मुख्य बातम्या

त्या बहुचर्चित खुण प्रकरणातील दोषी आधिकारी, कर्मचाऱ्यांवर कधी होणार कारवाई ?

शिरूर (अरुणकुमार मोटे): शिक्रापूर येथील बेवारस प्रेत सापडलेल्या बहुचर्चित खुण प्रकरणी पुराव्याअभावी व विलंबामुळे पाचपैकी चार आरोपींचा जामीन दोन महीन्यातच सत्र न्यायालय पुणे यांच्याकडून मंजूर झाला आहे. हा खुनाचा गुन्हा खत्री पोलिस हवालदाराने तक्रार करुन मीडीयाने आवाज उठवून उजेडात आणल्यानंतर गुन्हा घडल्यापासून तब्बल १० महीन्यांनी उघड झाला होता. तोपर्यंत गुन्हयातील पुरावे बऱ्यापैकी नष्ट झाले होते.

याप्रकरणी अद्यापपर्यंत पोलिस अधिक्षक पंकज देशमुख यांची भुमिका गुलदस्त्यात आहे. शिक्रापूर पोलीस स्टेशन मधील अधिकाऱ्यांना याप्रकरणी पाठीशी घातल्याची चर्चा नागरिकांमध्ये होत आहे. गुन्हा दाखल होऊन दोन महिने झाले तरीही या प्रकरणी दोषी आधिकारी, कर्मचाऱ्यांवर कोणतीही कार्यवाही अद्याप पर्यंत झाली नाही. शिरूर पोलीस स्टेशन हद्दीमध्ये माजी सैनिकाच्या आर्थिक फसवणुक प्रकरणी आरोपींना मदत केल्याने एका सहाय्यक पोलीस निरीक्षकाला पोलीस अधीक्षक पंकज देशमुख यांनी तातडीने निलंबित केले आहे. मग शिक्रापूर पोलिस अधिकारी, कर्मचारी यांच्यावर मेहरबानी का असा सवाल आता उपस्थित होत आहे.

हा खून पचवण्याचा प्रयत्न शिक्रापूर येथील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी यांनी केला होता . मात्र हा डाव गजानन खत्री पोलीस हवालदाराने हाणून पाडला असून दोषी अधिकारी ,कर्मचारी मात्र मोकाट फिरत आहे. सदर खुण पचविण्यामागे वरिष्ठांचा तर सहभाग नाही ना, त्यामुळे कारवाईला विलंब होऊ शकतो असे तेथील स्थानिक नागरिकांचे म्हणणे आहे त्यामुळे आता पोलीस अधीक्षक पंकज देशमुख काय कार्यवाही करतात हे पाहणे आता महत्त्वाचे ठरेल..

शिरूर तालुका टीम

Recent Posts

लंडनच्या तीन पुरस्कारांचा सन्मान अन् मुंबईत शिवसैनिकांचा जल्लोष

मुंबई: लंडनमध्ये लीडरशिप अवॉर्ड, स्टेट्समनशिप अवॉर्ड आणि महाराष्ट्र ग्लोबल अवॉर्ड अशा तीन पुरस्कारांनी गौरविल्यानंतर उपमुख्यमंत्री एकनाथ…

2 दिवस ago

महाराष्ट्रातील आरोग्य, पर्यावरण आणि सामाजिक विकास प्रकल्पांना सरकारचे पाठबळ

मुंबई: आगा खान डेव्हलपमेंट नेटवर्कच्या माध्यमातून महाराष्ट्रात राबविण्यात येत असलेल्या आरोग्य, शिक्षण, आदिवासी विकास, कौशल्यविकास,…

2 दिवस ago

हाऊस ऑफ कॉमन्समध्ये सोहळा, पण पुरस्कार ब्रिटिश संसदेचा नाही! ‘वर्ल्ड लीडरशिप’ची खरी कुंडली कोण उघडणार?

एकनाथ शिंदेंच्या ‘Statesmanship Award’भोवती पारदर्शकतेचे सवाल; जुनी संस्था आणि २०२४ मध्ये स्थापन झालेल्या नव्या कंपनीत…

2 दिवस ago

घोड धरणाची मालकी नक्की कुणाची…? पाटबंधारे विभाग की वाळु माफिया…? पाटबंधारे विभागाच्या पत्रानंतरही कारवाईचे घोडे अडले कुठे….?

शिरुर (तेजस फडके) शिरुर तालुक्याच्या पुर्व भागातील चिंचणी येथील घोड धरणातुन गेल्या चार ते पाच…

3 दिवस ago

घोड धरण लुटले जात असताना प्रशासन झोपेत…? दिवसाढवळ्या बेसुमार वाळू उपसा सुरुच

पाटबंधारे विभाग म्हणतो महिनाभरापूर्वीच नावासह यादी पोलिसांना दिली; मग शिरुर पोलिसांच्या कारवाईला मुहूर्त कधी...?  …

4 दिवस ago

शिष्यवृत्ती परीक्षा व स्पर्धा परीक्षांच्या क्षेत्रात शिरूर तालुका अग्रणी…

शिरूर : पुणे जिल्हा परिषदेच्या मॉडेल स्कूल, गुणवत्ता विकास कार्यक्रम, विद्यार्थ्यांच्या राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय क्षेत्रभेटी…

4 दिवस ago