आरोग्य

तेलकट- तुपकट न खाताही कोलेस्टेरॉल वाढत,मग या ५ गोष्टी करा- कोलेस्टेरॉल कमी होईल

आपली जीवनशैली बदलली तसे तसे आजार आणि त्यांचे स्वरुपही बदलले. हल्ली कमी वयातच मधुमेह, रक्तदाब, हृदयविकार असे त्रास तर होतच आहेत. पण त्यासोबतच रक्तातील कोलेस्टेरॉल, ट्रायग्लिसराईड वाढणे यांचे प्रमाणही खूप असल्याचे दिसून येते..

रक्तातले हे दोन्ही घटक वाढले की अनेक जण तब्येतीच्या बाबतीत खूप सतर्क होतात. तेलकट- तुपकट पदार्थांसह गोड पदार्थ खाणंही कमी करतात. पण तरीही अनेकांच्या कोलेस्टेरॉल पातळीत काही फरक दिसून येत नाही त्यांचं कोलेस्टेरॉल नेहमीच वाढलेलं दिसतं. तुमच्याही बाबतीत असं होत असेल तर रक्तातील कोलेस्टेरॉलची पातळी कमी करण्यासाठी नेमकं काय करावं ते पाहा..

कोलेस्टेरॉल कमी करण्यासाठी काय कराव

रक्तातील कोलेस्टेरॉल कमी करण्यासाठी किंवा नियंत्रित ठेवण्यासाठी कोणकोणते उपाय करता येतील, याविषयी मायोक्लिनिक लिंकवर तज्ज्ञांनी पुढे सांगितलेल्या काही गोष्टी सुचविल्या आहेत.

1) आहारात फायबरयुक्त पदार्थ अधिकाधिक प्रमाणात असावे. जर आहारात पुरेशा प्रमाणात फायबर असतील तर LDL म्हणजेच बॅड कोलेस्टेरॉल शरीराबाहेर फेकण्यास मदत होते. यासाठी ओट्स, सफरचंद, गाजर, बीन्स, मसूर, रताळे, ॲव्हाकॅडो, बदाम असे पदार्थ दररोजच खायला हवे.

2) शारिरीकदृष्ट्या तुम्ही जेवढं ॲक्टीव्ह राहाल तेवढं तुमचं कोलेस्टेरॉल नियंत्रित राहण्यास मदत होते. त्यामुळे नियमितपणे व्यायाम करणे हा एक उत्तम पर्याय आहे. याविषयी तज्ज्ञ असं सांगतात की आठवड्यातून कमीतकमी १५० मिनिटे तरी तुम्ही वॉकिंग, सायकलिंग, स्विमिंग, रनिंग, जॉगिंग असे व्यायाम करायला हवे.

3) मद्यपानाच्या सवयीमुळेही कोलेस्टेरॉल वाढते. शिवाय त्यामुळे रक्तदाबही वाढतो. त्यामुळे अशा सवयी सोडून द्या.

4) फिश ऑईल सप्लिमेंट घ्याव्या. त्यातून ओमेगा ३ फॅटी ॲसिड भरपूर प्रमाणात मिळते. त्यामुळे ट्रायग्लिसराईड कमी होऊन हृदय निरोगी ठेवण्यास मदत होऊ शकते.

5) आहारात नियमितपणे लसूण खाल्ल्यानेही बॅड कोलेस्टेरॉल कमी होण्यास मदत होते. कोलेस्टेरॉल कमी करण्यासाठी सगळ्यात आधी डॉक्टरांचा सल्ला घेणे अतिशय महत्त्वाचे आहे, हे लक्षात घ्यावे.

(सोशल मीडियावरून साभार)

शिरूर तालुका टीम

Recent Posts

शिवराज मोरे यांच्यावरील हल्ल्याची निष्पक्ष चौकशी करा; विजय वडेट्टीवारांची फडणवीसांकडे मागणी

नागपूर : नागपूर येथे आंदोलनादरम्यान युवक काँग्रेसचे अध्यक्ष शिवराज मोरे यांच्यावर झालेल्या हल्ल्याचे पडसाद उमटले…

8 तास ago

अभियांत्रिकी-पॉलिटेक्निक विद्यार्थ्यांसाठी AI कौशल्यविकासावर भर; रोजगाराच्या संधींसाठी केंद्रीकृत प्लेसमेंट प्लॅटफॉर्म

मुंबई : महाराष्ट्रातील अभियांत्रिकी आणि पॉलिटेक्निक विद्यार्थ्यांची कौशल्य क्षमता, रोजगारक्षमता आणि उद्योगसज्जता वाढविण्यासाठी उद्योगाभिमुख प्रशिक्षण,…

1 दिवस ago

विद्यार्थ्यांच्या तक्रारींचा आता ऑनलाइन निपटारा; DBATUचे ‘Students Grievances Portal’ तातडीने सुरू करण्याचे निर्देश

मुंबई: डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठ, लोणेरे (DBATU) अंतर्गत विद्यार्थ्यांच्या तक्रारी आणि शैक्षणिक समस्यांचे जलद,…

1 दिवस ago

विद्यार्थ्यांच्या कल्पनांना मिळणार ‘स्टार्टअप’ची ताकद! महाराष्ट्रात इन्क्युबेशन सेंटरचे जाळे उभारण्याच्या हालचालींना वेग

मुंबई: विद्यार्थ्यांच्या नवकल्पना, संशोधन आणि उद्योजकतेला व्यापक संधी उपलब्ध करून देत महाराष्ट्राची स्टार्टअप परिसंस्था अधिक सक्षम…

1 दिवस ago

गणेशोत्सवासाठी मुंबई सज्ज; सचिन अहिरांची पालिका अधिकाऱ्यांसोबत आढावा बैठक, विसर्जन व्यवस्थेवर विशेष भर

मुंबई : लाडक्या बाप्पाच्या आगमनाला अवघे काही दिवस शिल्लक राहिल्याने मुंबईत गणेशोत्सवाची लगबग अंतिम टप्प्यात…

1 दिवस ago

लंडनच्या संसदेत ‘जय महाराष्ट्र’चा निनाद; एकनाथ शिंदेंना प्रतिष्ठेचा सन्मान

लंडन: ब्रिटनच्या संसद भवनातील वरिष्ठ सभागृह असलेल्या हाऊस ऑफ लॉर्ड्समध्ये गुरुवारी ‘जय महाराष्ट्र’चा निनाद घुमला. महाराष्ट्राचे…

1 दिवस ago