आरोग्य

साखरे ऐवजी गुळ वापरण्याचे फायदे

उसाचा रस आटवून गुळ तयार केला जातो. गूळ तयार करताना उसात असणारी विविध पोषकतत्वे, खनिजे, क्षार व व्हिटॅमिन्स गुळात टिकून राहतात. यात लोह, मॅग्नेशियम, पोटॅशियम, मँगनीज ही पोषकघटक मुबलक असून यात व्हिटॅमिन-बी, कॅल्शिअम, जस्त, फॉस्फरस व तांबे यासारखी महत्वाचे घटकही असतात.

गुळ खाण्याचे फायदे

हिमोग्लोबिन वाढवते: ऍनिमिया दूर करण्यासाठी गुळ खाणे फायदेशीर असते. १०० ग्रॅम गुळात ११ mg लोहाचे प्रमाण असते. रक्तातील हिमोग्लोबिनचे प्रमाण कमी झाल्याने ऍनिमिया किंवा पांडुरोग होत असतो. अशावेळी हिमोग्लोबिनचे प्रमाण वाढण्यास गूळ फार उपयुक्त असतो.

रक्तदाब नियंत्रित ठेवतो: गूळ खाण्यामुळे ब्लडप्रेशर योग्य ठेवण्यास मदत होते. कारण गुळात मुबलक प्रमाणात पोटॅशिअम असल्याने रक्तदाब नियंत्रित राहतो.

पचनशक्ती सुधारते: गुळामुळे पचनशक्ती सुधारण्यास मदत होते. तसेच गूळ खाण्यामुळे नियमित पोट साफ होऊन बद्धकोष्ठता दूर होण्यास मदत होते.

स्त्रियांसाठी उपयुक्त: सर्वच वयोगटातील स्त्रियांसाठी गुळ खाणे उपयुक्त असते. कारण मासिक पाळी, अयोग्य आहार यांमुळे स्त्रियांत हिमोग्लोबिनचे प्रमाण खूपच कमी आढळते. यासाठी वयात येणाऱ्या मुली, मासिक पाळी असणाऱ्या स्त्रियांनी गुळाचा आहारात जरूर समावेश करावा. गरोदरपणातही लोहाचे खूप महत्त्व असते. यासाठी गरोदर स्त्रियांना प्रेग्नन्सी मध्ये आणि डिलिव्हरी नंतरही गूळ हितकारी असतो.

गुळाचे महत्व नि फायदे

आयुर्वेदात गुळाचे खूप महत्व आहे. त्यामुळे अनेक आयुर्वेदिक औषधे गुळाबरोबर दिली जातात. गुळ हे वातनाशक असून सुंठी बरोबर खाल्ल्यास वाताचे शमन होऊन मज्जावह संस्थेला म्हणजे नर्व्हस सिस्टीमला बल देते. जुना गुळ खाल्यास कफनाशनाचे कार्य होते. गुळामुळे दमा, खोकला यासारखे कफाचे विकार कमी होण्यास मदत होते. शरीरातील थकवा दूर करण्यासही गुळ उपयोगी ठरतो.

साखर खाणे चांगले की गुळ खाणे चांगले

साखरेच्या तुलनेत गुळ पौष्टिक असतो. साखरेपेक्षा गूळ हा श्रेष्ठ आहे. साखरेत केवळ कॅलरीज असतात आणि याशिवाय कोणतेही उपयुक्त पोषकतत्वे नसतात. त्यामुळे साखरेचे पदार्थ अति खाण्यामुळे शरीरात अतिरिक्त कॅलरीज वाढून वजन व चरबी वाढत असते. त्यामुळे हृदयविकार व डायबेटीसचा धोकाही वाढत असतो. तर गुळात लोह (आयर्न), मॅग्नेशियम, कॅल्शिअम, व्हिटॅमिन-बी अशी अनेक आवश्यक पोषकतत्वे असतात. तसेच शरीरात गुळाचे शोषण धिम्यागतीने होते. त्यामुळे रक्तातील साखर लगेच वाढत नाही. त्यामुळे साखर आणि गुळाची तुलना करता, आरोग्यासाठी गुळ खाणे हितकारक असते.

