मुख्य बातम्या

आरोग्य केंद्रातील मुजोर डॉक्टरवर वरीष्ठांची कारवाई कधी? कारवाई न झाल्यास ग्रामस्थ करणार उपोषण

शिरूर (अरुणकुमार मोटे): टाकळी हाजी प्राथमिक आरोग्य केंद्रावर गेल्या काही महिन्यांपासून सुरू असलेल्या डॉक्टरांच्या मुजोरीविरोधात आता ग्रामस्थांचा संताप प्रत्यक्ष कृतीतून प्रकट होऊ लागला आहे. नऊ ग्रामपंचायतींनी संयुक्तपणे जिल्हा प्रशासनाला अंतिम इशारा दिल्यानंतरही ठोस कारवाई न झाल्यामुळे ग्रामस्थांनी आरोग्य केंद्रासमोर पुढील आठवड्यात धरणे आंदोलनाची तयारी सुरू केली आहे. या आरोग्य केंद्रातील डॉक्टरचे वडील उपजिल्हाधिकारी असून ते जिल्हाआरोग्य अधिकाऱ्यावर व इतरांवर दबाव आणत असल्याची चर्चा दबक्या आवाजात सुरू आहे त्यामुळे जिल्हा आरोग्य अधिकारी सचिन देसाई हे ठोसपने कारवाई करत नसल्याचे दिसून येत आहे. देसाई आणि त्यांच्या वडिलांचे कॉल डिटेल्स तपासणीची मागणी आता पुढे आली आहे.या उपजिल्हाधिकाऱ्यांना बुलढाणा येथे दोन वर्षापुर्वी प्रकल्पग्रस्तांकडे १० लाखांची लाच मागितल्याप्रकरणी रंगेहात पकडून अटक केले होते. आता हेच आधिकारी आपल्या अपत्यासाठी आधिकाराचा गैरवापर करून आरोग्य अधिकाऱ्यांना व इतरांना फोन करून अपत्याला वाचवण्याचा पुरेपुर प्रयत्न करत आहे. त्यामुळे हे मुजोर डॉक्टर माझी कोणी वाकड करू शकत नाही व बदली करू शकत नाही हे ठामपणे खाजगीत बोलत आहे. त्यामुळे नऊ गावातील सामाजिक कार्यकर्ते यांनी हा लढा अधिक तीव्र करण्याचा चंग बांधला असून जोपर्यंत या डॉक्टरची बदली होत नाही तोपर्यंत मागे हटणार नाही असा इशारा दिला आहे.

आरोग्य सेवेच्या नावाखाली नागरिकांना फसवणूक होत असून, डॉक्टर फक्त एक तास हजेरी लावून उर्वरित वेळ शिरूरमध्ये खासगी व्यवहार सांभाळत असल्याचे ग्रामस्थांचे आरोप आहेत. यामुळे गंभीर रुग्णांना वेळेवर उपचार न मिळाल्याने जीव धोक्यात येतो.

नऊ गावातील ग्रामस्थांनी सांगितले की, जर चार -पाच दिवसांत कारवाई झाली नाही तर आरोग्य केंद्राला कुलूप ठोकुन उपोषणाला बसणार आहे. दरम्यान, या प्रकरणात माजी खासदार शिवाजीदादा आढळराव पाटील यांनीही लक्ष घालून जिल्हा प्रशासनाशी चर्चा सुरू केल्याची माहिती समोर आली आहे. तसेच माजी गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनाही लेखी निवेदन दिले असून तेही या संबंधात आरोग्यमंत्र्यांशी संवाद साधणार आहे. आता या भागातील आमदार दिलीप वळसे पाटील व माजी खासदार शिवाजी दादा आढळराव पाटील यांनी लक्ष घालून या डॉक्टरांची बदली होते की नाही हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

“जर सामान्य माणूस कसूर करत असेल तर त्याच्यावर तात्काळ कारवाई होते. मग या डॉक्टरांवर कारवाईसाठी प्रशासन कोणाची परवानगी घेत आहे? ग्रामीण जनतेच्या जीवाशी खेळणाऱ्याला संरक्षण कोण देत आहे?” असा सवाल संतप्त ग्रामस्थ विचारत आहेत. टाकळी हाजी आरोग्य केंद्रातील या गोंधळावरून आता ग्रामस्थांचा संघर्ष अधिक तीव्र होण्याची शक्यता आहे. प्रशासनाने तातडीने पावले न उचलल्यास हे प्रकरण मोठ्या आंदोलनाच्या स्वरूपात उभे राहणार हे निश्चित झाले आहे. जिल्हा आरोग्य आधिकारी देसाई साहेब अजून किती रुग्णांचे तुम्ही कसाई होणार आहात? जर दवाखान्यात डॉक्टरच उपलब्ध नाही तर पेशंट वर कसे उपचार होणार ओ ? जर तुम्ही लवकरात लवकर दबाव झुगारून या डॉक्टरवर कारवाई न केल्यास या भागातील जनता तुम्हालाही धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही हे नक्की…

(क्रमशः)

शिरूर तालुका टीम

Recent Posts

रांजणगाव पोलिस स्टेशनतर्फे सरदार वल्लभभाई पटेल जयंतीनिमित्त ‘एकता दौड’

रांजणगाव गणपती (तेजस फडके) लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांच्या १५० व्या जयंतीनिमित्त एकता दिवस (Run…

53 मिनिटे ago

शिरूर! कोरेगाव भीमा येथे खाजगी बसला भीषण आग…

कोरेगाव भीमा (ता. शिरूर): पुणे-नगर महामार्गावरील कोरेगाव भीमा येथील डिंग्रजवाडी फाट्याजवळ आज (गुरुवार) आठवडे बाजाराच्या…

2 दिवस ago

रांजणगाव एमआयडीसी पोलीसांकडून सायबर अवेअरनेस २०२५ उपक्रम

रांजणगाव गणपती (तेजस फडके) सायबर अवेअरनेस २०२५ उपक्रमाच्या अनुषंगाने पुणे ग्रामीण पोलीस विभागातर्फे रांजणगाव एमआयडीसी…

2 दिवस ago

Video: कारेगाव गणातून पंचायत समिती लढवणार : पप्पू भोसले

शिरूर (तेजस फडके): शिरूर तालुक्यातील कारेगाव गणातून पंचायत समिती निवडणूक लढवणार आहे, असा ठाम विश्वास…

3 दिवस ago

शिरूर! हरवलेला चिमुकला विसावला आईच्या कुशीत पोलिसांचेही डोळे पाणावले…

रांजणगाव गणपती (तेजस फडके) : रांजणगाव एमआयडीसी पोलिस ठाण्यात सोमवारी (ता. २७) दुपारी एक भावनिक…

4 दिवस ago

शिरूर तालुक्यातील शेतकऱ्यांसोबत तलाठ्याची आरेरावीची भाषा; आत्ता जाग आली का…

शिरूर : राज्यात झालेल्या सततच्या पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. या पार्श्वभूमीवर नुकसान…

4 दिवस ago