बदलेल्या जीवनशैलीमुळे खाण्यापिण्याच्या सवयी बदलल्या आहेत. सतत जंकफूड, पुरेशी झोप न घेणे, ताणतणाव आणि कॅफिनचे अधिक सेवन यामुळे आपल्या शरीरावर याचा वाईट परिणाम होतो. अशावेळी आपली पचनक्रिया खराब होऊन अॅसिड रिफ्लक्सची समस्या वाढते.
आम्लपित्ताचा त्रास वाढतो. अरबट-चरबट पदार्थ खाल्ल्याने शरीरात पित्तदोष निर्माण होतो. पित्ताचा त्रास वाढला की डोकेदुखी, छातीत जळजळ होणे, आंबट पाणी, उलट्या होणे आणि अस्वस्थ वाटणे यांसारख्या समस्या वाढतात. अशावेळी काही घरगुती उपाय केल्याने पित्ताचा त्रास कमी होऊ शकतो.
आपल्या रिकाम्या पोटी ५ पुदिन्याची पाने खावी लागतील. पुदिन्याची पाने आरोग्यासाठी फायदेशीर आहेत. यामध्ये असणारे घटक पचन सुधारण्यास, डोकेदुखी कमी करण्यास मदत करतात. तसेच तोंडाची दुर्गंधी आणि त्वचेसाठी देखील फायदेशीर आहे. पुदिन्यामध्ये व्हिटॅमिन सी असते जे रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यास मदत करते. पुदिन्यामध्ये ऍलर्जी-विरोधी गुणधर्म असतात, ज्यामुळे ऍलर्जीची लक्षणे कमी होतात.
पुदिन्याची पाने खाताना त्यामध्ये चण्याऐवढा भिमसेन कापूर घालून ५ पाने चघळून खावी. किंवा या पानांसोबत खडीसाखर खाल्ल्याने पित्ताचा त्रास कमी होतो. वारंवार त्रास देणाऱ्या पित्ताच्या त्रासकडे दुर्लक्ष करु नका कारण समस्या गंभीर होऊन आजार वाढू शकतो. अॅसिडिटी आणि अपचनाचा त्रास होत असेल तर हा उपाय करुन पाहा.
पुदिन्याची पाने खाल्ल्याने शरीराला थंडावा मिळतो. तसेच पुदिन्याची पाने पाण्यात उकळून त्यात मध किंवा लिंबू घालून त्याचा चहा प्या. इतकेच नाही तर पुदिन्याची पाने पाण्यात रात्रभर भिजवून सकाळी ते पाणी प्या. जेवणात पुदिन्याची चटणी था. असं केल्याने आपल्याला पित्ताच्या त्रासापासून आराम मिळेल.
(सोशल मीडियावरून साभार)
मथुरा : गोवर्धन पर्वताला प्रदक्षिणा घालत असलेल्या एका महिलेने भिक्षा देण्यास नकार दिल्याने संतापलेल्या भिकाऱ्याने…
रोज करायचे काय दिवसातून दोनदा दात घासा. सकाळी आणि रात्री. यामुळे दातांमध्ये काही अडकून राहणार…
वाढत्या तापमानाचा हृदयावर प्रभाव हीटवेव किंवा जास्त तापमानामुळे कार्डिओवस्कुलर सिस्टीमवर प्रभाव पडतो, ज्यामुळे हार्ट अटॅकचा…
अनेक भारतीय पदार्थांमध्ये गव्हाच्या पीठचा वापर केला जातो. गव्हाच्या पीठपासून चपाती किंवा मिठाई असे अनेक…
मुंबई: भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नबीन यांनी बुधवारी मुंबईतील देवगिरी या शासकीय निवासस्थानी…
नागपूर: महाराष्ट्रातील दुष्काळाची परिस्थिती दिवसेंदिवस गंभीर होत असून सोयाबीनचे पीक हातचे गेले आहे, तर अनेक…