आळंबी ही भाजी तशी अलीकडे जास्त लोकप्रिय झाली आहे. लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांनाच ती आवडते. इतर भाज्यांच्या तुलनेत मश्रुममध्ये अधिक पोषक घटक असतात. मश्रुममध्ये लायसिन नावाचे अमिनो आम्ल जास्त प्रमाणात असते. तर गहू, तांदूळ यामध्ये या आम्लाचे प्रमाण खूप कमी आहे. मनुष्याला संतुलित आहार गरजेचा असतो आणि हे आम्ल त्यामध्ये आवश्यक असते. मश्रुममध्ये असलेले अँटिऑक्सिडंटमुळे फ्री रॅडिकल्सपासून बचाव होतो. मश्रुम एक नैसर्गिक प्रतिजैविकही आहे. त्यामुळे सूक्ष्म जीवांचे आणि इतर बुरशीजन्य संसर्ग बरे होण्यास मदत होते.
मश्रुम रक्तदाबाचा आजार नियंत्रित करण्यास मदत करते. त्यामुळे रक्तदाबाच्या रुग्णांनी मश्रुमचे अवश्य सेवन करावे.
कार्बोहायड्रेटचे प्रमाण पुरेसे असते. त्यामुळे बद्धकोष्ठता, अपचन, पित्त आदी पोटाचे विकार दूर करण्यास, तसेच शरीरातील कोलेस्ट्रॉल आणि शर्करा यांचे शोषण कमी करण्यास मदत करतो. मधुमेही व्यक्तींसाठीही मश्रुम चांगले असतात. त्यातून जीवनसत्त्व, खनिजे आणि तंतुमय पदार्थ मिळतात. मश्रुममध्ये चरबी, साखर तसेच कार्बोहायड्रेट नसतात. त्यामुळे मधुमेही व्यक्तींना मश्रुम सेवनाचे फायदेच होतात. मश्रुम सेवनाने शरीराल इन्सुलिनची निर्मिती होते.
मश्रुममध्ये लीन प्रथिने असतात. त्यामुळे वजन कमी करण्यास मश्रुम उपयुक्त आहे. स्थूलपणा कमी करण्यासाठी प्रोटिन डाएट किंवा प्रथिनांचा आहार सेवन करण्यास सांगितले जाते. अशा व्यक्तींना मश्रुम सेवन करणे फायद्याचे आहे.
मश्रुममध्ये सोडियम नाही. त्यामुळे स्थूलपणा, मूत्रपिंडाचे आजार किंवा हृदयरोग आदींमध्ये मश्रुमचे सेवन फायदेशीर आहे. हृदयरुग्णांसाठी कोलेस्ट्रॉल, चरबी तसेच सोडियम सॉल्ट हे धोकादायक असते. त्यामुळे मश्रुमचे सेवन जरूर करू शकतात.
मश्रुममध्ये लोहाचे प्रमाण कमी असते. पण मश्रुम रक्तातील हिमोग्लोबीनचे प्रमाण कायम राखण्यास मदत करते. मश्रुममध्ये फॉलिक अॅसिड असते. मांसाहारी लोकांना त्याची कमतरता नसते. कारण, आहारातील फॉलिक अॅसिड हे फक्त मांसाहारातून मिळते. पण, शाकाहारी व्यक्तींसाठी मश्रुमचा पर्याय आहे. लोह आणि फॉलिक अॅसिड यामुळे ग्रामीण भागात ज्या महिलांमध्ये, मुलांमध्ये रक्ताची कमतरता म्हणजेच रक्ताल्पता हा विकार असतो, त्यांच्यासाठी मश्रुमचे सेवन नक्कीच फायदेशीर ठरते. त्यामुळे भाजीला पर्याय म्हणून, चवीत बदल म्हणून कधी तरी का होईना; पण मश्रुम सेवन करण्यास हरकत नाही. भाज्यांमध्ये, सलाडमध्ये किंवा नुसती भाजी म्हणून मश्रुम आहारात जरूर सामील करावा.
(सोशल मीडियावरुन साभार)
मुंबई: डिजिटल वित्तीय क्षेत्रातील अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा लाभ सर्वसामान्य नागरिक, शेतकरी, महिला उद्योजक, स्टार्टअप्स तसेच सूक्ष्म,…
लंडन: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे दोन दिवसांच्या लंडन दौऱ्यावर दाखल झाले आहेत. हिथ्रो विमानतळावर त्यांचे आगमन…
नागपूर: राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये पावसाने मोठी ओढ दिल्याने खरीप पिके संकटात सापडली आहेत. अनेक तालुक्यांमध्ये गेल्या…
मुंबई: महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या कार्याची आणि लोककल्याणकारी योजनांची दखल आता आंतरराष्ट्रीय पातळीवर घेण्यात…
तापलेले असतानाच आता नवरात्रोत्सवातील गरबा-दांडियावरूनही वाद निर्माण झाला आहे. मंत्री नितेश राणे यांनी गरब्यात ‘लव्ह…
शिरूर : वाघाळे (ता. शिरूर) येथील आदर्श शिक्षक मारुती वामन थोरात यांचे अपघाती सोमवारी (ता.…