आरोग्य

अशक्तपणा आल्याने १ ग्लास दुधासह मखाने खाण्याचे ६ फायदे

मखाने अनेक पोषक तत्वांमुळे सुपर फूड म्हणून ओळखलं जातात. दुधात बरीच पोषक तत्व असतात याच कारणामुळे मखान्यांना दुधासोबत खाणे संपूर्ण आहार मानले जाते. हिवाळ्याच्या दिवसांत दुधासोबत मखान्यांचे सेवन केल्यानं शरीरावर बरेच चांगले परीणाम दिसून येतात. हे कॉम्बिनेशन लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांचीच हाडं मजबूत होण्यासाठी तसंच एनर्जी लेव्हल बुस्ट होण्यासाठी फायदेशीर ठरतं.

वजन नियंत्रणात ठेवण्यासाठी दूध आणि मखान्यांचे सेवन फायदेशीर ठरते. यामुळे पचनक्रिया चांगली राहते आणि हृदयाचे आरोग्य चांगले राहते.

हाडं मजबूत होतात…

मखाने आणि दूध या दोन्हींमध्ये कॅल्शियम आणि इतर पोषक तत्व खनिजं भरपूर प्रमाणात असतात. ज्यामुळे हाडं आतून बळकट होतात. लहान मुलं आणि वयस्कर लोकांसाठी हे फायदेशीर ठरते. वजन नियंत्रणात राहण्यास मदत होते.

वजन नियंत्रणात राहतं…

मखान्यांमध्ये फायबर्सचे प्रमाणात जास्त असते. ज्यामुळे दीर्घकाळ पोट भरलेलं राहतं. याव्यतिरिक्त दुधातील प्रोटीनसुद्धा वजन कमी करण्यास मदत करते.

पचनक्रिया चांगली राहते…

मखान्यांमधील फायबर्स पचनक्रिया चांगली ठेवतात. गॅसची समस्या उद्भवत नाही. ज्या लोकांची पचनक्रिया कमकुवत असते त्यांच्यासाठी मखाने फायदेशीर ठरतात.

हृदयाचे आरोग्य चांगले राहते…

मखान्यांमधील एंटी ऑक्सिडेंट्स हृदयाचे आजार कमी करण्यास मदत करतात. दुधातील पोटॅशियम ब्लड प्रेशर नियंत्रणात ठेवण्यास मदत करतात.

उर्जेचा स्तर वाढतो…

दूध आणि मखाने दोन्ही कार्बोहायड्रेट्स आणि प्रोटीन्सचा चांगला स्त्रोत आहेत. ज्यामुळे दीर्घकाळ तुम्हाला एनर्जेटीक राहण्यास मदत होते. दिवसाची सुरूवात मखाने खाऊन केल्यानं संपूर्ण दिवसभर शरीराल उर्जा मिळते.

ताण-तणाव कमी होतो…

मखान्यांमधील मॅग्नेशियम ताण-तणाव कमी करते आणि झोपेची गुणवत्ता सुधारण्यास मदत करते. रात्री झोपण्याच्या आधी दुधात मखाने घालून खाल्ल्यानं काही दिवसांतच तुम्हाला फरक दिसून येईल.

(सोशल मीडियावरून साभार)

शिरूर तालुका टीम

Recent Posts

शिष्यवृत्ती परीक्षा व स्पर्धा परीक्षांच्या क्षेत्रात शिरूर तालुका अग्रणी…

शिरूर : पुणे जिल्हा परिषदेच्या मॉडेल स्कूल, गुणवत्ता विकास कार्यक्रम, विद्यार्थ्यांच्या राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय क्षेत्रभेटी…

4 तास ago

शिवराज मोरे यांच्यावरील हल्ल्याची निष्पक्ष चौकशी करा; विजय वडेट्टीवारांची फडणवीसांकडे मागणी

नागपूर : नागपूर येथे आंदोलनादरम्यान युवक काँग्रेसचे अध्यक्ष शिवराज मोरे यांच्यावर झालेल्या हल्ल्याचे पडसाद उमटले…

1 दिवस ago

अभियांत्रिकी-पॉलिटेक्निक विद्यार्थ्यांसाठी AI कौशल्यविकासावर भर; रोजगाराच्या संधींसाठी केंद्रीकृत प्लेसमेंट प्लॅटफॉर्म

मुंबई : महाराष्ट्रातील अभियांत्रिकी आणि पॉलिटेक्निक विद्यार्थ्यांची कौशल्य क्षमता, रोजगारक्षमता आणि उद्योगसज्जता वाढविण्यासाठी उद्योगाभिमुख प्रशिक्षण,…

2 दिवस ago

विद्यार्थ्यांच्या तक्रारींचा आता ऑनलाइन निपटारा; DBATUचे ‘Students Grievances Portal’ तातडीने सुरू करण्याचे निर्देश

मुंबई: डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठ, लोणेरे (DBATU) अंतर्गत विद्यार्थ्यांच्या तक्रारी आणि शैक्षणिक समस्यांचे जलद,…

2 दिवस ago

विद्यार्थ्यांच्या कल्पनांना मिळणार ‘स्टार्टअप’ची ताकद! महाराष्ट्रात इन्क्युबेशन सेंटरचे जाळे उभारण्याच्या हालचालींना वेग

मुंबई: विद्यार्थ्यांच्या नवकल्पना, संशोधन आणि उद्योजकतेला व्यापक संधी उपलब्ध करून देत महाराष्ट्राची स्टार्टअप परिसंस्था अधिक सक्षम…

2 दिवस ago

गणेशोत्सवासाठी मुंबई सज्ज; सचिन अहिरांची पालिका अधिकाऱ्यांसोबत आढावा बैठक, विसर्जन व्यवस्थेवर विशेष भर

मुंबई : लाडक्या बाप्पाच्या आगमनाला अवघे काही दिवस शिल्लक राहिल्याने मुंबईत गणेशोत्सवाची लगबग अंतिम टप्प्यात…

2 दिवस ago