आरोग्य

पांढरे झालेले केस घरगुती हेअर कलर लावल्याने केस होतील काळेभोर

केस पांढरे होणं ही सध्याच्या वातावरणातील खूपच कॉमन स्थिती आहे. प्रत्येक तिसरी व्यक्ती केमिकल्सयुक्त हेअर कलर आपल्या केसांना लावते. ज्यामुळे केसांचे नुकसान होते. पण केसांचे नुकसान होऊ नये असं तुम्हाला वाटत असेल तर तुम्ही पांढरे केस लपवण्यासाठी काही सोपे उपाय करू शकता.

ज्यामुळे पांढरे केस लपवणं एकदम सोपं होईल. या हेअर मास्कमुळे फक्त केस काळेच होत नाहीत तर पांढरे केस लपवण्यासही मदत होते. ज्यामुळे केस हेल्दी, शायनी राहतात.

केसांना काळे करण्यासाठी तुम्ही घरच्याघरी हेअर मास्क बनवू शकता. यासाठी तुम्हाला काही घरगुती गोष्टींची आवश्यकता असेल. एक चमचा हळद, एक चमचा इंडीगो पावडर, एक ते दोन चमचे दही, भिजवलेले मेथीचे दाणे, एक चमचा कॉफी, एक चमचा एलोवेरा जेल.

होममेड हेअर मास्क बनवण्याची योग्य पद्धत

1) सगळ्यात आधी मेथीच्या दाणे दही आणि एलोवेरा जेल घालून बारीक वाटून घ्या. नंतर लोखंडाचा तवा किंवा कढईत हळदीची पावडर घालून भाजून घ्या. रंग काळा होईपर्यंत भाजून घ्या. नंतर ही काळी पावडर एका बाऊलमध्ये काढून घ्या.

2) तयार दही आणि एलोवेरा जेल मेथीच्या पेस्टमध्ये घालून इंडीगो आणि हळदीच्या पावडरसोबत मिसळा यात १ चमचा कॉफीसुद्धा घाला. सर्व पदार्थ चमच्याच्या मदतीने एकजीव करा.

3) केसांच्या मुळांना व्यवस्थित लावून घ्या. ज्या ठिकाणी केस पांढरे असतील तर त्या ठिकाणी व्यवस्थित लावा. जवळपास ३ ते ४ तासांसाठी तसंच ठेवून द्या.

4) नंतर केस व्यवस्थित धुवून घ्या. केमिकल्सचा वापर न करता सर्व केस लगेच काळे होतील. याशिवाय केसांमध्ये शाईन येईल आणि केस सॉफ्ट होतील.

(सोशल मीडियावरून साभार)

शिरूर तालुका टीम

Recent Posts

घोड धरण लुटले जात असताना प्रशासन झोपेत…? दिवसाढवळ्या बेसुमार वाळू उपसा सुरुच

पाटबंधारे विभाग म्हणतो महिनाभरापूर्वीच नावासह यादी पोलिसांना दिली; मग शिरुर पोलिसांच्या कारवाईला मुहूर्त कधी...?  …

4 तास ago

शिष्यवृत्ती परीक्षा व स्पर्धा परीक्षांच्या क्षेत्रात शिरूर तालुका अग्रणी…

शिरूर : पुणे जिल्हा परिषदेच्या मॉडेल स्कूल, गुणवत्ता विकास कार्यक्रम, विद्यार्थ्यांच्या राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय क्षेत्रभेटी…

12 तास ago

शिवराज मोरे यांच्यावरील हल्ल्याची निष्पक्ष चौकशी करा; विजय वडेट्टीवारांची फडणवीसांकडे मागणी

नागपूर : नागपूर येथे आंदोलनादरम्यान युवक काँग्रेसचे अध्यक्ष शिवराज मोरे यांच्यावर झालेल्या हल्ल्याचे पडसाद उमटले…

2 दिवस ago

अभियांत्रिकी-पॉलिटेक्निक विद्यार्थ्यांसाठी AI कौशल्यविकासावर भर; रोजगाराच्या संधींसाठी केंद्रीकृत प्लेसमेंट प्लॅटफॉर्म

मुंबई : महाराष्ट्रातील अभियांत्रिकी आणि पॉलिटेक्निक विद्यार्थ्यांची कौशल्य क्षमता, रोजगारक्षमता आणि उद्योगसज्जता वाढविण्यासाठी उद्योगाभिमुख प्रशिक्षण,…

3 दिवस ago

विद्यार्थ्यांच्या तक्रारींचा आता ऑनलाइन निपटारा; DBATUचे ‘Students Grievances Portal’ तातडीने सुरू करण्याचे निर्देश

मुंबई: डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठ, लोणेरे (DBATU) अंतर्गत विद्यार्थ्यांच्या तक्रारी आणि शैक्षणिक समस्यांचे जलद,…

3 दिवस ago

विद्यार्थ्यांच्या कल्पनांना मिळणार ‘स्टार्टअप’ची ताकद! महाराष्ट्रात इन्क्युबेशन सेंटरचे जाळे उभारण्याच्या हालचालींना वेग

मुंबई: विद्यार्थ्यांच्या नवकल्पना, संशोधन आणि उद्योजकतेला व्यापक संधी उपलब्ध करून देत महाराष्ट्राची स्टार्टअप परिसंस्था अधिक सक्षम…

3 दिवस ago