१) खसखसचा काढा: सांधेदुखीवर हा काढा अत्यंत फायदेशीर ठरतो. यात १५ ग्रॅम म्हणजेच ३ चमचे खसखस ४ कप पाण्यात उकळायची. हे पाणी एक कप उरेल तेव्हा ते गाळून घ्यायचे. त्यात थोडी खडीसाखर घालायची आणि ती विरघळल्यावर हे पाणी प्यायचे. तुम्हाला मधुमेह असेल तर साखर न घालता हे पाणी प्यावे. हे पाणी घेतल्यावर १५-२० मिनिटे काहीही खाऊ पिऊ नये. हा उपाय सकाळी व संध्याकाळी ५,६ वाजता उपाशी पोटी करावा. या उपायाने शरीरात ताकद भरुन येण्यास मदत होते. ज्यांना अशक्तपणा जाणवतो त्यांनीदेखील हा उपाय अवश्य करावा.
२) खसखसचे दूध: ज्यांना निद्रनाशाची समस्या आहे, त्यांनी रात्री झोपण्याआधी एक कप दुधात अर्धा चमचा खसखस घालून दूध चांगले उकळावे. हे दूध गरम असतानाच प्यावे. मधुमेह नसेल तर त्यात आवडीनुसार खडीसाखर घालावी.
३) काढ्यामध्ये गूळ: ज्यांना थकवा अधिक जाणवतो त्यांनी वर सांगितलेल्या काढयात गूळ घालून प्यावे. त्यामुळे थकवा दूर होण्यास मदत होते. आपल्याला ज्या प्रकारची समस्या आहे त्याप्रमाणे यातील प्रयोग करावा नक्कीच फायदा होतो.
(सोशल मीडियावरून साभार)
नागपूर : नागपूर येथे आंदोलनादरम्यान युवक काँग्रेसचे अध्यक्ष शिवराज मोरे यांच्यावर झालेल्या हल्ल्याचे पडसाद उमटले…
मुंबई : महाराष्ट्रातील अभियांत्रिकी आणि पॉलिटेक्निक विद्यार्थ्यांची कौशल्य क्षमता, रोजगारक्षमता आणि उद्योगसज्जता वाढविण्यासाठी उद्योगाभिमुख प्रशिक्षण,…
मुंबई: डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठ, लोणेरे (DBATU) अंतर्गत विद्यार्थ्यांच्या तक्रारी आणि शैक्षणिक समस्यांचे जलद,…
मुंबई: विद्यार्थ्यांच्या नवकल्पना, संशोधन आणि उद्योजकतेला व्यापक संधी उपलब्ध करून देत महाराष्ट्राची स्टार्टअप परिसंस्था अधिक सक्षम…
मुंबई : लाडक्या बाप्पाच्या आगमनाला अवघे काही दिवस शिल्लक राहिल्याने मुंबईत गणेशोत्सवाची लगबग अंतिम टप्प्यात…
लंडन: ब्रिटनच्या संसद भवनातील वरिष्ठ सभागृह असलेल्या हाऊस ऑफ लॉर्ड्समध्ये गुरुवारी ‘जय महाराष्ट्र’चा निनाद घुमला. महाराष्ट्राचे…