मुंबई: महिला आणि बालकांच्या उन्नतीसाठी महाराष्ट्र सरकार पूर्ण संवेदनशीलतेने काम करत असून त्यांच्याशी संबंधित योजना आणि कार्यक्रमांची प्रभावी, पारदर्शक आणि दर्जेदार अंमलबजावणी केली जात आहे जेणेकरून विकसित भारत… विकसित महाराष्ट्र हे उद्दिष्ट साध्य करता येईल, अशा शब्दात आपल्या भावना राज्याच्या महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी व्यक्त केल्या आहेत.
महिला आणि बालकांच्या विकासाला गती देण्यासाठी प्रमुख भागधारकांना एकत्र आणण्याचा प्रयत्न असून या शिबिरात सर्वांनी मिळून त्यांचे भविष्य अधिक सामर्थ्यवान बनविण्याचा विचार करूया जेणेकरुन महिला आणि बालविकासाला नवी दिशा मिळेल असेही आदिती तटकरे म्हणाल्या.
यावेळी महिला व बालविकास विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या विविध कार्यक्रमांची माहिती देत अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या प्रशिक्षणात सुसूत्रता आणावी अशी भावना आदिती तटकरे यांनी व्यक्त केली. महाराष्ट्रातील बालकांच्या व महिलांच्या उन्नतीसाठी विविध मागण्यांचा प्रस्ताव केंद्रसरकारकडे दिला असून महाराष्ट्राला केंद्रसरकारचे पाठबळ मिळावे अशी अपेक्षाही आदिती तटकरे यांनी व्यक्त केली. यावर बोलताना केंद्रसरकारकडून महाराष्ट्राला संपूर्ण सहाय्य दिले जाईल असे आश्वासन केंद्रीय महिला व बालविकास मंत्री श्रीमती अन्नपुर्णा देवी यांनी दिले.
हे चिंतन शिबिर राजस्थानचे मुख्यमंत्री भजनलाल शर्मा जी, केंद्रीय महिला व बालविकास मंत्री श्रीमती अन्नपूर्णा देवी, उपमुख्यमंत्री श्रीमती दिया कुमारी, केंद्रीय महिला व बालविकास राज्यमंत्री श्रीमती सावित्री ठाकूर आणि भारतातील सर्व राज्ये व केंद्रशासित प्रदेशांच्या महिला व बालविकास मंत्री यांच्या उपस्थितीत राजस्थानमध्ये पार पडले.
कर्जमाफी, ओबीसी आरक्षण आणि गोसीखुर्द कालवा दुर्घटनेवर सरकारला धारेवर धरले; ३ ऑगस्टपासून 'मंडल यात्रा'ची घोषणा.…
मुंबई: भायखळा येथील नूतनीकृत लोकशाहीर अण्णा भाऊ साठे नाट्यगृहाचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते लोकार्पण…
मुंबई: लोकशाहीर साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांच्या नावाने नूतनीकरण व विस्तारीकरण करण्यात आलेल्या नाट्यगृहाचे लोकार्पण मुख्यमंत्री…
रांजणगाव गणपती (तेजस फडके): ता. शिरुर तालुक्यात असणाऱ्या रांजणगाव एमआयडीसीतील ब्रिटानिया कंपनीत माल पोहोचविण्यासाठी आलेल्या…
मुंबई: भारताच्या उज्ज्वल भविष्यासाठी शिक्षणव्यवस्था ही केवळ पदवी देणारी नसून विचारक्षम, कौशल्यसंपन्न आणि मूल्याधिष्ठित नागरिक…
पेपरफुटी ही केवळ कायद्याची किंवा प्रशासनाची समस्या नसून, ती लाखो विद्यार्थ्यांच्या स्वप्नांशी आणि देशाच्या भविष्यासोबत…