाबळ (सुनिल जिते) : शिरूर तालुक्याच्या पश्चिम भागातील पाबळ, कान्हूर मेसाई आणि केंदूर परिसरात यंदा…

20 तास ago

रांजणगावमध्ये कोयत्याने जीवघेणा हल्ला करणारे आरोपी 12 तासात अटक LCB आणि रांजणगाव MIDC पोलिसांची संयुक्त कारवाई

रांजणगाव गणपती (तेजस फडके) रांजणगाव येथील वामन वाईन्ससमोर किरकोळ वादातून तरुणावर आणि त्याला वाचवण्यासाठी मध्ये…

1 दिवस ago

शिरुर शहरात गोळीबार करणाऱ्या तिघांना DB पथकाने सुपा टोलनाक्यावर सापळा लावत ४८ तासांत घेतलं ताब्यात

शिरुर (तेजस फडके) शिरुर शहरातील लाटेआळी-आंबेडकरनगर परिसरात शुक्रवारी (१८) सकाळी साडे-सहाच्या सुमारास झालेल्या गोळीबारात हरिष…

1 दिवस ago