आरोग्य

हळद व कोमट पाणि पिण्याचे फायदे

जास्तीत जास्त लोक सकाळी उठताच गरम पाणी आणि लिंबू सेवन करतात. यामुळे त्यांचे पोट साफ राहते आणि पोटातील मळ बाहेर पडतो. लिंबू टाकून गरम पाणी पिण्याचे फायदे तर आपणा सर्वांनाच माहिती आहेत. परंतु जर याच मिश्रणामध्ये थोडीशी हळद मिक्स केली तर याचे गुण अजूनच वाढतील. चला तर मग आज आपण जाणुन घेऊया हे पाणी सकाळी सेवन केल्याने कोणते फायदे होतात आणि पाणी कसे तयार करावे.

साहित्य

अर्धा लिंबू, अर्धा टि स्पून हळद, गरम पाणी, थोडेसे मध (वैकल्पिक)

कृती

एक ग्लास गरम पाण्यात अर्धा लिंबू पिळून त्यामध्ये हळद आणि गरम पाणी मिसळा.यानंतर त्यामध्ये चवीनुसार मध मिसळा. हे मिश्रण तुम्ही हलवत राहा. यामुळे हळद खाली बसणार नाही. हळदीचे पाणी पिण्याचे 8 आरोग्य फायदे… हे फायदे वाचल्यावर तुम्ही नियमित हळदीचे पाणी पिणे सुरु कराल…

शरीराची सूज कमी करते:- शरीरावर कितीही सूज आलेली असेल तर हळदीचे पाणी घेतल्यावर सूज कमी होऊन जाईल. यामध्ये करक्यूमिन नामक एक रसायन असते. जे औषधाच्या रुपात काम करते.

मेंदूला सुरक्षित ठेवते:- नियमित हळदीचे पाणी पिऊन विसरण्याचा आजार जसे की, डिमेंशिया आणि अल्जाइमरला दूर केले जाऊ शकते. हळद मेंदूसाठी खुप चांगली असते.

अँटी कँसर गुण:- करक्यूमिन असल्यामुळे हळद एक खुप चांगले अँटीऑक्सींडेंट असते. हे कँसर निर्माण करणा-या कोशिकांसोबत लढते.

पोटाच्या समस्या:- एका संशोधनाप्रमाणे नियमित हळदी खाल्ल्याने पित्त जास्त बनते. यामुळे जेवण सहज पचन होते.

हृदय सुरक्षित ठेवते:- हळदीचे पाणी पिल्याने रक्त जमा होत नाही. यासोबतच धमन्यांमध्ये रक्त साचत नाही.

अर्थराइट्सचे लक्षण दूर:- यामध्ये करक्यूमिन असल्यामुळे हे जॉइंट पेन आणि सूज दूर करण्यासाठी फायदेशीर असते. हे या रोगावर एका औषधी प्रमाणे काम करते.

वय कमी करते:- नियमित हळदीचे पाणी पिल्याने फ्री रॅडिकल्ससोबत लढण्यात मदत मिळते. ज्यामुळे शरीरावर होणारा वयाचा परिणाम धिम्या गतिने होतो.

(सोशल मीडियावरुन साभार)

शिरूर तालुका टीम

Recent Posts

Video! शिरूर शहरात पहाटे गोळीबार; तरुणाचा मृत्यू…

शिरूर (तेजस फडके) : शिरूर शहरातील लाटेआळी आंबेडकर नगर परिसरात आज (शुक्रवार) सकाळी साडेसहाच्या सुमारास…

1 तास ago

भिक्षा देण्यास नकार दिल्याने महिलेवर हल्ला; भिकाऱ्याने नाकाला घेतला चावा

मथुरा : गोवर्धन पर्वताला प्रदक्षिणा घालत असलेल्या एका महिलेने भिक्षा देण्यास नकार दिल्याने संतापलेल्या भिकाऱ्याने…

1 दिवस ago

तोंडाला सतत दुर्गंधी येते, दातांना कीड लागते, पाहा ‘असं’ का होत

रोज करायचे काय दिवसातून दोनदा दात घासा. सकाळी आणि रात्री. यामुळे दातांमध्ये काही अडकून राहणार…

1 दिवस ago

तापमान वाढीमुळे बंद पडू शकतं तुमचं हृदय, वाचा हार्ट अटॅकचा धोका जास्त कुणाला

वाढत्या तापमानाचा हृदयावर प्रभाव  हीटवेव किंवा जास्त तापमानामुळे कार्डिओवस्कुलर सिस्टीमवर प्रभाव पडतो, ज्यामुळे हार्ट अटॅकचा…

1 दिवस ago

गव्हाच्या पिठामध्ये ‘या’ ५ गोष्टी मिसळा आरोग्य राहिल निरोगी

अनेक भारतीय पदार्थांमध्ये गव्हाच्या पीठचा वापर केला जातो. गव्हाच्या पीठपासून चपाती किंवा मिठाई असे अनेक…

1 दिवस ago

नितीन नबीन यांची सुनेत्रा पवार यांची सदिच्छा भेट; महाराष्ट्रातील विकासकामांवर चर्चा

मुंबई: भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नबीन यांनी बुधवारी मुंबईतील देवगिरी या शासकीय निवासस्थानी…

1 दिवस ago