आरोग्य

पावसाळ्यात फंगल इन्फेक्शनचा धोका, लहान मुलांची विशेष काळजी घ्या

पावसाळ्यात त्वचाविकारांचे प्रमाण वाढत असल्याचे आढळून आले आहे. रुग्णालयांत त्वचाविकारांचे रुग्ण ३० ते ४० टक्क्यांनी वाढले आहेत. सतत भिजणे, ओलसर कपडे परिधान करणे या विविध कारणांमुळे फंगल इन्फेक्शनचा धोका वाढतो. हा आजार दुर्लक्षित केला तर तो गंभीर संसर्गाचे रूप धारण करू शकतो. त्वचारोगतज्ज्ञांनी नागरिकांना स्वच्छता आणि त्वचेची योग्य काळजी घेण्याचे आवाहन केले आहे.

पावसाळ्यात खाज, डेंड्रफ टिनिया (रिंगवर्म), बुरशीजन्य दाणे, ॲथलिट्स फूट यासारखे विकार सर्रास आढळून येतात. या विकारांमागे दमट हवामान आणि स्वच्छतेकडे दुर्लक्ष ही काही कारणे आहेत. पावसात पडणे, घसरणे किंवा सतत ओलसर कपडे वापरण्याने त्वचेवर होणाऱ्या किरकोळ जखमादेखील बुरशीजन्य संसर्गाचे माध्यम बनतात. या जखमांकडे दुर्लक्ष करू नये अन्यथा संसर्ग शरीरभर पसरू शकतो, असे आरोग्यतज्ज्ञांनी सांगितले.

त्वचारोगांपासून बचाव कसा कराल

खाज येत असल्यास स्वतःहून औषधे न वापरता डॉक्टरांचा सल्ला घ्या. पावसात भिजल्यानंतर त्वचा कोरडी पुसून घ्या.

शक्यतो कॉटनचे आणि सैलसर कपडे वापरा.

ओलसर कपडे किंवा बूट जास्त काळ वापरणे टाळा.

 

पावसाळ्यात त्वचाविकारांत वाढ होते. त्वचेच्या विकारांवर वेळेत उपचार करणे गरजेचे असते. अन्यथा गुंतागुंत निर्माण होऊ शकते. या काळात ३० ते ४० टक्क्यांनी त्वचाविकाराचे रुग्ण वाढत असतात. रुग्णाच्या आजारांची लक्षणे बघून त्यांवर औषधोपचार करण्यात येत असतात.

 

लहान मुलांची विशेष काळजी आवश्यक

 

लहान मुलांची त्वचा नाजूक असल्यामुळे त्यांना त्वचाविकारांची शक्यता अधिक असते. त्यामुळे भिजल्यानंतर कपडे त्वरित बदलणे, त्वचा कोरडी ठेवणे आणि माती किंवा चिखलात खेळताना खबरदारी घेणे गरजेचे आहे. तसेच घरी आल्यावर अंग स्वच्छ करणे गरजेचे आहे.

 

(सोशल मीडियावरून साभार)

 

शिरूर तालुका टीम

Recent Posts

घोड धरणात प्रशासनाच्या नाकावर टिच्चून सर्रास बेकायदेशीर वाळूउपसा; घोड पाटबंधारे, महसूल अन् पोलिस प्रशासन वाळू माफियांसमोर हतबल…?

शिरुर (तेजस फडके) घोड धरणाच्या परिसरात दिवसाढवळ्या बेकायदेशीर वाळूउपशाचा धडाका सुरुच असुन घोड धरणाच्या सुरक्षेचा…

14 तास ago

रांजणगावात जुन्या भांडणातून तरुणावर हल्ला; कोयता, दगड, फायटरने मारहाण

रांजणगाव गणपती (तेजस फडके) रांजणगाव गणपती गावच्या हद्दीत जुन्या भांडणाच्या कारणावरुन एका १९ वर्षीय तरुणासह…

17 तास ago

Video! शिरूरमध्ये झालेल्या गोळीबारातील हरिश गंगावणे याच्या खुनाची Inside Story…

शिरूर (तेजस फडके): शिरूर शहरात शुक्रवारी (ता. १८) पहाटेच्या सुमारास गोळीबाराची धक्कादायक घटना घडल्याने परिसरात…

19 तास ago

Video! शिरूर शहरात पहाटे गोळीबार; तरुणाचा मृत्यू…

शिरूर (तेजस फडके) : शिरूर शहरातील लाटेआळी आंबेडकर नगर परिसरात आज (शुक्रवार) सकाळी साडेसहाच्या सुमारास…

2 दिवस ago

भिक्षा देण्यास नकार दिल्याने महिलेवर हल्ला; भिकाऱ्याने नाकाला घेतला चावा

मथुरा : गोवर्धन पर्वताला प्रदक्षिणा घालत असलेल्या एका महिलेने भिक्षा देण्यास नकार दिल्याने संतापलेल्या भिकाऱ्याने…

3 दिवस ago

तोंडाला सतत दुर्गंधी येते, दातांना कीड लागते, पाहा ‘असं’ का होत

रोज करायचे काय दिवसातून दोनदा दात घासा. सकाळी आणि रात्री. यामुळे दातांमध्ये काही अडकून राहणार…

3 दिवस ago