पावसाळ्यात वातावरणात गारवा पसरलेला असतो. त्यामुळे त्वचेच्या अनेक समस्या उद्भवतात. वातावरणात आर्द्रता आणि चिकटपणा वाढतो ज्याचा परिणाम आपल्या त्वचेवर दिसून येतो.
पावसाळ्यामध्ये आपल्या त्वचेवर मुरुम, फोड, खाज सुटणे, पुरळ आणि टॅनिंगसारख्या समस्या उद्भवतात. ज्यामुळे त्वचा अधिक खराब होऊ लागते. अशावेळी चेहऱ्याची काळजी घेण्यासाठी त्वचेवर काय लावायला हवे पाहूया.
त्वचा आपल्याला फ्रेश आणि चमकदार हवी असेल गुलाब पाणी लावा. यामुळे त्वचा हायड्रेट आणि मॉइश्चयराझ होते. तसेच त्वचेवरील घाण, मृत पेशी आणि अतिरिक्त तेल निघून जाण्यास मदत होते.
कोरफडीचा गर हा त्वचेसाठी चांगला असतो. यामुळे त्वचेला थंडावा आणि ओलावा मिळतो. हा गर नियमितपणे लावल्यास त्वचेवरील लालसरपणा आणि जळजळ कमी होते.
काकडीचा रस हा त्वचेसाठी चांगला मानला आहे. यामुळे त्वचेला थंडावा आणि ओलावा मिळतो. यात असणारे अँटीऑक्सिडंट्स हे त्वचेवरील डाग, मुरुमे आणि काळी वर्तुळे काढून टाकण्यास मदत करतात.
मुलातानी माती त्वचेवरी घाण, मृत पेशी आणि अतिरिक्त तेल काढून टाकण्यास मदत करते. तसेच त्वचेला थंड करते. ज्यामुळे डाग, मुरुमे आणि टॅनिंगची समस्या दूर करते.
बेसन त्वचेवर लावल्याने मृत पेशी, घाण आणि अतिरिक्त तेल काढून टाकते. ज्यामुळे त्वचेवरील चिकटपणा दूर होतो. १० ते १५ मिनिटे बेसन लावून चेहरा थंड पाण्याने धुवा.
(सोशल मीडियावरून साभार)
शिरुर (तेजस फडके) एका वृद्ध व्यक्तीची हरवलेली बॅग तत्परतेने शोधून अवघ्या एका तासात संबंधित व्यक्तीच्या…
पुणे : काँग्रेसचे दिवंगत नेते आणि महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख हे देवेंद्र फडणवीस यांच्याइतकेच…
शिक्रापूर : शिक्रापूर (ता. शिरूर) येथील पत्रकार, सामाजिक कार्यकर्ते व प्राणीमित्र शेरखान शेख यांनी त्यांच्या…
शिरूर : शिरूर तालुक्यातील टाकळी भीमा हद्दीतील भीमा नदीच्या पात्रात थरारक गुन्ह्याची उकल करणारी घटना…
आजकाल लोक फिटनेस आणि स्नायूंची ताकद वाढवण्यासाठी अनेकदा अंडी आणि चिकनचे सेवन करतात, परंतु त्याऐवजी…
जसजसं तापमान वाढत जातं आरोग्यासंबंधी वेगवेगळ्या समस्या डोकं वर काढणं सुरू करतात. कमजोरी, थकवा, डिहायड्रेशन,…