भारतीय लोकांच्या रोजच्या आहारात वेगवेगळ्या डाळींचा समावेश असतो. या डाळींच्या सेवनाने शरीराला प्रोटीन सोबतच अनेक पोषक तत्व मिळतात. त्यामुळे एक्सपर्ट नेहमीच वेगवेगळ्या डाळींचं सेवन करण्याचा सल्ला देत असतात. अशात आज आम्ही तुम्हाला एका अशाच डाळीच्या फायद्यां बाबत सांगणार आहोत. या डाळीचं एक महिना सेवन केल्याने शरीरात जमा झालेली चरबी दूर होईल आणि तुम्हाला वजन कमी करण्यास मदत मिळेल. चला जाणून घेऊ सालीची मूग डाळ खाण्याचे फायदे.
मूग डाळीमधील पोषक तत्व
सालीच्या मूग डाळीमध्ये आयर्न, व्हिटॅमिन बी 6, व्हिटॅमिन सी, फायबर, कॉपर, फॉस्फोरस आणि मॅग्नेशिअम यांसारखे पोषक तत्व असतात. जे तुमचं एकंदर आरोग्य चांगलं ठेवण्यासाठी फायदेशीर ठरतात. तसेच यात आढळणारं फायबर तुमचं वजन कमी करण्यासही मदत करतं.
जास्तीत जास्त लोकांना हेच वाटतं की, तब्येत बिघडली किंवा पोट खराब झालं तेव्हाच या डाळीचं सेवन करावं. पण असं काही नाहीये. या डाळीच्या सेवनाने तुम्हाला अनेक फायदे मिळू शकतात. अशात आज जाणून घेऊ या डाळीच्या सेवनाचे फायदे.
वजन कमी करण्यासाठी मूग डाळ
मूग डाळीमध्ये कोलेसिस्टोकायनिन हार्मोन वाढवणारे तत्व असतात. ज्यामुळे तुमचं पोट जास्त वेळ भरलेलं राहतं.
मूग डाळीच्या सेवनाने मेटाबॉलिज्म बूस्ट होण्यास मदत मिळते. ज्याने तुम्हाला लवकर वजन कमी करता येईल.
मूग डाळीचं सेवन तुम्ही वेगवेगळ्या पद्धतीने करू शकता. भाजी, सलाद, सूप किंवा मोड आलेल्या मूग डाळीचं सेवन तुम्ही करू शकता.
मूग डाळीमध्ये फायबर भरपूर असतं. ज्यामुळे पोट जास्त वेळ भरलेलं राहतं. अशात तुम्ही जास्त काही खाणं टाळू शकता.
सकाळी रिकाम्या पोटी मोड आलेले मूग खाल्ल्याने तुमची पचनक्रिया मजबूत होण्यास मदत मिळते.
(सोशल मीडियावरून साभार)
चारचाकीसाठी माहेरहून पैसे आणण्याचा तगादा? छळाच्या आरोपावरून सात जणांविरुद्ध गुन्हा छत्रपती संभाजीनगर : अवघ्या चार…
पुणे : गणेशखिंड रस्त्यावरील शासकीय तंत्रनिकेतन महाविद्यालयात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा फोटो हटवल्याच्या प्रकरणात अमित…
मुंबई: वांद्रे-वरळी सी लिंक रेक्लेमेशनजवळ कोस्टल रोडवर शुक्रवारी रात्री भीषण अपघात झाला. ओव्हरटेक करण्याच्या प्रयत्नात…
पुणे : भाविकांना भीमाशंकर येथे दर्शनासाठी घेऊन आलेल्या २५ वर्षीय तरुण कारचालकाचा अचानक हृदयविकाराचा झटका…
शिक्रापूर (सुनिल जिते): शिक्षक दिनाचे औचित्य साधून मलठण विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटीच्या वतीने गावातील…
मुंबई : राज्यभरात दहीहंडीचा उत्सव मोठ्या उत्साहात आणि जल्लोषात साजरा होत असतानाच मुंबई आणि नवी…