आरोग्य

सततचा खोकला होईल कमी – घसाही होईल साफ हे आहेत ३ घरगुती काढा

काही लोक सर्दी खोकला झाल्यावर औषधोपचार घेणं टाळतात. जर आपल्याल सर्दी खोकल्यापासून सुटका हवी असेल तर, आपण घरगुती उपाय करूनही खोकल्यापासून सुटका मिळवू शकता. यामुळे श्वसनमार्गामध्ये साचलेली घाण, धूळ माती किंवा ऋतू बदलांमुळे होणारा खोकला दूर होईल.

खोकल्यासाठी घरगुती उपाय

आले, दालचिनी आणि हळदीचा चहा 

दाहक-विरोधी गुणांनी समृद्ध असलेला हा चहा प्यायल्याने घशाला आराम मिळतो. शिवाय खोकला कोणत्याही प्रकारचा असो, याचा त्रास कमी होतो. हा चहा तयार करण्यासाठी एका भांड्यात पाणी गरम करण्यासाठी ठेवा. पाण्याला उकळी फुटल्यानंतर त्यात आले, दालचिनी आणि हळद घाला आणि शिजवा. चवीसाठी आपण त्यात मधही घालू शकता. ५ मिनिटानंतर गॅस बंद करा. चहा गाळून आपण दिवसातून २ वेळा पिऊ शकता.

तुळस, काळी मिरी आणि मध 

तुळशीची पाने, काळी मिरी आणि मध एकत्र केल्याने एक शक्तिशाली काढा तयार होतो. या तिन्ही घटकांचे अँटी इन्फ्लेमेंटरी आणि अँटी बॅक्टेरियल गुणधर्म श्वसनमार्ग साफ करण्यास मदत करतात. यासाठी भांड्यात पाणी गरम करण्यासाठी ठेवा. त्यात तुळशीची पानं, काळी मिरी आणि मध घालून मिक्स करा. उकळी आल्यानंतर गॅस बंद करा. आणि चहा गाळून प्या.

मिठाचे पाणी 

घसा खवखवणे आणि खोकल्यापासून मुक्त होण्यासाठी कोमट मिठाच्या पाण्याने गुळण्या करा. एक ग्लास कोमट पाणी घ्या आणि त्यात थोडे मीठ घाला. हे पाणी तोंडात ठेवून गुळण्या करा. आणि थुंका. यामुळे घशाला आराम मिळतो आणि खोकला कमी होतो. ही प्रक्रिया दिवसातून २-३ वेळा करा.

(सोशल मीडियावरून साभार)

 

शिरूर तालुका टीम

Recent Posts

रांजणगावात जुन्या भांडणातून तरुणावर हल्ला; कोयता, दगड, फायटरने मारहाण

रांजणगाव गणपती (तेजस फडके) रांजणगाव गणपती गावच्या हद्दीत जुन्या भांडणाच्या कारणावरुन एका १९ वर्षीय तरुणासह…

2 तास ago

Video! शिरूरमध्ये झालेल्या गोळीबारातील हरिश गंगावणे याच्या खुनाची Inside Story…

शिरूर (तेजस फडके): शिरूर शहरात शुक्रवारी (ता. १८) पहाटेच्या सुमारास गोळीबाराची धक्कादायक घटना घडल्याने परिसरात…

4 तास ago

Video! शिरूर शहरात पहाटे गोळीबार; तरुणाचा मृत्यू…

शिरूर (तेजस फडके) : शिरूर शहरातील लाटेआळी आंबेडकर नगर परिसरात आज (शुक्रवार) सकाळी साडेसहाच्या सुमारास…

1 दिवस ago

भिक्षा देण्यास नकार दिल्याने महिलेवर हल्ला; भिकाऱ्याने नाकाला घेतला चावा

मथुरा : गोवर्धन पर्वताला प्रदक्षिणा घालत असलेल्या एका महिलेने भिक्षा देण्यास नकार दिल्याने संतापलेल्या भिकाऱ्याने…

2 दिवस ago

तोंडाला सतत दुर्गंधी येते, दातांना कीड लागते, पाहा ‘असं’ का होत

रोज करायचे काय दिवसातून दोनदा दात घासा. सकाळी आणि रात्री. यामुळे दातांमध्ये काही अडकून राहणार…

2 दिवस ago

तापमान वाढीमुळे बंद पडू शकतं तुमचं हृदय, वाचा हार्ट अटॅकचा धोका जास्त कुणाला

वाढत्या तापमानाचा हृदयावर प्रभाव  हीटवेव किंवा जास्त तापमानामुळे कार्डिओवस्कुलर सिस्टीमवर प्रभाव पडतो, ज्यामुळे हार्ट अटॅकचा…

2 दिवस ago