गुळ खाण्यामुळे होणारे नुकसान

अधिक प्रमाणात गुळ खाण्यामुळे वजन वाढू शकते. वजन अधिक वाढण्यामुळे डायबेटीस, हृदय विकार होण्याचा धोकाही वाढू शकतो. गूळ अधिक खाण्यामुळे पोटात जंत होण्याचा त्रास होऊ शकतो. आमवात किंवा rheumatoid arthritis चा त्रास असल्यास गुळ खाणे टाळावे. कारण यात sucrose चे प्रमाण अधिक असल्याने या त्रासात सांध्यातील सूज वाढू शकते. तसेच रक्तातील साखर (ब्लड शुगर) वाढू शकते. त्यामुळे डायबेटीस रुग्णांनी गूळ अधिक खाणे टाळावे. मधुमेह असणाऱ्यानी आपल्या डॉक्टरांच्या सल्ल्याने गुळाचा समावेश करावा.

(सोशल मीडियावरून साभार)

शिरूर तालुका टीम

Recent Posts

SIR मोहिमेवर काँग्रेस आक्रमक; दावे-हरकतींसाठी ३० नोव्हेंबरपर्यंत मुदतवाढीची मागणी

मुंबई: महाराष्ट्रात सुरू असलेल्या SIR (Special Intensive Revision) मोहिमेत मोठ्या संख्येने मतदारांची नावे प्रारूप मतदार…

5 मिनिटे ago

साखर कारखान्यांसाठी ‘सॉफ्ट लोन’ योजना; एफआरपी वेळेत देण्यासाठी राज्य सरकारचा मोठा निर्णय

मुंबई : राज्यातील सहकारी साखर कारखान्यांना आगामी गाळप हंगामाच्या पूर्वतयारीसाठी तसेच शेतकऱ्यांना एफआरपीची रक्कम वेळेत अदा…

2 तास ago

१७ सप्टेंबरला बीड–पुणे रेल्वे धावणार; डिसेंबरअखेर बीड–मुंबई सेवाही सुरू करण्याचे उद्दिष्ट

मुंबई: बीड जिल्ह्यासह संपूर्ण मराठवाड्याच्या विकासासाठी महत्त्वपूर्ण ठरणारी बीड–पुणे रेल्वे सेवा येत्या १७ सप्टेंबर रोजी…

2 तास ago

शिंदे गटाला निकालाआधीच टेन्शन? ‘धनुष्यबाण ठाकरेंनाच मिळणार’; असीम सरोदे यांचा मोठा दावा

मुंबई: सर्वोच्च न्यायालयात शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाण चिन्हासंदर्भातील सुनावणी निर्णायक टप्प्यात पोहोचली असून, आजपासून शिंदे…

2 तास ago

अष्टविनायक यात्रा म्हणजे श्रद्धा, इतिहास आणि निसर्गाचा अनोखा संगम; जाणून घ्या आठही गणरायांचे महत्त्व

Pपुणे : महाराष्ट्राच्या समृद्ध सांस्कृतिक आणि आध्यात्मिक परंपरेत अष्टविनायक यात्रेला अनन्यसाधारण महत्त्व आहे. श्रीगणेशाची आठ…

2 तास ago

धनुष्यबाण गोठवण्याची मागणी करणाऱ्यांवर शिंदेंची खरमरीत टीका; ‘उबाठा’वर निशाणा

नवी दिल्ली: “बाळासाहेब ठाकरे यांना धनुष्यबाण प्राणाहून प्रिय होता. ते देव्हाऱ्यात धनुष्यबाणाची पूजा करायचे. मात्र, २०१९…

3 तास ago