आरोग्य

यूरिक ॲसिड म्हणजे काय

यूरिक ॲसिड वाढण्याची समस्या वेगाने वाढत आहे. वय वाढत असताना शरीरात ‘गाऊट’ (आर्थरायटिस) होण्याची शक्यता जास्त असते. चुकीच्या जीवनशैलीमुळे, अयोग्य आहारामुळे आणि दिवसाच्या दिनचर्येत झालेल्या बदलांमुळे शरीरात यूरिक ॲसिड तयार होण्याची प्रक्रिया वाढते. भोजनाच्या पचन प्रक्रिये दरम्यान प्रथिनांपासून अमिनो ॲसिड आणि प्युरिन यांपासून यूरिक ॲसिड तयार होते. हे ॲसिड रक्तात असंतुलन निर्माण करते, ज्यामुळे सांध्यात (जोडांमध्ये) क्रिस्टल तयार होऊन वेदना होतात.

यूरिक ॲसिडची लक्षणे

सांधे आणि पायात वेदना.

पाय, टाच आणि सांध्यात सूज येणे.

एका जागी बराच वेळ बसल्यावर पायात त्रास होणे.

हाताच्या बोटात आणि सांध्यात चुभण किंवा जळजळ होणे. रक्तातील साखरेची पातळी वाढणे.

कमी करण्यासाठी उपाय

आहारात फायबरयुक्त पदार्थ जसे पालक, ब्रोकली, ओट्स, दलिया, इसबगोल यांचा समावेश करा.

आवळा, अलोवेरा रस सकाळ संध्याकाळ जेवणा आधी १० मिनिटे प्या.

टोमॅटो, द्राक्षांचा रस नियमित सेवन केल्यास यूरिक ॲसिड कमी होण्यास मदत होते.

अलसीचे बीज प्रत्येक जेवणानंतर १ चमचा चावून खा.

जैतून तेलाचा वापर स्वयंपाकासाठी तेल म्हणून वापरल्याने फायदा होतो.

जेवणा आधी अखरोट खाल्ल्यास पचन सुधारते आणि यूरिक ॲसिडची निर्मिती कमी होते.

विटामिन C युक्त पदार्थ जसे लिंबू, संत्री, इतर सायट्रस फळे खा.

टाळावयाच्या गोष्टी

मांसाहार जसे मासे, मटण, अंडी पूर्णपणे बंद करा.

बेकरी पदार्थ जसे पेस्ट्री, केक, बिस्किटे टाळा.

जंक फूड जसे पिझ्झा, बर्गर, तळलेले पदार्थ खाणे बंद करा.

तिखट, मसालेदार, साखरयुक्त पदार्थ या गोष्टी पचनाला हानी पोहोचवतात.

दारू आणि बीयर या गोष्टींमुळे यूरिक ॲसिड अधिक वाढते.

जीवनशैलीतील बदल

रोज ४५ मिनिटे वेगाने चालण्याची सवय लावा.

योगा आणि व्यायाम नियमित करा.

दररोज ४-५ लिटर पाणी प्या.

घरातील ताजा आणि संतुलित आहार घ्या.

नियमित तपासणी आणि उपचार करा. जर यूरिक ॲसिड वाढल्याची लक्षणे दिसली, तर डॉक्टरांचा सल्ला घ्या. योग्य आहार आणि दिनचर्या यामुळे समस्या नियंत्रणात राहते.

(सोशल मीडियावरून साभार)

शिरूर तालुका टीम

Recent Posts

शिरूर तालुक्यात विद्युत रोहित्र चोरट्यांच्या निशाण्यावर; रोहित्र फोडले अन्…

शिरूर (तेजस फडके) : शिरुर तालुक्यात शेतकऱ्यांच्या शेतीपंपांना वीजपुरवठा करणारी विद्युत रोहित्रे आता चोरट्यांच्या निशाण्यावर…

1 दिवस ago

गोकुळच्या अध्यक्षपदासाठी सत्तेचा खेळ? संचालकांना परराज्यात नेल्याने वडेट्टीवार संतप्त

१० नोव्हेंबरच्या निवडणुकीत सर्व संचालकांना मतदानाची संधी द्या; सतेज पाटील यांच्या पाठीशी काँग्रेस ठाम मुंबई: गोकुळ…

2 दिवस ago

संसार दोघांचा, त्याग मात्र एकटीचाच का? कुंकवाचा मान राखता, मग स्त्रीच्या भावनांचा सन्मान कुठे

लग्न म्हणजे केवळ दोन जीवांचे मिलन किंवा दोन कुटुंबांचे नाते नाही, तर दोन व्यक्तींनी एकमेकांच्या…

2 दिवस ago

चित्रपताका मराठी चित्रपट महोत्सवाचे अधिकृत संकेतस्थळ सुरू; १५ नोव्हेंबरपासून प्रभादेवीत रंगणार चित्रपटांची मेजवानी!

नोंदणी शुल्क मुख्यमंत्री सहाय्यता निधीला देणार; ३५ मराठी चित्रपट, ७ परिसंवाद, ४ विशेष मुलाखती आणि…

2 दिवस ago

राज्यात डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठाची चार विभागीय केंद्रे; आठ विद्यापीठांत उपकेंद्रे सुरू होणार

चंद्रकांतदादा पाटील यांचे तातडीने कार्यवाहीचे निर्देश; कुलगुरूंना जागा उपलब्ध करून देण्याच्या सूचना मुंबई : राज्यातील विद्यार्थ्यांना…

2 दिवस ago

मनसेचे प्रदेश सरचिटणीस रणजित शिरोळे यांचा काँग्रेसमध्ये प्रवेश; भाजप, आपच्या पदाधिकाऱ्यांचाही पक्षप्रवेश!

राहुल गांधींचे हात बळकट करण्यासाठी काँग्रेसमध्ये प्रवेश; हर्षवर्धन सपकाळ यांच्या उपस्थितीत टिळक भवनात पक्षप्रवेश सोहळा…

2 दिवस ago