आरोग्य

रोज सकाळी रिकाम्या पोटी लवंग खाण्याचे फायदे

किचनमधील अनेक मसाल्यांना आयुर्वेदात फार महत्व आहे. अनेक मसाले हे औषधींचा भांडार मानले जातात. वेगवेगळ्या आजारांवर उपचार करण्यासाठी या मसाल्यांचा वापर केला जातो. भारतीय किचनमधील असाच एक मसाला म्हणजे लवंग. लवंग दिसायला जरी छोटी असली तर याचे फायदे भरपूर आहेत. सकाळी रिकाम्या पोटी लवंग खाल्ल्याने पोटासंबंधी अनेक समस्या दूर होतात.

लवंगमध्ये व्हिटॅमिन, फायबर, प्रोटीन, आयर्न, कॅल्शिअम, पोटॅशिअम, फॉस्फोरस, मॅगनीज, कार्बोहायड्रेट आणि अ‍ॅंटी ऑक्सीडेंट्स आढळतात. हे तत्व अनेक आजारांचा धोका कमी करतात.

लिव्हर हेल्दी राहील: लिव्हर शरीरातील महत्वाच्या अवयवांपैकी एक आहे. याद्वारे शरीरातील विषारी पदार्थ बाहेर काढले जातात. अशात लिव्हर नेहमीच हेल्दी राहणं फार गरजेचं असतं. जर तुम्ही नियमितपणे लवंग खाल तर तुमचं लिव्हर हेल्दी राहणार.

इम्यूनिटी वाढते: शरीराला आजारांपासून वाचवण्यासाठी गरजेचं आहे की, आपली इम्यूनिटी मजबूत रहावी. लवंगमध्ये व्हिटॅमिन सी भरपूर असतं आणि सोबतच यात ॲटी ऑक्सिडेंट्सही असतात. जर लवंग रिकाम्या पोटी खाल तर याने पांढऱ्या रक्तपेशी देखील वाढतात. तसेच शरीराची इम्यूनिटी सुद्धा वाढते.

दातांच दुखण होईल दूर: जर तुमच्या दातांमध्ये वेदना होत असेल तर लवंगचा वापर करू शकता. लवंगमध्ये एनाल्जेसिक गुण असतात जे दातांचं दुखणं कमी करतात. इतकंच नाही तर डोकेदुखी होत असेल तर तुम्ही याच्या तेलाचा सुगंध घेऊ शकता. याने लगेच आराम मिळेल. जर हिरड्यांमध्ये इन्फेक्शन झालं असेल तर लवंगाच्या पाण्याने गुरळा करा.

तोंडाची दुर्गंधी होईल दूर: वेगवेगळ्या कारणांनी तोंडाची दुर्गंधी येते. अशात लोक तुमच्यापासून दूर पळतात. तोंडाची दुर्गंधी घालवण्यासाठी लोक वेगवेगळे उपाय करतात. मात्र, केवळ लवंगच्या मदतीने तुम्ही ही समस्या दूर करू शकता.

हाडं होतील मजबूत: लवंग हाडांसाठी देखील खूप फायदेशीर आहे. जर हाडं कमजोर असतील तर तुम्ही सकाळी झोपेतून उठून दोन लवंग चावून खाव्यात. यात मॅगनीज भरपूर असतं. ज्यामुळे हाडं मजबूत होण्यास मदत मिळते.

लवंगाचा चहा: लवंगमध्ये भरपूर प्रमाणात औषधी गुण आहेत. लवंग गरम असल्याने हिवाळ्यात याचं सेवन करण्याचं महत्त्व आणखीन वाढतं. त्यामुळे याचे आरोग्याला अनेक फायदे होतात. अशात हिवाळ्यात लवंगाचा चहा सेवन केल्यास फायदा होतो.

कसा कराल चहा: लवंगाचा चहा तयार करण्यासाठी चार ते पाच लवंग उकडून घ्या. यात मध मिश्रित करुन दिवसातून दोन ते तीन वेळा सेवन करा. याने अस्थामाच्या रुग्णांना फायदा होतो.

(सोशल मीडियावरून साभार)

शिरूर तालुका टीम

Recent Posts

ध्येयपूर्तीसाठी सर्वस्व समर्पण आवश्यक; विद्यार्थ्यांनी ध्येयासाठी वेडे व्हावे : डॉ. चंद्रकांत पाटील

शिक्रापूर : विद्यार्थ्यांनी केवळ उत्साही राहून चालणार नाही, तर ध्येयप्राप्तीसाठी वेडे होऊन सर्वस्व समर्पित करण्याची…

3 तास ago

Video; शिरुर ग्रामीण ग्रामपंचायतीचा भोंगळ कारभार चव्हाट्यावर; बाबुरावनगरमध्ये सांडपाण्याचे साम्राज्य

शिरुर (तेजस फडके): शिरुर ग्रामीण ग्रामपंचायतीच्या भोंगळ आणि निष्क्रिय कारभाराचा फटका बाबुरावनगर परिसरातील हजारो नागरिकांना…

3 तास ago

दानशूरतेतून विद्यार्थ्यांच्या स्वप्नांना नवे पंख; युवा उद्योजक अमोल पुंडे यांच्याकडून गरजू विद्यार्थ्यांना मोफत सायकली

पाबळ (सुनिल जिते): शिक्षणासाठी आर्थिक अडचणींशी झुंज देणाऱ्या विद्यार्थ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहत कान्हूर मेसाई…

5 तास ago

‘नमो’ निधीला कात्री, शेतकऱ्यांची फसवणूक; सरकारवर वडेट्टीवारांचा घणाघाती हल्ला

कर्जमाफी, ओबीसी आरक्षण आणि गोसीखुर्द कालवा दुर्घटनेवर सरकारला धारेवर धरले; ३ ऑगस्टपासून 'मंडल यात्रा'ची घोषणा.…

24 तास ago

अण्णा भाऊ साठे नाट्यगृहाचे लोकार्पण; त्यांच्या विचारांचा वारसा पुढील पिढ्यांपर्यंत पोहोचविणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मुंबई: भायखळा येथील नूतनीकृत लोकशाहीर अण्णा भाऊ साठे नाट्यगृहाचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते लोकार्पण…

1 दिवस ago

अण्णाभाऊ साठेंच्या विचारांना नवी ऊर्जा; संशोधन केंद्र, नाट्यगृह आणि वाटेगावात ५० कोटींचे स्मारक

मुंबई: लोकशाहीर साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांच्या नावाने नूतनीकरण व विस्तारीकरण करण्यात आलेल्या नाट्यगृहाचे लोकार्पण मुख्यमंत्री…

1 दिवस ago