आरोग्य

थंडीत नारळ पिण्याचे फायदे आणि तोटे

नारळाचं पाणी आरोग्यासाठी चांगलं असतं. आजारपण असो वा नसो नारळ पाणी पिणं कधीही चांगलं. आजारी पडल्यावर डॉक्टरही नारळ पाणी पिण्याचा सल्ला देत असतात. पण नारळ पाणी कोणत्या सीजनमध्ये प्यावे हे अनेकांना समजत नाही. थंडीच्या दिवसात म्हणजे हिवाळ्यात नारळ पाणी प्यायल पाहिजे का, असा प्रश्न अनेकांना पडतो. त्यावरच आज आपण प्रकाश टाकणार आहोत. नारळ पाणी हिवाळ्यात प्यावं की नाही? त्याचे काय आहेत फायदे आणि तोटे

केवळ आजारी असताना आणि उन्हाळ्यातच नारळ पाणी प्यायलं पाहिजे असा अनेकांचा समज आहे. नारळ थंड असते. त्यामुळे उन्हाळ्यात नारळ पाणी प्यायल्याने उष्माघातासह अनेक आजारापासून दिलासा मिळतो असंही असंही अनेकांना वाटत. पण उन्हाळ्यातच नव्हे तर तुम्ही थंडीच्या दिवसातही नारळ पाणी पिऊ शकता. हिवाळ्यात नारळ पाणी पिण्याचे असंख्य फायदे आहेत.

नो डिहायड्रेशन

हवेतील आर्द्रता सातत्याने कमी होऊन हिवाळ्यात हवेतील ओलावा कमी होतो. त्यामुळे डिहायड्रेशन (शरीरात पाणी कमी होणे) होण्याचा धोका वाढतो. अशावेळी जर तुम्ही रोज नारळाचे पाणी पित असाल, तर तुम्हाला डिहायड्रेशनची समस्या कधीच होणार नाही. हिवाळ्यात नारळाचे पाणी प्यायल्याने शरीर हायड्रेटेड राहते.

त्वचा कोरडी होत नाही

हिवाळ्यात अनेक लोकांना त्वचेशी संबंधित समस्या ग्रास्तात. त्वचेचा कोरडेपणा ही त्यातील महत्त्वाची समस्या असते. नारळाचे पाणी त्वचेला हायड्रेटेड ठेवण्यास मदत करते. यातील अँटीऑक्सिडंट्स शरीराला थंड आणि तापापासून दूर ठेवण्यास मदत करते. त्याचप्रमाणे, नारळाच्या पाण्यात असलेल्या फायबर्स तुमच्या पाचन प्रणालीला देखील उत्तम प्रकारे कार्यरत ठेवतात.

शरीराच्या तापमान नियंत्रणात

नारळाचे पाणी शरीराचे तापमान नियंत्रणात ठेवण्यास उपयुक्त असते. त्यामुळे हिवाळ्यातही त्याचा फायदा होतो. वजन वाढत असल्याबद्दल तुम्ही चिंतीत असाल तर नारळाचे पाणी प्यायल्याने तुमचे वजन नियंत्रणात राहते. कारण त्यात कॅलरीज अधिक असतात.

चहा आणि कॉफी सुटू शकेल

नियमितपणे नारळाचे पाणी प्यायल्यास तुमची चहा आणि कॉफीचे पिण्याची सवय सुटेल. परिणामी तुमचे कॅफिनचे सेवन कमी होईल. शरीरासाठी ते उत्तमच ठरेल. यामध्ये पुरेशी प्रमाणात मॅग्नेशियम, कॅल्शियम आणि पोटॅशियम असतो. पोटॅशियम शरीरातील सोडियमच्या स्तराचे संतुलन राखण्यास मदत करते आणि रक्तदाबाचे नियंत्रण सुधारते.

ऊर्जा वृद्धी

नारळाच्या पाण्यात असलेले नैसर्गिक शर्करा आणि इलेक्ट्रोलाइट्स शरीराला ऊर्जा देण्यास मदत करतात. हिवाळ्यातही त्याची ऊर्जा वाढवण्याची भूमिका महत्वाची असते. ते शरीराला ताजेतवाने ठेवते.

(सोशल मीडियावरून साभार)

शिरूर तालुका टीम

Recent Posts

Video! शिरूर शहरात पहाटे गोळीबार; तरुणाचा मृत्यू…

शिरूर (तेजस फडके) : शिरूर शहरातील लाटेआळी आंबेडकर नगर परिसरात आज (शुक्रवार) सकाळी साडेसहाच्या सुमारास…

13 तास ago

भिक्षा देण्यास नकार दिल्याने महिलेवर हल्ला; भिकाऱ्याने नाकाला घेतला चावा

मथुरा : गोवर्धन पर्वताला प्रदक्षिणा घालत असलेल्या एका महिलेने भिक्षा देण्यास नकार दिल्याने संतापलेल्या भिकाऱ्याने…

2 दिवस ago

तोंडाला सतत दुर्गंधी येते, दातांना कीड लागते, पाहा ‘असं’ का होत

रोज करायचे काय दिवसातून दोनदा दात घासा. सकाळी आणि रात्री. यामुळे दातांमध्ये काही अडकून राहणार…

2 दिवस ago

तापमान वाढीमुळे बंद पडू शकतं तुमचं हृदय, वाचा हार्ट अटॅकचा धोका जास्त कुणाला

वाढत्या तापमानाचा हृदयावर प्रभाव  हीटवेव किंवा जास्त तापमानामुळे कार्डिओवस्कुलर सिस्टीमवर प्रभाव पडतो, ज्यामुळे हार्ट अटॅकचा…

2 दिवस ago

गव्हाच्या पिठामध्ये ‘या’ ५ गोष्टी मिसळा आरोग्य राहिल निरोगी

अनेक भारतीय पदार्थांमध्ये गव्हाच्या पीठचा वापर केला जातो. गव्हाच्या पीठपासून चपाती किंवा मिठाई असे अनेक…

2 दिवस ago

नितीन नबीन यांची सुनेत्रा पवार यांची सदिच्छा भेट; महाराष्ट्रातील विकासकामांवर चर्चा

मुंबई: भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नबीन यांनी बुधवारी मुंबईतील देवगिरी या शासकीय निवासस्थानी…

2 दिवस ago