पावसाळा आला की, सर्दी-पडसा, खोकला आणि ताप या समस्या होणं फारच कॉमन आहे. वातावरणात बदल, वायरल इन्फेक्शन आणि कमजोर इम्यूनिटीमुळे या समस्या होतात. बरेच लोक तर असेही असतात ज्यांचं सतत नाक वाहत राहतं. औषधं घेऊनही आराम मिळत नाही. अशात सतत औषधं घेणंही शरीरासाठी घातक ठरू शकतं. आधीच सायनस असलेल्यांना तर अधिक त्रास होतो. पण तुम्हाला माहीत नसेल की, तुमच्या किचनमध्येच या समस्या दूर करणारे नॅचरल उपाय लपलेले आहेत.
सूंठ सिद्ध जल
सूंठ सिद्ध जल म्हणजेच पाणी हे सूंठापासून तयार केलं जातं. या पाण्यानं पचनक्रिया सुधारते, घशाला आराम मिळतो आणि छातीत जमा झालेला कफही बाहेर पडतो. हे तयार करण्यासाठी एक लीटर पाणी घ्या, त्यात अर्था चमचा सूंठ पावडर किंवा ताज्या आल्याचा एक तुकडा टाका. मध्यम आसेवर हे पाणी १० मिनिटं उकडा. पाणी गाळून थंड होऊ ग्या आणि स्टीलच्या बॉटलमध्ये भरून थोडं थोडं प्या.
DIY हर्बल मिश्रण
अर्धा चमचा हळद, अर्धा चमचा आल्याचं पावडर, १ काळी मिरी किंवा दोन चिमुट काळी मिरी पूड, १ चमचा मध घ्या. या गोष्टी चांगल्या मिक्स करा. हे मिश्रण दिवसातून दोन ते तीन वेळा जेवणाच्या एक तास आधी खा.
दिवसातून दोनदा वाफ
वाफ सर्दी-पडसा दूर करण्यास खूप फायदेशीर ठरते. सगळ्यात आधी २ ग्लास पाणी घ्या, त्यात मुठभर तुळशीची पानं, ५ ते ७ पुदिन्याची पानं, १ चमचा ओवा, अर्धा चमचा मेथीचे दाणे, अर्धा चमचा हळद टाका. हे पाणी ७ ते १० मिनिटं मध्यम आसेवर उकडा. या पाण्याची वाफ घ्या.
हळदीच्या पाण्यानं गुळण्या
हा एक प्रभावी आयुर्वेदिक उपाय मानला जातो. हे पाणी तयार करण्यासाठी एक ग्लास पाणी घ्या, त्यात १ चमचा हळद टाका आमि ३ ते ५ मिनिटांसाठी उकडा. हे पाणी कोमट असेल तेव्हा दिवसातून २ ते ३ वेळा गुरळा करा.
(सोशल मीडियावरून साभार)
कारेगाव (तेजस फडके) शिरुर तालुक्यातील कारेगाव येथील हत्याकांड प्रकरणात पोलिसांनी गोळीबार करणाऱ्या पृथ्वी ऊर्फ भैय्या…
शिरुर (तेजस फडके) सर्वसामान्य नागरिकांना न्याय मिळवून देण्याची जबाबदारी असलेल्या शिरुर तहसील कार्यालयातील कारभारावरच आता…
पांडव: तांदळी (ता. जि. वाशिम) येथे दुष्काळाची पाहणी करताना एका युवा शेतकऱ्याच्या भावनांचा बांध फुटला. डोळ्यांत…
माळेगाव कारखान्याच्या ७० व्या गळीत हंगामाचा शुभारंभ; ऊसदर, पाणी व्यवस्थापन आणि कामगारांच्या योगदानावर भर बारामती:…
दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना तातडीने आर्थिक मदत, संपूर्ण कर्जमाफी आणि वीजबिल माफी देण्याची मागणी मुंबई: राज्यातील दुष्काळग्रस्त…
पेपरफुटी रोखण्यासाठी कठोर उपाययोजना; २०२६-२७ पासून एकसमान शैक्षणिक वेळापत्रक लागू करणार मुंबई: राज्यातील दुष्काळग्रस्त भागातील…