आजच्या धावपळीच्या जीवनशैलीत पोषणाची कमतरता जाणवते. विशेषतः रक्तातील हिमोग्लोबिनची पातळी कमी होणे म्हणजेच ॲनिमिया. परंतु काही घरगुती उपाय हे महागड्या औषधा शिवाय मोठा बदल घडवतात. त्यातलाच एक साधा, सहज उपाय म्हणजे दूधात खजूर टाकून त्याचे सेवन करणे.
झोपण्या पूर्वी दूध खजूर यांचे सेवन
रात्री झोपण्याच्या सुमारास, एक ग्लास कोमट दूध घ्या आणि त्यात २-३ खजूर टाका. ते १०-१५ मिनिटं भिजू द्या. नंतर ते दूध प्यावे आणि त्यानंतर तेच भिजवलेले खजूर खावे. हाच तो सोपा नि प्रभावी उपाय आहे.
कसा होतो फायदा
खजूरात लोह, फॉलिक अॅसिड, मॅग्नेशियम, फायबर्स आणि अँटीऑक्सिडंट्स मुबलक प्रमाणात असतात. दूध हे कॅल्शियम आणि प्रथिनांचा समृध्द स्रोत आहे. हे दोघे मिळून शरीरातील रक्त निर्मिती वाढवतात, थकवा कमी करतात आणि इम्युनिटी वाढवतात.
होणारे फायदे
हिमोग्लोबिनची पातळी वाढते.
चेहऱ्यावर नैसर्गिक चमक येते.
पचन सुधारते.
झोप चांगली लागते.
मासिक पाळीतील त्रासही कमी होतो.
निष्कर्ष: औषधं नव्हे, तर आहारातल्या छोट्या सोप्या सवयीच आरोग्य सुदृढ करतात. मग आज पासूनच आपल्या दिनक्रमात ‘खजूर + दूध’ ही सवय जोडा आणि अनुभव घ्या नैसर्गिक आरोग्याचा.
(सोशल मिडीयावरून साभार)
मुंबई: राष्ट्रवादी काँग्रेस–शरदचंद्र पवार पक्षाचे महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस ॲड. अमोल मातेले यांचा राजकीय प्रवास हा…
एखादा लांबचा प्रवास करून आल्यावर आपल्या हाता पायांना सुज येते. अति चालल्यावर पायांना सुज येते.…
पावसाळ्यात पोषक खोबरे चवीला गोड असणारे खोबरे पचनानंतरसुद्धा शरीरावर गोड परिणाम करते आणि शरीराला पावसाळ्यात…
मुंबई: रेल्वेच्या जागेवर अनेक वर्षांपासून वास्तव्यास असलेल्या हजारो नागरिकांच्या पुनर्वसनाचा प्रश्न रेल्वे आणि राज्य सरकारने…
निकाल वेळेत लागण्यासाठी शासनाची कार्यवाही; विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान टाळणार रायगड : डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठ,…
‘दिशा’ अभियान राबविणारे महाराष्ट्र देशातील पहिले राज्य; २१ हजारांहून अधिक विद्यार्थी जोडले मुंबई: समाजात जन्माला…