आरोग्य

कोलेस्ट्रॉल नेहमीच कंट्रोलमध्ये ठेवणारे ६ पदार्थ- नियमितपणे खा आणि कोलेस्ट्रॉल वाढण्याचं टेन्शन विसरा

बैठ्या कामाचे वाढलेले तास, व्यायामाचा अभाव, स्ट्रेस, चुकीची आहारपद्धती या सगळ्या गोष्टींचा एकत्रित परिणाम कोलेस्ट्रॉल वाढण्यावर होते. अनेकदा अनुवंशिकताही कोलेस्ट्रॉल वाढीसाठी कारणीभूत ठरते.

कोलेस्ट्रॉल वाढीचा संबंध थेट हृदयाशी. त्यामुळे ते कंट्रोलमध्ये ठेवणं अतिशय आवश्यक आहे. म्हणूनच आता असे काही पदार्थ पाहूया जे नियमितपणे खाल्ल्यास कोलेस्ट्रॉल नियंत्रित राहण्यास मदत होते.

यापैकी सगळ्यात पहिला पदार्थ म्हणजे बदाम. व्हिटॅमिन ई, ॲण्टीऑक्सिडंट्स, इसेंशियल ऑईल यांनी परिपूर्ण असलेले बदाम हृदयाच्या आरोग्यासाठी उत्तम आहेत. ६ ते ८ तास पाण्यात भिजवलेले आणि टरफलं काढून टाकलेले बदाम खाणं अधिक फायदेशीर.

दुसरं म्हणजे अक्रोड. प्रोटिन्स, व्हिटॅमिन्स, मिनरल्स, ओमेगा ३ फॅटी ॲसिड असणारे अक्रोड पाण्यात किंवा दुधात ६ ते ८ तास भिजत घालावेत आणि त्यानंतर खावेत. स्ट्रेस लेव्हल कमी करून मानसिकदृष्ट्या स्ट्राँग होण्यासाठीही अक्रोड फायदेशीर ठरतात.

चिया सिड्समध्येही हृदय आणि मेंदू या दोन्हींसाठी उपयुक्त ठरणारे ओमेगा ३ फॅटी ॲसिड असते. मधुमेह असणाऱ्यांसाठीही चिया सिड्स फायदेशीर ठरतात. कारण त्यांचा ग्लायसेमिक इंडेक्स कमी असतो.

ओट्समध्ये असणारे सोल्यूबल फायबर बॅड कोलेस्ट्रॉल लेव्हल कमी करण्यास मदत करतात.

व्हिटॅमिन, मिनरल्स, प्रोटिन्स आणि नॅचरल ग्लुकोज असणारे खजूर खाणंही हृदयासाठी उपयुक्त आहे.

कोलेस्ट्रॉल नियंत्रित ठेवण्यासाठी ६ ते ८ तास पाण्यात भिजवलेल्या मनुका खाव्या.

(सोशल मीडियावरून साभार)

शिरूर तालुका टीम

Recent Posts

श्री महागणपतीच्या दर्शन व्यवस्थेवर भाविकांचा संताप; ट्रस्टच्या पदाधिकाऱ्यांमधील समन्वयाचा अभाव चव्हाट्यावर

रांजणगाव गणपती (तेजस फडके) : ‘देवाच्या दारी सर्व भक्त समान’ असा संदेश समाजाला देणाऱ्या धार्मिक…

6 तास ago

लंडनच्या तीन पुरस्कारांचा सन्मान अन् मुंबईत शिवसैनिकांचा जल्लोष

मुंबई: लंडनमध्ये लीडरशिप अवॉर्ड, स्टेट्समनशिप अवॉर्ड आणि महाराष्ट्र ग्लोबल अवॉर्ड अशा तीन पुरस्कारांनी गौरविल्यानंतर उपमुख्यमंत्री एकनाथ…

3 दिवस ago

महाराष्ट्रातील आरोग्य, पर्यावरण आणि सामाजिक विकास प्रकल्पांना सरकारचे पाठबळ

मुंबई: आगा खान डेव्हलपमेंट नेटवर्कच्या माध्यमातून महाराष्ट्रात राबविण्यात येत असलेल्या आरोग्य, शिक्षण, आदिवासी विकास, कौशल्यविकास,…

3 दिवस ago

हाऊस ऑफ कॉमन्समध्ये सोहळा, पण पुरस्कार ब्रिटिश संसदेचा नाही! ‘वर्ल्ड लीडरशिप’ची खरी कुंडली कोण उघडणार?

एकनाथ शिंदेंच्या ‘Statesmanship Award’भोवती पारदर्शकतेचे सवाल; जुनी संस्था आणि २०२४ मध्ये स्थापन झालेल्या नव्या कंपनीत…

3 दिवस ago

घोड धरणाची मालकी नक्की कुणाची…? पाटबंधारे विभाग की वाळु माफिया…? पाटबंधारे विभागाच्या पत्रानंतरही कारवाईचे घोडे अडले कुठे….?

शिरुर (तेजस फडके) शिरुर तालुक्याच्या पुर्व भागातील चिंचणी येथील घोड धरणातुन गेल्या चार ते पाच…

3 दिवस ago

घोड धरण लुटले जात असताना प्रशासन झोपेत…? दिवसाढवळ्या बेसुमार वाळू उपसा सुरुच

पाटबंधारे विभाग म्हणतो महिनाभरापूर्वीच नावासह यादी पोलिसांना दिली; मग शिरुर पोलिसांच्या कारवाईला मुहूर्त कधी...?  …

4 दिवस ago