आरोग्य

नारळाच्या तेलाच्या गुळण्या केल्याने जबरदस्त फायदे

सकाळी उठल्यानंतर तोंड धुणं, दात घासणं हा सगळ्यांचा नित्यक्रम असतो. पण काहीजण सकाळी दात घासल्यानंतर तोंडात नारळाच्या तेलाची गुळणी धरतात. दात स्वच्छ घासल्यानंतरही तेलाची गुळणी करुन काय मिळतं? तेलाची गुळणी कशी करावी? कोणतं तेल वापरावं? असे अनेक प्रश्न तेलाच्या गुळणी संदर्भात निर्मान होतात. तज्ज्ञ म्हणतात केवळ तोंडाच्या आतील स्वच्छता, मुख आरोग्य यासाठीच नाही तर फिटनेस राखण्यासाठी, वजन कमी करण्यासाठी तेलाची गुळणी केल्याने फायदे होतात.

तेलाची गुळणी कशी करावी?
तेलाची गुळणी करण्यासाठी शुध्द, नैसर्गिक स्वरुपातलं, घाण्याचे किंवा आयुर्वेद दुकानात मिळणारं नारळाचं तेल वापरावं. एक चमचा नारळाचं तेल घ्यावं. ते तोंडात टाकावं. तोंड बंद करुन तेल संपूर्ण तोंडात फिरवावं. तेल तोंडात फिरवताना हळू फिरवाव. ते गिळू नये. एक मिनिटानंतर गुळणी बाहेर टाकावी. तेलाची गुळणीची सवय लावताना सुरुवातीला केवळ एक मिनीट गुळणी धरावी आणि मग हा वेळ पुढे 10-15 मिनिटापर्यंत वाढवता येतो. तेलाची गुळणी दिवसभरात कधीही करुन चालत नाही. ती सकाळी उठल्यानंतर रिकाम्या पोटी करावी लागते.

गुळण्या नारळाच्या तेलानेच का कराव्यात?
सूर्यफूल, ऑलिव्ह ऑइलयापेक्षाही नारळाचं तेल गुळण्यांसाठी फायदेशीर ठरतं. नारळाच्या तेलात दाह विरोधी आणि सूजविरोधी घटक असतात. तसेच नारळाच्या तेलाद्वारे तोंडात आरोग्यास घातक जिवाणुंची, सूक्ष्म जिवाणुंची वाढ होत नाही.

नारळाच्या तेलाच्या गुळण्या केल्याचे फायदे
१) नारळाच्या तेलाची गुळणी केल्याने तोंडातील घातक जिवाणू नष्ट होतात. दातांची संवेदनशिलता कमी होते.
२) शरीरावर सूज येत असल्यास, हिरड्यांना सूज असल्यास नारळाच्या तेलाच्या गुळण्या केल्यानं सूज दूर होते.
३) नारळाच्या तेलाच्या गुळण्या केल्यानं शरीरात ऊर्जा निर्माण होते.
४) नारळाच्या तेलाची गुळणी करण्याचा सर्वात जास्त फायदा पचन व्यवस्थेला होतो. पचनाची सर्वात आधीची प्रक्रिया जिभेशी निगडित असते. जिभेद्वारे पदार्थातील पोषक तत्त्वांची जाणीव होऊन पचन व्यवस्थेला तसे आदेश जातात आणि पचनाची प्रक्रिया सुरु होते. पण जीभच जर अस्वच्छ असेल तर पचन व्यवस्थेला जिभेकडून कोणतेही संकेत मिळत नाही. त्यामुळे खाल्लेल्या अन्नाचं पचन होण्यास समस्यान निर्माण होतात. पचनाशी निगडित समस्या दूर करण्यासाठी नारळाच्या तेलाच्या गुळण्या फायदेशीर ठरतात.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

डीजेचा दणदणाट ठरला जीवघेणा! सांगवीत लोखंडी कमान कोसळून महिलेचा दुर्दैवी मृत्यू

पिंपरी-चिंचवड : पुणे आणि पिंपरी-चिंचवड परिसरात गणेशोत्सवातील डीजेवरून जोरदार चर्चा सुरू असतानाच, जुन्या सांगवी परिसरातून…

5 तास ago

रक्ताचे नातेवाईक कुणीच पुढे आले नाहीत; ग्रामपंचायतीने स्वीकारली अंत्यविधीची जबाबदारी

आंबेगाव : आयुष्याची तब्बल ८० वर्षे धार्मिक संप्रदायात व्यतीत केलेल्या रामदास खंडुजी शिंदे यांच्या निधनानंतर…

5 तास ago

सोलापुरात अघोषित भारनियमनावर पालकमंत्री संतापले; स्वाभिमानीचा पलटवार

सोलापूर : जिल्ह्यात पावसाने ओढ दिल्याने पिके जगवण्यासाठी शेतकऱ्यांची धडपड सुरू असतानाच कृषीपंपांचा वीजपुरवठा अचानक…

5 तास ago

‘महाराष्ट्राची वाघीण’ अश्विनी पौळ यांचा दुर्दैवी अंत; तीन मुलांसह नळदुर्ग किल्ल्यावरून उडी

धाराशिव : राष्ट्रीय स्तरावर महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करणाऱ्या आणि ‘महाराष्ट्राची वाघीण’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या महिला कुस्तीपटू…

5 तास ago

कायद्याची लाठी सर्वांसाठी समान आहे का? संतोष पंडित यांच्या अटकेने महाराष्ट्रासमोर मोठा सवाल!

लोकशाहीमध्ये प्रश्न विचारणे हा गुन्हा नाही. अभिव्यक्तिस्वातंत्र्य हा संविधानाने दिलेला अधिकार आहे आणि कायदा सर्वांसाठी…

5 तास ago

शिक्षक हे भविष्याचे खरे शिल्पकार; गुणवत्तापूर्ण शिक्षणातून सक्षम समाजाची उभारणी; सुनेत्रा पवार

पुणे: शिक्षक हे आपल्या भविष्याचे खरे शिल्पकार आहेत. त्यांच्या समर्पित कार्याचा गौरव आणि विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेला…

5 तास ago