केस गळणं, केसांना फाटे फुटणं, केस पातळ होणं अशा समस्या अनेकांना उद्भवतात. यासाठी घरगुती उपायात तुळशीचा वापर करावा. तुळशीच्या सेवनाने इम्यूनिटी वाढून सर्दी खोकला दूर होतो, इतकंच नाही तर केस लांबसडक दाट होण्यास मदत होते. जर केस फारच विरळ झाले असतील, तर त्यावर तुळशीचा वापर करुन केसांची लांबी वाढवू शकता.
तुळशीमुळे केस डिटॉक्स होण्यास मदत होते आणि स्काल्प टॉक्सिन्स, प्रदूषणापासून सुरक्षित राहतो. यामुळे खाज येणं, इरिटेशन, फंगल इन्फेक्शन आणि कोंड्याच्या समस्येपासून आराम मिळतो. तुळशीत एंटी फंगल, एंटी बॅक्टेरिअल, एंटीऑक्सिडंट्स गुणधर्म असतात, ज्यामुळे स्काल्पचे गंभीर त्रास उद्भवत नाहीत. केस आतल्या बाजूने सॉफ्ट होतात आणि इन्फेक्शन पासूनही बचाव होतो.
नारळाचे तेल आणि तुळशीची पान
तुळशीची काही पानं घ्या आणि उन्हात सुकवा. ही पानं सुकवण्याआधी धुवायला विसरू नका. जेव्हा सर्व पानं सुकतील तेव्हा एका बाऊल मध्ये नारळाचं तेल घाला. त्यात तुळशीची सुकलेली पानं आणि आवळा पावडर मिसळा. त्यानंतर गरम करून घ्या. ५ मिनिटांनी गॅस बंद करा. जेव्हा हे तेल पूर्ण थंड होईल तेव्हा बाटलीत भरा. या तेलाने आठवड्यातून २ वेळा केसांची मसाज करा.
तुळस आणि नारळाची साय
केस जास्त तेलकट असतील तर नारळाच्या तेलाऐवजी नारळाच्या मलईचा वापर करू शकता. ही नारळाची मलई काढून त्यात तुळशीच्या पानांची पेस्ट तयार करा. या पेस्टने केसांची मसाज करा. त्यानंतर केस स्वच्छ धुवून घ्या. ही पेस्ट केसांना लावल्यास कोंड्यांची समस्या दूर होते. या पेस्टने केसांची हळूहळू मसाज करा. त्यानंतर केस स्वच्छ पाण्याने धुवा. यामुळे केसात कोंडा होणार नाही.
(सोशल मीडियावरून साभार)
पाटबंधारे विभाग म्हणतो महिनाभरापूर्वीच नावासह यादी पोलिसांना दिली; मग शिरुर पोलिसांच्या कारवाईला मुहूर्त कधी...? …
शिरूर : पुणे जिल्हा परिषदेच्या मॉडेल स्कूल, गुणवत्ता विकास कार्यक्रम, विद्यार्थ्यांच्या राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय क्षेत्रभेटी…
नागपूर : नागपूर येथे आंदोलनादरम्यान युवक काँग्रेसचे अध्यक्ष शिवराज मोरे यांच्यावर झालेल्या हल्ल्याचे पडसाद उमटले…
मुंबई : महाराष्ट्रातील अभियांत्रिकी आणि पॉलिटेक्निक विद्यार्थ्यांची कौशल्य क्षमता, रोजगारक्षमता आणि उद्योगसज्जता वाढविण्यासाठी उद्योगाभिमुख प्रशिक्षण,…
मुंबई: डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठ, लोणेरे (DBATU) अंतर्गत विद्यार्थ्यांच्या तक्रारी आणि शैक्षणिक समस्यांचे जलद,…
मुंबई: विद्यार्थ्यांच्या नवकल्पना, संशोधन आणि उद्योजकतेला व्यापक संधी उपलब्ध करून देत महाराष्ट्राची स्टार्टअप परिसंस्था अधिक सक्षम…